BLOG – राष्ट्रवादीत खडसेंचाही ‘राणे’ तर होणार नाही ना?

खडसेंच्या आगमनावेळची ही स्थिती राष्ट्रवादीतल्या खडसेंची वाटचाल काँग्रेसमधल्या नारायण राणेंसारखीच तर होणार नाही ना? हा सवाल उपस्थित करते.

BLOG - राष्ट्रवादीत खडसेंचाही 'राणे' तर होणार नाही ना?
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 6:10 PM

राष्ट्रवादीत शरद पवारांना मानणारा आणि शरद पवारांपेक्षा अजित पवारांना जास्त मानणारा, असे दोन गट आहेत (Eknath Khadse Joins NCP). हे राजकारणाचा अभ्यास असणारा कुणीच नाकारणार नाही. अजित पवार फडणवीसांसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीतील ही गटबाजी अगदी उघडपणे समोर आलेली. पण, आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन आणि आता त्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यावरुनही ही दुफळी समोर येण्याची शक्यता आहे. कारण, खडसेंच्या प्रवेशावर अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांच्या हालचाली काहीशा नकारात्मक दिसत आहेत (Eknath Khadse Joins NCP).

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी अजित पवारांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण, त्याच दिवशी दुपारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याचं जाहीर करत, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या सोहळ्यात अजित पवारांनी आपण गैरहजर राहणार हे उघड केलं. त्यानंतर पुन्हा खडसेंना मंत्री नव्हे, तर नियोजन मंडळात स्थान दिल्या जाण्याच्या बातम्या येणं. खडसेंच्या प्रवेशाआधी बंद कॅबिनमध्ये चर्चा होणं. हे सारं काही राष्ट्रवादीत खडसेंवरुन किती मते-मतांतरे आहेत, हे दाखवणारी आहेत.

राष्ट्रवादीत शरद पवारांचाच शब्द अंतिम आहे, हे तूर्तास तरी बहुतांश प्रमाणात सत्य आहे. पण, खडसेंसाठी शरद पवार त्यांचा अनमोल शब्द वापरुन अजित पवारांना खडसेंच्या मंत्रिपदासाठी राजी करतील का? हाही प्रश्न आहे. बरं जर खडसेंना मंत्रिपद द्यायचंच असेल, तर पवारांना त्यांच्या विश्वासू मंत्र्यांच्या जागी खडसेंना बसवावं लागेल. आता तर पवारांचे अत्यंत निकटवर्तीय आव्हाडही मंत्रिपद सोडायला तयार नसल्याची चर्चा आहे. खडसेंच्या प्रवेशाआधी त्यांनी पवारांसोबत केलेली चर्चाही बरंच काही सांगून जाते. त्यामुळे इतक्या जवळचे नेते पवारांचा शब्द टाळतील का? हा प्रश्नही संभ्रम निर्माण करतो. खडसेंच्या आगमनावेळची ही स्थिती राष्ट्रवादीतल्या खडसेंची वाटचाल काँग्रेसमधल्या नारायण राणेंसारखीच (Narayan Rane) तर होणार नाही ना? हा सवाल उपस्थित करते.

राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशाला ग्रँड इव्हेंट केलं. 2014 पर्यंत महाराष्ट्र भाजपचा सर्वोच्च नेताच राष्ट्रवादीच्या गोटात येत असल्यानं, हा सोहळा होणं सहाजिकचं होतं. पण, राष्ट्रवादीच्या या ग्रँड सोहळ्याला शरद पवारांचे निकटवर्तीय मंत्रीच दिसले. नेहमीप्रमाणे सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, अनिल देशमुख, आव्हाडांनी पवारांच्या शब्दाचं पालन करत सोहळ्याला खऱ्या अर्थानं ग्रँड करण्यासाठी हातभार लावला. पण, दुसरीकडे या सोहळ्यात ना अजित पवार दिसले, ना धनंजय मुंडे, ना पार्थ पवार. विशेष म्हणजे, शरद पवार वगळत्या महत्वाच्या नेत्यांच्या भाषणातही अजित पवारांना उल्लेख झाला नाही. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला खरंच अजित पवारांचं पूर्ण पाठिंबा आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो.

40 वर्ष भाजपमध्ये काढल्यानंतर खडसेंसारखा दिग्गज नेता पक्षांतर करत असेल, तर नक्कीच त्याला मंत्रिपद देण्याचा तरी शब्द देण्यात आला असेल. पण, आता अजित पवार गटाची संभाव्य नाराजी पाहता, खडसेंची इच्छा लवकर पूर्ण केली जाईल असं वाटत नाही. स्वत: पवारांनी देखील सध्या काही बदल होणार नाही, असं सांगत याला काहीसा दुजोरा दिला. त्यामुळे आधीच भाजपमध्ये त्रस्त झालेल्या खडसेंना इथे वेट अँड वॉच करावं लागलं, तर मात्र त्यांची अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.

नाही म्हणायला केंद्रातील मोदी-शाह आणि राज्यातील फडणवीस-महाजनांच्या नव्या भाजपानं खडसेंना बरंच बदललं आहे. विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर महसूलमंत्री असतानाचे खडसे आणि आता चार वर्षानंतरचे खडसे यात नक्कीच बदल झालेला दिसतो. शेवटी चार वर्षाच्या विजनवासानं सर्व बाजुंनी त्यांचे पंख छाटण्यात आले. खडसेंना निष्क्रीय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे खडसेंमध्ये पूर्वीसारखी आक्रमकता आता पाहायला मिळण्याची शक्यता कमीच आहे. मुलीच्या पराभवानं खचलेल्या खडसेंच्या मागे पूर्वीसारखे लाखो कार्यकर्तेही सध्या दिसत नसतील. पण, म्हणून खडसेंना कमी लेखणं चुकीचं ठरु शकतं (Eknath Khadse Joins NCP).

शरद पवार एकनाथ खडसेंचं महाराष्ट्र आणि त्यातही उत्तर महाराष्ट्रातील महत्व ओळखून आहेत. अनेक वर्ष विरोधी पक्षनेते आणि 2014च्या सत्तेनंतर डझनभर महत्वाच्या खात्यांच्या मंत्रिपदामुळे राज्याच्या कान्याकोपऱ्यात खडसेंच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क बनलं. आता बदललेल्या भाजपामुळे जिथं नेताच शांत होता, तिथे कार्यकर्तेही काहीसे शांत झाले असल्याची शक्यता आहे. पण, आता याच निष्क्रिय झालेल्या कार्यकर्त्यांना सक्रीय करत खडसे पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करण्यासाठी तयार झालेले दिसत आहेत. आता फक्त त्यांना राष्ट्रवादीचे नेते कसा प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी प्रवेशाच्या सोहळ्यात ज्या उर्जेनं एकनाथ खडसेंनी पवारांना शब्द दिला, ते पाहता राष्ट्रवादी वाढवण्यासाठी खडसे पुरेपूर प्रयत्न करण्याची शक्यता आहे. खडसे आणि फडणवीसांमध्ये टोकाचा संघर्ष आहे. त्यामुळे फडणवीसांना रोखठोक प्रत्युत्तर देण्यासाठी खडसेंच्या रुपात एक भक्कम नेता राष्ट्रवादीला मिळाला. ज्या तऱ्हेनं 2014मध्ये खडसेंनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा विस्तार केला. त्याचीच पुनरावृत्ती आता राष्ट्रवादीसाठी करण्याचा खडसेंचा प्रयत्न असणार आहे. पण, हे सारं घडण्यासाठी खडसेंना राष्ट्रवादीकडूनही सत्तेचं बळ मिळण्याची गरज आहे. अन्यथा पद नसताना पक्षवाढीच्या अपेक्षा ठेवणं म्हणजे, वाघापुढे गवत टाकल्यासारखं होईल.

पण, राजकारणात पोटच्या पोरावर विश्वास ठेवला जात नाही. तिथं राष्ट्रवादीचे मुरलेले नेतेही खडसेंवर तरी विश्वास कसा ठेवणार? त्यामुळं आता राष्ट्रवादीचा संपूर्ण विश्वास मिळवण्यासाठी खडसे काय काय करतात? आणि खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांच्या गटाकडून काय प्रतिक्रिया उमटतात. खडसे आणि अजित पवारांचं ट्युनिंग कसं राहतं? आणि भाजपच्या खडसेंची आता राष्ट्रवादीची नवी इनिंग कशी राहते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे (Eknath Khadse Joins NCP)

 : टीप – ब्लॉगमधील मते वैयक्तिक आहेत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.