‘बंटेंगे तो कटेंगे…’ बांगलादेशसारखी चूक करु नका, योगी आदित्यनाथ यांनी नेमका काय दिला इशारा
yogi adityanath: आपल्यात फूट पडली आपण विभाजित झालो तर आपली परिस्थिती बांगलादेशसारखी होणार आहे. आपण एकत्र राहिलो तर आपण टिकणार आहोत. बांगलादेशसारखी ती चूक पुन्हा करु नका. आम्हाला विकसित भारत संकल्पना साकार करण्यासाठी काम करायचे आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी बांगलादेशमधील उदाहरण दिले. हिंदू एकतेवर मोठे विधान त्यांनी केला. योगी आदित्यनाथ म्हणाले, “हम बंटेंगे तो कटेंगे, हमें एक रहना होगा। हम एक रहेंगे तो नेक रहेंगे।” तुम्ही बांगलादेशमधील उदाहरण पाहत आहे. ती चूक पुन्हा करु नका. आम्हाला विकसित भारत संकल्पना साकार करण्यासाठी काम करायचे आहे.
बांगलादेश प्रकरणातून धडा घ्या…
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, बांगलादेश प्रकरणातून आम्ही धडा घेतला पाहिजे. आम्हाला आमच्या आमच्यात फूट पडू देयायची नाही. आपल्यात फूट पडली आपण विभाजित झालो तर आपली परिस्थिती बांगलादेशसारखी होणार आहे. आपण एकत्र राहिलो तर आपण टिकणार आहोत. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टानिमित्त मी आग्रा येथे आलो आहे. या ठिकाणाच्या प्रत्येक कणात राधा-कृष्ण विराजमान आहेत. यावेळी त्यांनी काकोरी घटना आणि शहीद बिस्मिल यांच्याविषयीही भाष्य केले.
फूट पाडणाऱ्यांपासून सावध व्हा
योगी आदित्यनाथ यांनी आग्रामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दुर्गादास राठौर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, कण-कणात कन्हैया आहे. ही कला आहे. आस्था आहे. समर्पण आहे. विश्वास आहे. ही राष्ट्राची निष्ठा वाढवते. समाज, जाती, भाषेच्या नावावर विभागणी करणाऱ्या समाजकंटकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. दहा वर्षानंतरत दुर्गादास राठोर यांच्या पुतळ्याचे काम झाले आहे.
#WATCH आगरा: उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कहा, "राष्ट्र से ऊपर कुछ भी नहीं हो सकता और राष्ट्र तब सशक्त होगा जब हम एक रहेंगे 'बटेंगे तो काटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे' आप देख रहे हैं बांग्लादेश में क्या हो रहा है। वे गलतियां यहां नहीं होनी चाहिए……"
(सोर्स:… pic.twitter.com/NMM7ISDoge
— ANI_HindiNews (@AHindinews) August 26, 2024
मुख्यमंत्री म्हणाले की, ईश्वराच्या कृपेने देशावर आणि राज्यावर सुख-समृद्धीचा वर्षाव होत राहो हीच सदिच्छा. पाच हजार वर्षांपूर्वी त्यांनी धर्म, सत्य आणि न्याय या मार्गावर चालण्याचा संदेश दिला होता, त्या मार्गावर चालले तर आपण सर्वजण जनकल्याण आणि राष्ट्रकुलासाठी पूर्ण समर्पित भावनेने कार्य करू शकतो.
भक्तांसाठी शुभेच्छा देताना योगी म्हणाले, “परमेश्वर तुम्हाला इतके सामर्थ्य देवो की तुमचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवन मंगल आणि मंगलमय होवो. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून सर्वोत्तम योगदान देण्यासाठी तयार व्हा.”