WITT Satta Sammelan | पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर कुणाला दिली?; भगवंत मान यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?
नवज्योत सिंग सिद्धू कधी केव्हा कुठे काय बोलतात ते कळत नाही. नवज्योत सिंग सिद्धू आणि मजीठिया दोघेही निवडणुकीला उभे होते. पण जनतेने त्यांना पराभूत केलं. त्यात आमची चूक काय?, असा सवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला. मान यांनी यावेळी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीशी संबंधित हा मोठा गौप्यस्फोट आहे.
नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक मोठा खुलासा केला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आम आदमी पार्टीने नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण सिद्धू यांनी ही ऑफर नाकारली होती, असा गौप्यस्फोट भगवंत मान यांनी केला आहे. सिद्धू यांनी तेव्हा आमची ऑफर नाकारली होती. त्यामुळे आता त्यांना आम आदमी पार्टीत प्रवेश दिला जाणार नाही, असं भगवंत मान यांनी सांगितलं.
टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात भगवंत मान यांनी हा मोठा खुलासा केला. यावेळी त्यांनी सिद्धू यांना टोलाही लगावला. त्यांच्याकडे सिंह आहे, त्यामुळे ते मोदी, सोनिया गांधी आणि कुणावरही बोलतात. माणूस बदलतो, पण सिंह बदलत नाही. पेट्रोल पंप आणि तेलाच्या विहिरीत फरक आहे. पेट्रोल पंपावर जितकं तेल असेल तेवढं निघेल. प्रत्येक लग्नात वापरायला देण्यात येत असलेल्या सूटसारखी सिद्धूची अवस्था आहे. विशेष म्हणजे हा सूट कधीच आवरणातून काढला जात नाही. पण काँग्रेसचं नशीब पाहा. त्यांनी सूट आवरणाच्या बाहेर काढलाय. आता तो शिवताही येत नाही आणि आवरणात घालताही येत नाही, अशी टीका भगवंत मान यांनी सिद्धू यांच्यावर केली.
खेळाडूंना 15 लाख
मेडल जिंकल्यावर कोणीही पुरस्कार देतं. पण आम्ही तर आधीच खेळाडूंना 15 लाख रुपये द्यायला सुरुवात केली आहे. आम्ही खेळाडूंना आधी मदत करतो. कारण कमीत कमी त्याला बुट तरी खरेदी करता आले पाहिजे. हे बुट घालून तो स्पर्धेत धावू शकेल ही त्यामागची भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मोठा खुलासा
सिद्धू आपमध्ये आल्यावर त्यांचं स्वागत करणार का? असा थेट सवाल मान यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मोठा खुलासा केला. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धू यांना आपने सीएम पदाची ऑफर दिली होती. ही ऑफर सिद्धू यांनी नाकारली होती. त्यामुळे आता त्यांची आपमध्ये एन्ट्री होणार नाही, असं मान म्हणाले.
म्हणून भगतसिंग होता येत नाही
पिवळी पगडी घातली म्हणजे कोणी भगत सिंग होत नाही. पिवळ्या पगडीच्या आत जे डोकं आणि मेंदू होता तो कुठून आणाल? आपण तर शहीद भगत सिंग यांच्या पायाच्या धुळीच्या बरोबरीचेही नाहीत. भगत सिंग यांच्यासारखे होऊ असं आम्ही कधीच म्हटलं नाही. हो, पण त्यांच्यासारखी क्रांतिकारी आणि परिवर्तन घडवून आणणारा विचार तर करू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.