Noida Crime : नोएडामध्ये मूल चोरल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, मुख्य आरोपीला अटक

दनकौर परिसरातील नरेश नामक तरुणाच्या सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री कानारसी गावात ननकूला ग्रामस्थांनी झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ननकूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

Noida Crime : नोएडामध्ये मूल चोरल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, मुख्य आरोपीला अटक
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 6:19 PM

नोएडा : कथित मूल चोरल्याप्रकरणी एका तरुणा (Youth)ला झाडाला बांधून चोप देत त्याची हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना नोएडामधील दनकौर परिसरात एका गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. ननकू असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Youth murdered in Noida on suspicion of child abduction)

काय घडले नेमके ?

दनकौर परिसरातील नरेश नामक तरुणाच्या सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री कानारसी गावात ननकूला ग्रामस्थांनी झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ननकूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्य आरोपी नरेशला पोलिसांनी अटक केली असल्याचे दनकौर पोलिस स्टेशनचे प्रभारी सुधीर कुमार सिंह यांनी सांगितले. मयताचा भाऊ पंचांग याने दनकौर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून नरेशसह अनेकांची नावे आहेत.

बीडमध्ये दोन तरुणांवर टोळक्याचा हल्ला

भररस्त्यात दोन तरुणांवर 20 ते 25 जणांच्या टोळक्याने काठी आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना शनिवारी बीड शहरात घडली. बीड शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सम्राट चौकामध्ये ही घटना घडली आहे. रस्त्यावर मारहाण करतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.दरम्यान यात दोन तरुण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर मारेकरी घटनस्थळावरून फरार झाले आहेत. गजबजलेल्या ठिकाणी हाणामारी झाल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. (Youth murdered in Noida on suspicion of child abduction)

इतर बातम्या

यवतमाळमध्ये जुना वाद उफाळून आला, आरोपींनी विष पाजून तरुणाचा काटा काढला! पाच आरोपी अटकेत

Jalgaon Accident | अरुंद रस्त्यावर कारची धडक, दोघा बाईकस्वार तरुणांचा मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.