Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yogi Aadityanath: जेव्हा योगी आदित्यनाथ मंचावर एका भाजप नेत्यावर भडकतात, बघा Video

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध कार्यक्रम, उद्घाटन कार्यक्रमांना सतत हजेरी लावत आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये होणार्‍या उत्तर प्रदेश निवडणुकीचा प्रचाराचं वातावरण चांगलच तापलं आहे.

Yogi Aadityanath: जेव्हा योगी आदित्यनाथ मंचावर एका भाजप नेत्यावर भडकतात, बघा Video
Yogi Aadityanath
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 2:57 PM

लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath)आणि त्यांचा संताप काही नवीन नाही. अनेकवेळा योगी सार्वजनिक ठिकाणी कोणावर तरी रागावले आहेत. नुकत्याच झालेल्या अशाच एका घटनेत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh BJP) भाजप नेते विभ्रत चंद्र कौशिक यांच्यावर सर्वांसमोर ओरडले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral video)आहे. ही घटना 29 नोव्हेंबरची आहे, जेव्हा योगी बसगावला एका क्रीडा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. विभ्रत कौशिक गोरखपूर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे राज्यमंत्री दर्जा देखील आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विभ्रत कौशिक योगी आदित्यनाथ यांच्या कानात काहीतरी सांगण्यासाठी गेले होते. पण, योगी त्यांचावर भडकले आणि निघून जाण्यास सांगितले. विभ्रत कौशिक हे उत्तर प्रदेश भाजपमधील सक्रिय भाजप नेते आहेत. सध्या ते उत्तर प्रदेश युवा कल्याण परिषदेचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे राज्यमंत्री दर्जा आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी टीका करण्याऐवजी या घटनेची खिल्ली उडवली. काही म्हणाले, “बिचार विभ्रत उगाच फटकरे खावे लागे,” तर काही म्हणाले “विभ्रत गोरखपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता असल्यापासून त्याचा आदर केला जातो आणि तेव्हापासून तो भाजपसोबत आहेत. विभ्रत हा त्या काही भाजप नेत्यांपैकी आहे, ज्यानी उच्च शिक्षण घेतले आहे.”

विधानसभा निवडणूक

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध कार्यक्रम, उद्घाटन कार्यक्रमांना सतत हजेरी लावत आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये होणार्‍या उत्तर प्रदेश निवडणुकीचा प्रचाराचं वातावरण चांगलच तापलं आहे आणि सर्व राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात प्रचार करत आहेत. यावेळी योगी सरकारला अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाकडून जोरदार लढा दिला जात आहे.

इतर बातम्या

UP Election: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजप हिंदुत्वाच्या रथावर स्वार; पक्षाकडून अयोध्या, काशीनंतर मथुरेची तयारी

Parliament Session: पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला दिलेले व्हेंटिलेटर खराब अन् बिनकामाचे, विनायक राऊतांचा संसदेत घणाघात

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.