अशी ही लव्ह स्टोरी, युट्यूबरच्या प्रेमासाठी देश सोडला, ३००० किमी प्रवास करत भारत गाठले, आता साखरपुडा
social media love story: फैजा आणि तिचा वडिलांना ताजमहल पाहायचे आहे. त्यानंतर त्यांना अयोध्येत जायचे आहे. अयोध्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ते ऐकत आहे. त्यामुळे अयोध्याते जायचे आहे. त्यांना भारतीय संस्कृती चांगल्या पद्धतीने समजून घ्यायची आहे.
नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : पाकिस्तानातून येऊन भारतीय तरुणाशी लग्न करणाऱ्या सीमा हैदरची लव्ह स्टोरी काही महिन्यांपूर्वी चर्चेत होती. सीम हैदर पाकिस्तानी गुप्तहेर तर नाही ना? असे प्रश्न त्यावेळी उपस्थित झाले होते. आता आणखी एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ही लव्ह स्टोरी भारतीय युट्यूबर आणि ईराणी मुलगी फैजा हिची आहे. मुरादाबादचे युट्यूबर दिवाकर यांच्यासाठी फैजा हिने आपला देश सोडला. तीन हजार किलोमीटर प्रवास करत भारत गाठले. आता त्यांचा साखरपुडा झाला आहे. फैजाने ईराणमधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता भारतीय कायदेशीर प्रक्रिया झाल्यावर ते लग्न करणार आहेत.
कशी झाली ओळख
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील युट्यूबर दिवाकर हा ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तीन वर्षांपूर्वी इंस्टग्रॉमच्या माध्यमातून फैजा आणि त्याचा संपर्क झाला. सुरुवातील दोघांचा संवाद एक-दुसऱ्यांच्या देशासंदर्भात झाला. हळहळू त्यांचा संवाद वाढत गेला. एकमेकांना समजून घेतले आणि त्यांचे प्रेम सुरु झाले. दिवाकर याने सांगितले की, इराणमधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. LIU में डॉक्यूमेंट सबमिट दिले गेले आहे. आता भारतातील प्रक्रिया पूर्ण होताच आम्ही लग्न करणार आहोत.
युट्यूबर दिवाकर याने सांगितले की, फैजा आणि आमची परंपरा वेगवेगळी आहे. यामुळे सुरुवातीला आम्हाला अनेक अडचणी आल्या. मी जेव्हा इराणमध्ये गेलो, तेव्हा माझी दाढी चांगलीच वाढली होती. त्याबद्दल फैजाच्या परिवारातील लोकांनी मला विचारणा केली. मी त्यांची संस्कृती समजून घेतली. त्यानंतर फैजाच्या परिवारातील लोक लग्नासाठी तयार झाले. फैजाने मला फारशी शिकवली मी तिला हिंदी शिकवली.
फैजाच्या वडिलांना अयोध्या यायचेय
दिवाकर याने सांगितले की, फैजा आणि तिचा वडिलांना ताजमहल पाहायचे आहे. त्यानंतर त्यांना अयोध्येत जायचे आहे. अयोध्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ते ऐकत आहे. त्यामुळे अयोध्याते जायचे आहे. त्यांना भारतीय संस्कृती चांगल्या पद्धतीने समजून घ्यायची आहे. फैजा इराणमधील हमेदान शहरातील आहे.