Mahmood Madni : आम्हाला कशाला सांगताय? तुम्हीच जा पाकिस्तानात, महमूद मदनी संतापले; समान नागरी कायद्यालाही विरोध

Mahmood Madni : या संमेलानात ज्ञानवापी मशीद वाद, बंगाल आणि त्रिपुरातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. आज दुसऱ्या दिवशी या संमेलानात महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. समान नागरी कायद्याच्या माध्यमातून आमचे संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Mahmood Madni : आम्हाला कशाला सांगताय? तुम्हीच जा पाकिस्तानात, महमूद मदनी संतापले; समान नागरी कायद्यालाही विरोध
आम्हाला कशाला सांगताय? तुम्हीच जा पाकिस्तानात, महमूद मदनी संतापले; समान नागरी कायद्यालाही विरोधImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 2:19 PM

लखनऊ: मी विष ओकतोय असं सांगितलं जातं. मला त्याबाबत सवाल केला जात आहे. पण जे लोक विष पेरत आहेत. त्यांच्याबाबत काहीच बोललं जात नाही. आमचं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेले आम्ही लोक आहोत. या देशाच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी आम्ही पुढे येऊ. कुणाला आमचा धर्म सहन होत नसेल तर तुम्ही कुठे तरी निघून जा. हा देश आमचा आहे आणि या देशाचं आम्ही संरक्षण करू. आम्हाला पाकिस्तानात जाण्याची संधी मिळाली होती. पण आम्ही गेलो नाही. उठता बसता आम्हाला पाकिस्तानात जा म्हणून सांगणाऱ्यांनी स्वत: पाकिस्तानात चालते व्हावे, असा इशारा मौलाना महमदू मदनी (Mahmood Madni) यांनी दिला. जमीयत ए उलमा हिंदचे (Jamiat-e-Ulema Hind) दोन दिवसाचे राष्ट्रीय संमेलन काल सुरू झालं. आज या संमेलनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी ते बोलत होते. या संमेलनात समान नागरी कायद्याच्या (Uniform Civil Code) विरोधाचा ठराव मांडण्यात आला आहे.

या संमेलानात ज्ञानवापी मशीद वाद, बंगाल आणि त्रिपुरातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. आज दुसऱ्या दिवशी या संमेलानात महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. समान नागरी कायद्याच्या माध्यमातून आमचे संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये लग्न, तलाक, कुला (पत्नीच्या इच्छेनुसार तलाक), वारसा हक्क आदी नियम कोणत्याही समाज, समूह किंवा व्यक्तीद्वारे तयार केले नाहीत. नमाज, रोजा, हजप्रमाणेच या गोष्टी सुद्धा धार्मिक परंपर आहेत. पवित्र कुराण आणि हदीसमधून या परंपरा घेतल्या आहेत, असं यावेळी सांगत समान नागरी कायद्याच्या विरोधातील प्रस्ताव मांडण्यात आला. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल खपवून घेतला जाणार नाही. त्याला कठोर विरोध केला जाईल. शरियतमध्ये कुणाचीही ढवळाढवळ करण्याची गरज नाही, असा इशारा मदनी यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

देशासाठी रक्त सांडवू

लोक बोलतील. लोक लिहितील. त्यांना बोलू द्या. लिहू द्या. शत्रूंकडून जे केलं जात आहे, ते लायक नाहीये. त्यांनी इस्लामची ओळख करून घेतली तर दुश्मनी करणार नाहीत. प्रत्यके गोष्टीची तडजोड केली जाऊ शते. पण धोरणांवर तडजोड होणार नाही. जी विचारधारा आम्हाला मिळाली आहे. त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही. आपण जेव्हा राष्ट्र म्हणून विचार करतो तर देश आमचाही आहे. देशाच्या सुरक्षेसाठी रक्त सांडवण्याची वेळ आली तर आम्ही तेही करू, असंही त्यांना सांगितलं.

मुस्लिम पर्सनल लॉमधील बदल कायद्याविरोधी

काही राज्यात सत्ताधारी पक्षांकडून मुस्लिम पर्सनल लॉ संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करणं अनुच्छेद 25 मध्ये दिलेल्या हमीच्या विरोधात आहे. मागच्या सरकारने जी आश्वासाने दिली होती त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. देशात सध्या द्वेषाचं वातावरण तयार केलं जात आहे. ज्ञानवापी मशीद, मथुरेतील ईदगाह मशिदीसारखे विषय काढून एक मोहीम राबवली जात आहे, असंही या संमेलनात सांगण्यात आलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.