AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 रुपयात पोटभर जेवण मिळणार, मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

देशात अनेक राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राज्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर सामान्य लोकांच्या गरजेच्या अनेक वस्तू स्वस्त झाल्याच्या पाहायला मिळतात.

5 रुपयात पोटभर जेवण मिळणार, मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
Shivraj Singh Chouhan (1)Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 2:49 PM

नवी दिल्ली : देशात अनेक राज्यात पुढच्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका (Assembly elections 2023) होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अनेक राज्यात जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मध्यप्रदेश (madhya pradesh) राज्यात सुध्दा मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी ५ रुपयात थाळी देण्याचं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी तरुण महिला यांना घेऊन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे मध्यप्रदेशातील प्रत्येक व्यक्तीला पाच रुपयात भरपूर जेवण मिळणार आहे. दीनदयाल किचनमध्ये जेवणाची ही व्यवस्था करण्यात येणार आहे. आज त्यांनी ६६ दीनदयाल किचन सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी भोपाळमधील कुशाभाउ ठाकरे येथील एका हॉलमध्ये दीनदयाल किचन योजनेमधील तिसऱ्या टप्प्यात उद्घाटनं केली. आता जे जेवणं मिळत आहे, ते दहा रुपयांच्या हिशोबाने देण्यात येत आहे. परंतु आजपासून संपूर्ण राज्यात हे जेवण पाच रुपयाला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

गरिबांना काय मिळणार ?

आज मुख्यमंत्र्यांनी गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत शहरी भागातील 38,505 बेघर लोकांना जमीन देण्याचं आश्वासन दिलं आहे. आपल्या राज्यात विना घराचं कोणीचं राहणार नाही असं सु्द्धा जाहीर केलं. याच्याआगोदर महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी

१६६ दीनदयाल किचनमध्ये जेवण मिळणार

ज्या लोकांना पीएम योजनेतून घर मिळालेलं नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या योजनेतून घर देण्यात येणार आहे. त्याचं असं म्हणणं आहे की, राज्यातील कुठल्याही लोकांच्या डोक्यावर छत नाही असं दिसायला नको. ६६ दीनदयाल किचन केंद्रात आजपासून लोकांना पाच रुपयात जेवण मिळणार आहे. लोकांच्या हिताचे निर्णय जाहीर होत असल्यामुळे सगळीकडं निवडणुक लागण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.