लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच पत्नीने मागितला घटस्फोट, कारण ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल

पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्यामागे काही मोजके कारणं असतात. जसे की विचार न पटणे, भांडणं, आर्थिक परिस्थिती किंवा मग अफेअर. पण जयपूरमधून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्ही देखील डोक्याला हात मारुन घ्याल. पत्नीने पतीला लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी घटस्फोट मागितलाय.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच पत्नीने मागितला घटस्फोट, कारण ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 8:24 PM

पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्यामागे वेगवेगळे कारणे असू शकतात. अनेकदा वागणूक, राग, इगो यामुळे घटस्फोट होतात. पण राजस्थानमध्ये घटस्फोटाच्या एका अनोख्या प्रकरणाची खूप चर्चा होत आहे. जयपूरमधल्या या घटनेनं अनेकांनी डोक्याला हात मारुन घेतला आहे. पतीने लग्नाच्या पहिला वाढदिवस होता म्हणून मोठ्या उत्साहाने बायकोला सरप्राईज देण्यासाठी पतीला भेटवस्तू दिली. पम तिने तेव्हाच लगेच पतीकडे घटस्फोट मागितला. ही गोष्ट ऐकताच पतीला सुरुवातीला ती मस्करी करतेय असे वाटले. पण नंतर जेव्हा तिने घटस्फोटाचे कारण सांगितले तेव्हा पतीला ही धक्का बसला.

लग्नाच्या वाढदिवशी मागितला घटस्फोट

महिलेच्या घटस्फोटाचं कारण सांगितल्यावर त्यांचे कुटुंब देखील थक्क झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या एका तरुणाचा वर्षभरापूर्वी प्रतापगडमध्ये विवाह झाला होता. वर्षभरापूर्वी तो त्यांच्या पत्नीसोबत जयपूरला पोहोचला होता. लग्नाचे विधीही पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वधूने सांगितले की एक वर्षानंतर ती परस्पर संमतीने घटस्फोट घेईल. यावर पतीला वाटले की ती असेच बोलत आहे. घरच्यांनीही तिला गांभीर्याने घेतले नाही. पण एक वर्षानंतर जेव्हा ते खरे ठरले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला.

लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात पती एकीकडे पत्नीला सरप्राईज देण्याचा वितार करत होता. तर पत्नी घटस्फोट घेण्याचा विचार करत होती. पत्नीने असे सरप्राईज दिले की पतीला विश्वासच बसेना. नवऱ्याला वाटलं की बायको त्याच्याशी मस्करी करतेय पण यावर पतीने पत्नीला असे का करायचे आहे असे विचारले आणि त्याला असे उत्तर मिळाले की कोणीच अपेक्षा केली नसेल.

कारण ऐकून पतीला बसला धक्का

पत्नीने सांगितले की, ती यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. पण जर तिने घटस्फोट घेतला तर तिला यूपीएससी परीक्षेत घटस्फोटाच्या कोट्याचा लाभ मिळेल. एवढेच नाही तिने फक्त या गोष्टीसाठीच लग्न केल्याचे सांगितले. त्यामुळे पतीला मोठा धक्का बसला. आपली मोठी फसवणूक झाल्याचे पतीला कळले. त्याने मात्र घटस्फोट देण्यास नकार दिला आहे.

पत्नीने पतीला घटस्फोट दिला नाही तर खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित पतीने पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. तक्रार देण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशन गाठले पण एफआयआर नोंदवला गेला नाही. यानंतर तो कोर्टात पोहोचला. तरुणांच्या विनंतीवरून अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.