मेड इन चायना लसीचा फुसका बार, खोटे आकडे दाखवणं चीनला महागात

एकीकडे ब्रिटनमध्ये सरासरी रोज 93 हजार रुग्ण निघूनही तिथं मास्कपासून लोकांची सुटका झालीय आणि दुसरीकडे चीनमध्ये रोज 200 रुग्ण असतानाही ३ कोटी लोकसंख्या घरांमध्ये कैद केली गेलीय.

मेड इन चायना लसीचा फुसका बार, खोटे आकडे दाखवणं चीनला महागात
vaccination
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 10:05 PM

चीननं बनवलेली लस सुद्धा त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंप्रमाणेच मेड इन चायना निघालीय. (Made In China) 144 कोटी लोकसंख्येच्या चीनमध्ये तब्बल 90 टक्के लसीकरण झाल्याचं तिथलं कम्युनिस्ट सरकार सांगतंय. पण लसीचे दोन्ही डोस घेऊनही चिनी लोकांमध्ये कोरोनाविरोधातल्या (Coroana) अँटीबॉडीच तयार झालेल्या नाहीत. ज्याचा परिणाम ३ कोटींहून जास्तीची चिनी लोकसंख्या या घडीलाही लॉकडाऊन भोगतेय. कोरोनावर चीननं सिनोवॅक नावाची (Sinovac Vaccine) लस तयार केली. जगात सर्वात आधी लस शोधल्याचा दावाही केला गेला. मार्केटिंगचा वापर करुन चीननं साऱ्या जगात तब्बल 4.3 अब्ज लसीचे डोस खपवले. पण हॉन्गकॉन्ग यूनिवर्सिटीच्या संशोधनातून चीनच्या सिनोवॅक लसीचा प्रभाव फक्त 51 टक्के असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

चिनी लसीचा फुसका बार

चिनी लसीचा गाजावाज कसा फुसका निघाला, ते काही मुद्दयांवरुन समजून घ्या. एकीकडे ब्रिटनमध्ये सरासरी रोज 93 हजार रुग्ण निघूनही तिथं मास्कपासून लोकांची सुटका झालीय आणि दुसरीकडे चीनमध्ये रोज 200 रुग्ण असतानाही ३ कोटी लोकसंख्या घरांमध्ये कैद केली गेलीय. लसीनंतरही ओमिक्रॉनची सौम्य लागण होऊ शकते, ही गृहीत धरुन जगात कोरोनाची भीती कमी झालीय. पण चीनमधून डेल्टाचाच प्रभाव अजूनही कमी न झाल्यामुळे सध्या चीनच सर्वाधिक बिथरलाय. एकट्या मुंबईचा विचार केला, तर गेल्या वर्षातल्याच काही नमुन्यांद्वारे 70 टक्के मुंबईकरांमध्ये अँटीबॉडी होत्या. मात्र बोगस लसीमुळे बहुसंख्य चिनी लोकांमध्ये अँटीबॉडीच विकसित झालेल्या नाहीत. जगाचा विचार केला तर 67 टक्के प्रमाणात विमान वाहतूक पुन्हा सुरु झालीय. आणि चीनमधून बाहेर जाणारी विमानं पुन्हा सुरु होण्याचं प्रमाण फक्त २ टक्के आहे.

आधी कोरोनाच्या प्रसाराबाबत चीननं जगाला खोटं सांगितलं. त्यानंतर रुग्णांबरोबरच मृतांचेही खोटे आकडे दिले. चिनी लसीबाबत खोटी मार्केटिंग केली आणि आता तोच खोटेपणा चीनच्या अंगावर उलटतोय. काही जाणकारांच्या मते चिनी लसीत दम नसल्यामुळेच चीननं लसीकरणाचा वेग कमी केला आणि त्यामुळेच ओमिक्रॉनच्या फैलावानंतर तिथल्या सरकारकडे लॉकडाऊन हाच मार्ग उरलाय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा जगाची चिंता वाढवली आहे. जगातल्या बहुतांश देशांनी लसीकरणावर भर दिला आहे. मात्र चिनची घरची लस बिनकामी निघाल्याने पुन्हा चीनचे धाबे दणाणले आहेत. तसेच ज्या देशांनी चीनकडून लस घेतली त्यांचीही पंचाईत झाली आहे. त्यामुळे लस असो की इतर कुठली वस्तू, चिनी माल घेताना जरा जपून.

कोव्हिड-19 मधून रिकव्हर होताय. अगोदर तुमचा ब्रश बदला आणि पुन्हा करोना संक्रमणापासून स्वतःला दूर ठेवा…

काय तुम्हाला ‘ही’ लक्षणं दिसत आहेत, मग लिव्हरकडे लक्ष देणं गरजेचं आहे…जाणून घ्या ती लक्षणं एका क्लिकवर

तुमच्या मुलीला दिली का ‘ही’ लस? लस द्या कॅन्सरपासून सुरक्षीत रहा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.