WITT Speaker Gallery Day 2 : ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ समीटमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव संबोधित करणार

पहिल्या यशस्वी प्रयत्नानंतर आता टीव्ही9 नेटवर्क 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' समीटच्या दुसऱ्या सीजनसाठी सज्ज झाला आहे. तीन दिवस ही समीट चालणार आहे. येत्या 25 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे न्यूज9 ग्लोबल समीटच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात भाग घेणार आहेत.

WITT Speaker Gallery Day 2 : 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' समीटमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव संबोधित करणार
ashwini vaishnawImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 4:54 PM

नवी दिल्ली | 21 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 नेटवर्कच्या WITT च्या दुसऱ्या पर्वात न्यूज9 ग्लोबल समीटच्या दुसऱ्या दिवशी ‘India: Poised for a Big Leap’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहेत. 25 फेब्रुवारीपासून राजधानी दिल्लीत ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ समीटचं आयोजन करण्यात आलं आहे. या समिटमध्ये देशातील महत्त्वाच्या हस्ती भाग घेणार असल्याने या समिटकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

मोदी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या समीटचा यंदाचा विषय ‘India: Poised For The Next Big Leap’ हा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती हजेरी लावणार आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भारताच्या जी-20 शेरपा अमिताभ कांत, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यासहीत आधीच या समीटचा एक भाग बनलेल्या लोकांसोबत कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांना भारत ‘Big Leap’ कशी घेणार याचं विवेचन जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

या तीन दिवसाच्या संमेलनात अश्विनी वैष्णव भाग घेणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. 2047पर्यंत महासत्ता होण्याच्या मार्गावर भारत निघाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्याचं हे स्वप्न आहे. त्यामुळे पुढचा विकसित भारत कसा असेल यावर प्रतिष्ठीत मान्यवर विचार विमर्श करणार आहेत.

भारताच्या प्रतिब्धतेचा पुनरुच्चार

मागच्यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी एक व्यापक इकोसिस्टिम विकसित करण्याच्या भारताच्या प्रतिब्धतेचा पुनरुच्चार केला होता. त्यात सहभागी होणाऱ्यांच्या खर्चासाठी डॉलर टू डॉलरचा प्रोत्साहन म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यांनी सेमीकंडक्टर जायन्ट्स एएमडी आणि मायक्रोनद्वारे भारतासाठी करण्यात आलेल्या जाहिरातीवर जोर दिला होता.

मेमरी क्षमतेवर वैष्णव काय म्हणाले?

एखाद्या विशेष मेमरीची क्षमता काय असेल हे मी सांगू शकत नाही. पण जेव्हा हा प्लांट पूर्ण उत्पादन करू लागेल, तेव्हा या प्लांटमधून वर्षाला अधिकाधिक महसूल, टर्नओव्हर एक अब्ज डॉलर आसपास असेल, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. वैष्णव यांच्याकडे सध्या रेल्वे, संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी आदी महत्त्वाचे विभाग आहे. ते 1994च्या ओडिशा कॅडरचे अनुभवी आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे प्रशासकीय अनुभव, उद्योजकता आणि सार्वजनिक सेवांचा अनुभवाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.

सनदी अधिकारी म्हणून कार्यकाळ

आयएएस अधिकारी म्हणून वैष्णव यांनी त्यांच्या कार्यकाळात विकासकामांवर अधिक भर दिला होता. ऑक्टोबर 1999 च्या ओडिशा सुपर चक्रीवादळाच्या काळात बालसोरमध्ये त्यांच्या टीमने उल्लेखनीय काम केलं होतं. तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून त्यांनी चक्रीवादाळाची योग्य माहिती मिळवण्यासाठी यूएस जेटीडब्ल्यूसी वेबसाईटच्या डेटाचा वापर केला होता.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.