Zomato ने शाकाहारी लोकांसाठी घेतला निर्णय, सोशल मीडियावर तीव्र पडसाद, अखेर काही तासांत निर्णय फिरवला
Zomato: झोमॅटो कंपनीने शाकाहारी लोकांसाठी मंगळवारी एक घोषणा केली. या निर्णयास सोशल मीडियावर तीव्र विरोध झाला. त्यानंतर काही तासांत हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी जाहीर केले.
नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : ऑनलाइन फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटो घराघरात खवय्यांपर्यंत खाद्यपर्यंत पोहचवण्याचे काम करते. कंपनीने शाकाहारी लोकांसाठी मंगळवारी एक घोषणा केली. या निर्णयास सोशल मीडियावर तीव्र विरोध झाला. त्यानंतर काही तासांत हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी जाहीर केले. गोयल यांनी शाकाहारी लोकांसाठी Pure Veg Fleet ची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक शाकाहारी ग्राहकांकडून आलेल्या फिडबॅकनंतर हा निर्णय मंगळवारी घेतल्याची माहिती गोयल यांनी X वर दिली.
काय होती नेमकी घोषणा
दीपिंदर गोयल यांनी X वर म्हटले होते की, जगात सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात आहेत. यामुळे लोकांकडून आलेल्या फिडबॅकनंतर आम्ही नवीन सर्व्हीस सुरु केली आहे. आता झोमॅटो शाकाहारी लोकांसाठी लाल रंगाचे डब्बे वापरण्याऐवजी हिरव्या रंगाचे डब्बे वापरणार आहे. तसेच डिलेव्हरी बॉयसुद्धा हिरव्या रंगाची शर्ट परिधान करतील. हे जेवण शुद्ध शाकाहारी हॉटेलमधून येणार आहे. तसेच या निर्णयास विरोध झाला तर तो आम्ही परत घेऊ.
India has the largest percentage of vegetarians in the world, and one of the most important feedback we’ve gotten from them is that they are very particular about how their food is cooked, and how their food is handled.
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 19, 2024
निर्णयास सोशल मीडियातून विरोध
मंगळवारी गोयल यांनी घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. मोठ्या संख्येने युजर झोमॅटोच्या निर्णयास विरोध करु लागले. आम्ही आपल्या सोसायटीत मांसाहारी असल्याचे प्रदर्शन करु इच्छीत नाही, असे अनेक युजर्सने म्हटले. दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले आहे की, आज आम्ही व्हेज खात आहोत की नॉन व्हेज हे लोकांना सांगू दाखवू इच्छित नाही.
Update on our pure veg fleet —
While we are going to continue to have a fleet for vegetarians, we have decided to remove the on-ground segregation of this fleet on the ground using the colour green. All our riders — both our regular fleet, and our fleet for vegetarians, will…
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 20, 2024
तिसऱ्या व्यक्तीने म्हटले आता कांदा, लसूण न खाणाऱ्यांसाठी नवीन सुविधा सुरु करा. मंगळवारी लोकांच्या या प्रतिक्रिया उमटल्यानंतर बुधवारी गोयल यांनी आपला निर्णय मागे घेत असल्याची X वर जाहीर केले.
विरोधानंतर कंपनीने बुधवारी म्हटले, आमचे सर्व रायडर्स लाल रंगाचे परिधान करतील. याचा अर्थ असा की शाकाहारी ऑर्डरसाठीचा फ्लीट ओळखला जाणार नाही. आम्हाला हे समजले आहे की आमचे काही मांसाहारी ग्राहकांची त्यांच्या घरमालकांसोबत अडचण होईल. आमच्यामुळे असे घडले तर ती चांगली गोष्ट नाही, यामुळे हा निर्णय आम्ही मागे घेतला.