‘बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक…’, सतत महिलांवर होणारे अत्याचार, महिला नेत्याने साधला भाजपवर निशाणा
'बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक...', महिला विशेषतः मुलीवर होणारे अत्याचार, काँग्रस महिला नेत्याने साधला भाजपवर निशाणा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त महिला नेत्याने केलेल्या वक्तव्याची चर्चा
मुंबई | 2 मार्च 2024 : काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रमुख अलका लांबा (Alka Lamba) यांनी बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करण्याच्या कायद्यावर मोठं वक्तव्य केलं. खिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अध्यक्ष (Women Congress President) महिला विशेषतः मुलींमध्ये वाढणाऱ्या अत्याचारांवर संताप व्यक्त केला. माध्यमांसोबत संवाद साधताना अलका लांबा म्हणाल्या, ‘भाजपची डबल इंजिन सरकार गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारने अल्पवयीन पीडितांच्या बलात्काराच्या प्रकरणांची दोन ते तीन महिन्यांत सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करावीत.’
पुढे अलका लांबा म्हणाल्या, ‘दोषींनी फाशीची शिक्षा व्हायला हवी, गुन्हेगारांना नपुंसक बनवण्यासाठी विशेष कायदा केला पाहिजे. जोपर्यंत गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होणार नाही, तोपर्यंत गुन्हे घडतच राहतील…. असं म्हणत काँग्रेस कायम बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल, तर भाजपच्या डोळ्यांमध्ये महिलांसाठी खोटे अश्रू आहेत… असं म्हणत लांबा यांनी भाजपवर निशाणा साधला.
भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत, असं असताना देखील ते मुक्तपणे फिरत आहेत. तर पीडित महिला सतत न्यायाची मागणी करत आहेत. एवढंच नाहीतर, आरोपीला अटक करण्यात आली असली तरी ब्रिजभूषण यांना व्हीआयपीप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा दावा देखील लांबा यांनी केला.
सांगायचं झालं तर, तृणमूल काँग्रेसचे वादग्रस्त नेते शेख शाहजहान यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी २८ फेब्रुवारीच्या रात्री अटक केली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शेख शाहजहान यांना अटक करण्यात आली होती. शिवाय त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.
देशात महिला सुरक्षित नाहीत… असं अनेकदा दिसून आलं… महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचं दिसत आहे. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. यामुळे बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्यासाठी कठोर कायदे अमलात अणावेत यासाठी देखील अनेकांकडून मागणी करण्यात आली.