2022मध्ये लक्षवेधी ठरलेली भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी खास का?; या मुद्द्यातून समजून घ्या काँग्रेसचं ‘राजकारण’

गुजरात निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये अवघ्या एक दोन सभा घेतल्या. पण पूर्ण लक्ष यात्रेवर केंद्रीत केलं. तसेच ते हिमाचल प्रदेशातील निवडणुकीकडे फिरकलेही नाहीत.

2022मध्ये लक्षवेधी ठरलेली भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी खास का?; या मुद्द्यातून समजून घ्या काँग्रेसचं 'राजकारण'
2022मध्ये लक्षवेधी ठरलेली भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी खास का?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 12:05 PM

नवी दिल्ली: गेल्या आठ वर्षांपासून काँग्रेसची प्रत्येक निवडणुकीत सातत्याने पिछेहाट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेसमोर काँग्रेस धुव्वा उडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाला नव संजीवनी देण्यासाठी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू केली. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा काढली जात आहे. या यात्रेचा कालावधी पाच महिन्याचा आहे. यात्रेला तीन महिने होत आले आहेत. या यात्रेतून राहुल गांधी यांनी ग्रामीण भागांना भेटी दिल्या. लोकांची सुखदु:ख समजून घेतली. यात्रा सुरू असताना गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी काँग्रेससाठी ही यात्रा खास आहे. काँग्रेससाठी ही यात्रा का खास आहे त्यावर टाकलेला हा प्रकाश.

हे सुद्धा वाचा

यात्रेविषयी

7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून ही भारत जोडो यात्रा सुरू झाली. कन्याकुमारी ते काश्मीर असा या भारत जोडो यात्रेचा प्रवास आहे. पाच महिने ही यात्रा चालणार असून या कालावधीत 3570 किलोमीटरचं अंतर कापलं जाणार आहे. 12 राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशातून ही यात्रा जात आहे. या यात्रेचं नेतृत्व राहुल गांधी करत आहेत.

सोनिया गांधी येणार नाही

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या यात्रेत सोनिया गांधी येणार नाहीत. त्यांची तब्येत बरी नसल्याने त्या या यात्रेत भाग घेणार नाहीत. मधल्या काळात या यात्रेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाग घेतला होता.

द्वेष आणि मत्सर दूर करण्यासाठी

गेल्या काही वर्षांपासून देशात द्वेष आणि मत्सर निर्माण झाला आहे. द्वेषाचं राजकारण सुरू झालं आहे. सोशल मीडियांपासून जीवनातील सर्वच क्षेत्रात द्वेषाचा व्हायरस पसरला आहे. त्यातून देशवासियांना बाहेर काढण्यासाठी, प्रेम आणि करुणेचा संदेश देण्यासाठी राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा असल्याचं काँग्रेसने आधीच स्पष्ट केलं आहे.

भारत समजून घेण्यासाठी…

भाजपकडून राहुल गांधी यांची सातत्याने अवहेलना करण्यात आली आहे. त्यांना पप्पू म्हणून हिणवलं गेलं आहे. राहुल गांधी यांना राजकारणातलं काहीच कळत नसल्याचंही सांगितलं जात होतं. राहुल गांधी लोकांना भेटत नसल्याची टीकाही होत होती.

त्यामुळेच राहुल गांधी यांनी भारतजोडो यात्रा काढून देशातील लोकांची सुखदु:ख समजून घेताना विरोधकांच्या आरोपांनाही आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून देशातील जनतेच्या अपेक्षा समजून घेण्यात आणि देशाचं वातावरण समजून घेण्याचा त्यांना फायदा होतो आहे.

नव संजीवनी देण्यासाठी…

2014 पासून काँग्रेसचा केंद्र आणि राज्यातील निवडणुकांमध्ये सातत्याने पराभव होत आहे. त्यामुळे काँग्रेसला नैराश्याने घेरलं आहे. तसेच अनेक नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसला सोडून भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं आवसान गळालं आहे. कार्यकर्त्यांमध्ये लढण्याचं पुन्हा प्राण फुंकण्यासाठीच ही यात्रा काढण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

तरुणांचा सहभाग वाढवणं

देशात भाजपची लाट असल्याने या लाटेवर स्वार होण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होत आहेत. काही नेते तपास यंत्रणांच्या भीतीने भाजपमध्ये सामील होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचं सांगितलं जातं.

निवडणुकीशी संबंध नाही

या यात्रेचा आणि यात्रा सुरू असताना देशात काही राज्यात विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका होत आहे. या निवडणुका जिंकण्यासाठीच काँग्रेसची ही यात्रा असल्याचं सांगितलं जात होतं. पण काँग्रेसच्या या यात्रेचा आणि निवडणुकीचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे. देशात सद्भाव निर्माण व्हावा या एकाच हेतूने ही यात्रा काढण्यात आली आहे.

त्यामुळे गुजरात निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये अवघ्या एक दोन सभा घेतल्या. पण पूर्ण लक्ष यात्रेवर केंद्रीत केलं. तसेच ते हिमाचल प्रदेशातील निवडणुकीकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे यात्रेचा हेतू निवडणूक जिंकणं नसल्याचं अधोरेखित झालं आहे.

2024ची तयारी?

या यात्रेचा हेतू केवळ सद्भाव निर्माण करणे हा आहे. असं असलं तरी ही यात्रा 2024च्या निवडणुकीची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे. 2024मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याकरिता ही यात्रा काढली गेल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.