गर्लफ्रेंडने मागितले असे काही मग त्यासाठी पाच जण बनले चोरटे

18 ते 20 वर्षांच्या मित्रांनी आपल्या मैत्रिणींचे महागडे शौक पुर्ण पुरवण्यासाठी चक्क चोऱ्या सुरु केल्या. यातील काही मुलांचे वडील रिक्षा चालवतात किंवा कारखान्यात मजूर आहेत.

गर्लफ्रेंडने मागितले असे काही मग त्यासाठी पाच जण बनले चोरटे
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 11:30 AM

कानपूर : आता व्हेलेंटाईन डे ची तयारी तरुणाईने सुरु केली आहे. अनेक टिनएजर किंवा युवक मैत्रिणींसाठी सर्व काही करायला तयार होता. परंतु उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये जे घडले ते धक्कादायक आहे. 18 ते 20 वर्षांच्या मित्रांनी आपल्या मैत्रिणींचे महागडे शौक पुर्ण पुरवण्यासाठी चक्क चोऱ्या (youth robbery) सुरु केल्या आहेत. यातील काही मुलांचे वडील रिक्षा चालवतात किंवा कारखान्यात मजूर आहेत. पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक केली आहे. त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे. आता अशा गुन्हेगारांचे समुपदेशन करण्याचा विचारही पोलीस करत आहेत.

कानपूर पोलिसांनी मोबाईल चोरांच्या टोळीचा मोठा खुलासा केला. 18 ते 20 वर्षांच्या मित्रांनी आपला आणि आपल्या मैत्रिणींचा महागडा छंद पूर्ण करण्यासाठी एक टोळी तयार केली. हे पाच मित्र निर्जन ठिकाणी जाणाऱ्या लोकांना लुटायचे. पंकी पोलीस आणि एसओजीने त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्यांकडून लुटलेले नऊ मोबाईल, दोन दुचाकी, पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मेत्रिणींसाठी सर्व काही करणाऱ्या आरोपींच्या पालकांना बोलवून त्यांचे समूपदेशन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

आरोपी 18 ते 20 वर्षे दरम्यानचे

हे सुद्धा वाचा

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचे वय 18 ते 20 वर्षे दरम्यान आहे. अभय यादव, संदीपकुमार गौतम, सुमित कुमार, बाशी उर्फ ​​भूपेंद्र बन्सल, शिवा सरोज अशी त्यांची नावे आहेत. दुचाकीवरून चोरीच्या घटना ते करत होते. चोरलेले मोबाईल विकून ते आपल्या मैत्रिणींचे छंद पुर्ण करत होते. आरोपींनी मोबाईल चोरीच्या घटनांची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील एकतर ई-रिक्षा चालवतात किंवा कारखान्यात मजूर म्हणून काम करतात.

इटावामध्ये 11 आरोपींना पकडले

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्यासह 11 आरोपींना 25 हजारांच्या बक्षीसासह अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीच्या म्होरक्याने सांगितले की, त्याच्या मैत्रिणीला महागड्या भेटवस्तूंचा शौक होता. प्रेयसीला खूश ठेवण्यासाठी आणि आपला छंद पूर्ण करण्यासाठी त्याने चोरी, लुटमारीच्या घटना घडवून आणण्यास सुरुवात केली. हळूहळू आजूबाजूच्या परिसरातील लोकांना जोडून 11 जणांची टोळी तयार झाली. राहुल उर्फ सोनू यादव हा या टोळीचा प्रमुख होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.