योगींचं टूलकिट, सपोर्ट करणाऱ्याला दोन रुपये, ऑडिओ व्हायरल झाल्याने खळबळ
काँग्रेस-भाजपमधील टूलकिट वॉर थांबत नाही तोच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. (Yogi Adityanath Toolkit audio viral, bjp sopkesperson clarification on it)
लखनऊ: काँग्रेस-भाजपमधील टूलकिट वॉर थांबत नाही तोच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यात योगी आदित्यनाथ सपोर्ट करणाऱ्यांना दोन रुपये देणार असल्याचं सांगत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सोशल मीडिया टीमचा हा ऑडिओ असल्याचा दावा केला जात आहे. (Yogi Adityanath Toolkit audio viral, bjp sopkesperson clarification on it)
टूलकिट प्रकरणाचा हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आयटी सेलचे प्रमुख मनमोहन सिंह यांना काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणाचा भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा काही संबंध नसल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी केला आहे. हा एका खासगी कंपनीशी संबंधित वाद असल्याचं शुक्ला यांचं म्हणणं आहे.
योगीच्या सोशल मीडिया टीमवर आरोप
ही ऑडिओ क्लिप निवृत्त सनदी अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर योगींच्या सोशल मीडिया टीमवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर, भाजपने या प्रकरणापासून अंग झटकलं असून कंपनीने कुणाला ठेवावं आणि कुणाला नाही ठेवावं हा त्यांचा प्रश्न आहे, असं भाजपने म्हटलं आहे.
सिंह यांचं सूचक ट्विट
दरम्यान, आयटी हेडपदावरून हकालपट्टी केल्यानंतर मनमोहन सिंह यांनी ट्विट केलं आहे. ‘हजारों जवाबों से अच्छी हमारी खामोशी न जाने कितने सवालों की आबरु रख लेगी’ असं सूचक ट्विट सिंह यांनी केलं आहे. त्यामुळे या ट्विटचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
टूलकिट नेमकं काय आहे?
टूलकिट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे. (Yogi Adityanath Toolkit audio viral, bjp sopkesperson clarification on it)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 1 June 2021 https://t.co/2CmEDn0zPG #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2021
संबंधित बातम्या:
Explainer : ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट नेमकं काय? ते काम कसं करतं?
Greta Thunberg | धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटाचं नवं ट्विट
कोण आहे दिशा रवी? पोलिसांकडून अटक का?; वाचा विशेष रिपोर्ट!
(Yogi Adityanath Toolkit audio viral, bjp sopkesperson clarification on it)