दक्षिण आफ्रिकेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं, ओमिक्रॉनची जगभरात धास्ती

आता ओमिक्रॉनच्या उदयानंतर आलेल्या चौथ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. हॉस्पिटलमधील कोरोनाबाधितांमध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 0 ते 5 वयोगटातील मुलांच्या बाधितांचं प्रमाण समान असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय.

दक्षिण आफ्रिकेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं, ओमिक्रॉनची जगभरात धास्ती
दक्षिण आफ्रिकेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 10:58 PM

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंटमुळे ओमिक्रॉनचा वेगानं संसर्ग होत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या 16 हजारांच्यावर गेलीय. ओमिक्रॉनच्या उदयानंतर लहान मुलांना कोरोना होणाचं प्रमाण वाढलंय. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनच्या उदयानंतर 9 पैकी सात राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या प्रमाणात वाढ झालीय. कोरोनाबाधितांमध्ये लसीकरण न झालेल्याचं प्रमाण जास्त असल्यानं लसीकरणाला वेग आलाय. सध्य दक्षिण आफ्रिकेत ख्रिसमसच्या सुट्या असल्यानं लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आलीय.

ओमिक्रॉनच्या उदयानंतर लहान मुलांना कोरोनाचा धोका ?

0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलं कोरोनाबाधित 15 ते 19 वयोगटातील मुलं कोरनोबाधित गरोदर महिलांही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित

दक्षिण आफ्रिकेत या आधीच्या कोरोना लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. मात्र, आता ओमिक्रॉनच्या उदयानंतर आलेल्या चौथ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. हॉस्पिटलमधील कोरोनाबाधितांमध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 0 ते 5 वयोगटातील मुलांच्या बाधितांचं प्रमाण समान असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय. मुलांमध्ये आणि गरोदर महिलांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण का वाढत आहे? याचा अभ्यास केला जाणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.

ओमिक्रॉनची जगभरात धास्ती

आफ्रिकेतील झांबिया आणि उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या देशामध्येही ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आलाय. त्यामुळे जगभरात 40 देशांत ओमिक्रॉनचा शिरकाव झालाय.

ओमिक्रॉनचा 40 देशांत शिरकाव अवघ्या दोन दिवसांत 23 देशांत संसर्ग ओमिक्रॉनमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद नाही

ओमिक्रॉनमुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता

ओमिक्रॉनमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक देशांमध्ये ख्रिसमस बाजारही बंद करण्यात आलेत. आता ओमिक्रॉनमुळे नव वर्षाच्या स्वागताच्या उत्साहावर देखील विघ्न आलंय. ब्राझीलमधील रिओ दि जेनेरियो या शहरात 31 डिसेंबरच्या उत्सव रद्द करण्यात आलाय. अमेरिकेतही ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढत आहे. न्यूयॉर्कमध्ये आणखीन तीन ओमिकॉनबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेत येणाऱ्या सर्वच प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलीय. युरोपात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं हाहाकार माजवला असतानाच आता ओमिक्रॉननं धास्ती वाढवलीय. बेल्जियममध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढल्यानं हॉस्पिटलमध्ये बेड मिळणंही अवघड झालंय. कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये होऊ नये यासाठी नवे निर्बंध जारी करण्यात आलेत. यापुढे सहा वर्षांवरील सर्वच मुलांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय.

बेल्जियमध्ये नवे निर्बंध

सहा वर्षांवरील सर्व मुलांना मास्क बंधनकारक 20 डिसेंबरपासून बालवाडी आणि प्राथमिक शाळा बंद माध्यमिक शाळाही एकदिवस आड सुरू राहणार

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युरोपमधील ऑस्ट्रिया या देशानं पहिल्यांदा पूर्ण लॉकडाऊन केलं. तर नेदरलँडमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला. आता लॉकडाऊनच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लसीकरण बंधनकारक केल्यानं स्पेनमधील नागरिक संतप्त झालेत. ऑस्ट्रियात लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शनं सुरु आहेत. नेदरलँडमध्ये निर्बंधाच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत, तर लसीकरणाचा पास बंधनकारक केल्यानं स्पेनच्या नागरिकांची निदर्शने सुरु आहेत.

इटलीमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांची तपासणी केली जातेय

इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं नागरिकांना मास्क बंधनकारक करण्यात आलंय. नागरिकांनी मास्क घातलं की नाही याबाबत तपासणी करण्यात येत आहे. तर ब्रिटनमध्ये अवघ्या काही दिवसांत ओमिक्रॉन बाधितांची संख्या 160 वर पोहचलीय. परदेशातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांना कोरोना चाचणी आणि विलगीकरण बंधनकारक करण्यात आलंय. परदेशातून आलेल्या प्रवाशांना विलगीकरणासाठी हॉटेलही मिळत नसल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय.

जर्मनीमध्ये लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी

जर्मनीमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 378 रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आलंय. लसीकरण न झालेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी आहे. या निर्बंधाचं स्वागत जर्मनमधील नागरिकांनी केलंय. जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी असं आवाहनही मावळत्या चॉन्सलर अँजिला मर्केल यांनी केलंय. जर्मनीमध्ये निर्बंधाचं स्वागत होत असताना ऑस्ट्रेलियामध्ये लससमर्थक आणि विरोधकांनी रॅली काढत आमने-सामने आलेत.

रशियात कोरोनाचा विस्फोट

रशियामध्येही कोरोनाचा विस्फोट झालाय. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 32,974 रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,215 कोरोनाबळी गेले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोना चाचणी आणि 14 दिवसांचं विलगीकरण बंधनकारक करण्यात आलंय.

गेल्या 24 तासांत 32,974 कोरोनाबाधित 1,215 कोरोना रुग्णांचा मृत्यू ऑक्टोबर महिन्यात 74,893 कोरोनाबळी

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची जगभरातच धास्ती आहे. भारतातही पाच रुग्ण सापडले आहेत. अशा या भीतीच्या वातावरणात WHO ने मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा 40 देशांत प्रसार झाला असला तरीही या व्हेरिएंटमुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्याऱ्या आरोग्य सेविकांचा डॉन्स व्हायरल होत आहे. (Corona infection in children in South Africa, worldwide fears about Omicron)

इतर बातम्या

Omicron cases: धोका वाढला! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लहान मुलींना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

Omicron cases: पुण्यात उद्यापासून टेस्टिंग आणि ट्रेसिंग; ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन लागलं कामाला

' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.