नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी महिला बनणार CoBRA कमांडो, CRPF घेणार मोठा निर्णय
खरंतर, हल्ली महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे हीदेखील एक आनंदाची बाब आहे.
नवी दिल्ली : नक्षलवाद्यांविरोधात लढा देण्यासाठी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (CRPF) आता विशेष जंगल वॉरफेअर कमांडो फोर्समध्ये महिला अधिकाऱ्यांच्या नेमणुकीवर विचार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती स्वत: सीआरपीएफचे महासंचालक डॉ. एपी माहेश्वरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. गुरुवारी पत्रकार परिषदेत माहेश्वरी म्हणाले की, “आम्ही CoBRA (कमांडो बटालियन फॉर रेसोल्यूट अॅक्शन) मध्ये महिलांचाही समावेश करण्यावर विचार करत आहोत.” त्यामुळे जर असं झालं तर आपली ताकद दाखवण्याची आणखी एक संधी महिलांना मिळणार आहे. खरंतर, हल्ली महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे हीदेखील एक आनंदाची बाब आहे. (women officers become cobra commando for special anti maoist operation says crpf dg)
सध्या देशामध्ये 12,000 CoBRA आहेत. ज्या मुख्यत: डाव्या पक्षातील अतिरेकीग्रस्त राज्यात पोस्ट केल्या आहेत. कोब्राचं नाव जगातील सर्वात धोकादायक कमांडोमध्ये मोजलं जातं. सीआरपीएफच्या या प्राणघातक कमांडो युनिटची स्थापना 2009 मध्ये झाली. सीआरपीएफ ही जगातलं सगळ्यात मोठं अर्धसैनिक दल आहे. खास म्हणजे ऑपरेशन्स व्यतिरिक्त ते देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना (व्हीआयपी) सुरक्षादेखील पुरवतं
SPG सारखी सुरक्षा देण्याच्या तयारीत CRPF
महेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये व्हीआयपी सिक्युरिटी विंगची जबाबदारी वाढत आहे. यामुळे सीआरपीएफ आता स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) तयार करण्याच्या तयारीत आहे. एसपीजी ही स्वतंत्र एजन्सी आहे. जी पंतप्रधानांना संरक्षण पुरवते. तर CRPF सध्या 62 VIP ना सुरक्षा पुरवते. ज्यामध्ये गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा समावेश आहे.
माहेश्वरी यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सीआरपीएफला सगळ्यात मोठा धोका IED हल्ल्यांचा आहे. त्यामुळे IED बॉम्ब शोधण्यासाठी खूप साधनंही लागतात. त्यातही सगळी साधनं उत्तम आणि बरोबर आहेत असंही काही नाही. त्यामुळे हे मोठ्या जोखमीचं काम आहे. हे असं क्षेत्र आहे ज्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. (women officers become cobra commando for special anti maoist operation says crpf dg)
संबंधित बातम्या –
कर्नाटकच्या भाजप सरकारवर पुन्हा ‘सीडी’चं संकट?; 15 आमदार बंडाच्या तयारीत?
देशात पुन्हा एकदा भाजप सरकार?, जाणून घ्या मोदी सरकारची आतापर्यंतची कामगिरी?
Budget 2021: करदात्यांना झटका बसण्याची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कररचनेत बदल होणार?
(women officers become cobra commando for special anti maoist operation says crpf dg)