WITT: देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे – डॉ. रामेश्वर राव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाचा एक नवा अध्याय लिहीत आहे. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाली आहे, असं माय होम्स ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. भारत मंडपममध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी माय होम्स ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं.
या कार्यक्रमात बोलताना डॉ.रामेश्वर राव यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाचा एक नवा अध्याय लिहीत आहे. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाली आहे. आज संकट काळात संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेनं पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सर्वसमावेशक विकासाचं स्वप्न आणि युद्ध हा पर्यायच नसलेलं जग निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज आपला देश मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे, असं माय होम्स ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 1.45 अब्ज लोकांच्या स्वप्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं दिशा देत आहेत. ज्या पद्धतीनं भारत जागतिक विकासाचा प्रमुख चालक बनत आहे, ते पाहून एक तरुण उद्योजक म्हणून मी खूप प्रेरित झालो आहे. जागतिक बँक आणि आयएमएफ देखील आज भारताच्या विकासाची, प्रगतिची कबुली देत आहे. मोदी सरकारने केवळ आर्थिक आघाडीवर भारताला स्थिर बनवलं नाही तर जगाला स्थिरता आणि विकासाचं एक नवं मॉडेल देखील दिलं आहे, असंही यावेळी रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.
डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न इतक्या वेगानं यशस्वी होत आहेत की, आता काही विकसित देशही ते स्वीकारण्यासाठी उत्सुक आहेत. आपले कौशल्य वाढवण्याची हीच योग्य वेळ असल्याचंही यावेळी रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.