मोदींच्या पंजाब दौऱ्यामुळे चर्चेत आलेल्या ‘हुसैनीवाला’चं मराठी कनेक्शन माहित आहे? याच गावात ‘मराठ्यां’नी मर्दुमकी गाजवली !

पण हे गाव जेवढं भारतीयांच्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे तेवढंच ते पाकिस्तानच्याही आहे. कारण याच गावात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चार क्रांतीकारक विसावलेले आहेत. तर 1965 च्या भारत पाक युद्धात मराठ्यांनी इथं शौर्य दाखवलं. त्याला स्वतंत्र भारताच्या इतिहासात गौरवाचं स्थान आहे.

मोदींच्या पंजाब दौऱ्यामुळे चर्चेत आलेल्या 'हुसैनीवाला'चं मराठी कनेक्शन माहित आहे? याच गावात 'मराठ्यां'नी मर्दुमकी गाजवली !
हुसैनीवालामध्येच 1965 च्या युद्धात मराठा बटालियननं पाकड्यांना धूळ चारली- फोटो सौ-फिरोजपूर प्रशासन
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 9:00 AM

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर होते. फिरोजपूरला त्यांची राजकीय सभा होती. पण त्या सभेला जात असतानाच त्यांचा काफीला काही आंदोलकांनी अडवला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चुक झाल्याचं लक्षात आलं. त्यावर टिका टिप्पणीही झाली. पण मोदींचा कॉनव्हॉय नेमका कुठे अडकला हे सांगत असताना एका गावाचा उल्लेख पुन्हा पुन्हा येतोय आणि हे गाव आहे हुसैनीवाला.

पंजाबच्याच फिरोजपूर जिल्ह्यात हे एक छोटसं गाव आहे. पण हे गाव जेवढं भारतीयांच्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे तेवढंच ते पाकिस्तानच्याही आहे. कारण याच गावात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चार क्रांतीकारक विसावलेले आहेत. तर 1965 च्या भारत पाक युद्धात मराठ्यांनी इथं शौर्य दाखवलं. त्याला स्वतंत्र भारताच्या इतिहासात गौरवाचं स्थान आहे.

भगतसिंग, सुखदेव, राजगुरु भारताचा इतिहास हा भगतसिंग, सुखदेव, आणि राजगुरु ह्या तीन नावांशिवाय पूर्ण होत नाही. सेंट्रल असेंब्ली बाँबस्फोट प्रकरणी तसच ब्रिटीश अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी ह्या तीनही क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यावरुन मोठा वाद झाला. फक्त पंजाबच नाही तर महाराष्ट्रातही ब्रिटीशांच्याविरोधात संताप व्यक्त झाला. कारण भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्यापैकी शिवराम राजगुरु ह्या मराठमोळ्या क्रांतीकारकाचं नाव तोपर्यंत घराघरात पोहोचलं होतं. ते पुणे जिल्ह्यातल्या खेडचे. तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी तीनही क्रांतीकारकांची फाशी रद्द व्हावी म्हणून प्रयत्न केले. महात्मा गांधींच्या भूमिकेबद्दल तर आजही वाद विवाद होतो. चर्चा होते. पुढेही होत राहील. पण शेवटी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु ह्या तीनही क्रांतीकारकांना ब्रिटीश सरकारनं 23 मार्च 1931 रोजी फासावर लटकवलं आणि त्यांचे अंत्यसंस्कार ज्या गावात केले गेले त्या गावचं नाव आहे हुसैनीवाला. याच हुसैनीवालामध्ये बुटकेश्वर दत्त हे आणखी एक क्रांतीकारक विसावले आहेत. एवढच नाही तर क्रांतीकारक भगतसिंग यांच्या आई विद्यावती यांच्यावरही याच हुसैनीवालामध्ये अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हुसैनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारक आहे.

राष्ट्रीय शहीद स्मारकात तीनही शहीदांचं शिल्प फोटो. सौ. विकि.

हर हर महादेव हुसैनीवाला हे बॉर्डर गाव आहे. तुम्हाला आठवत असेल तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग म्हणाले की, मोदींचा काफिला जिथं रोखला गेला, तिथून पाकिस्तानसोबतची बॉर्डर फक्त 10 कि. मी. आहे. त्यावरुनच हुसैनीवालाचं लोकेशनचा अंदाज आपल्याला आला असणार. पंजाबला समृद्ध करणाऱ्या सतलज नदीच्या काठावर हुसैनीवाला गाव आहे. हे नाव सुफी संत गुलाम हुसैनीवाला यांच्यावरून पडलेलं आहे. त्यांची समाधीही या ठिकाणी आहे. 1965 मध्ये भारत पाकिस्तान यांच्या युद्धाचा भडका उडाला, त्यावेळेस पाकिस्ताननं ज्या गावावर हल्ला केला ते होतं हुसैनीवाला. त्यांना हुसकावून लावण्याची जबाबदारी त्यावेळेस दिली गेली ती मराठा इन्फ्रंटीवर. मराठ्यांचा बेस होता मथूरा. मराठा लाईट इन्फ्रंटीच्या अवघ्या 24 सैनिकांनी पाकड्यांना सळो की पळो करुन सोडलं. 19 आणि 20 सप्टेबर 1965 अशा दोन दिवसात हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत मर्दुमकी गाजवली. शेवटी पाकडे दारु गोळा, शस्त्राअस्त्र मागे ठेवून पळून गेले. मराठा बटालियन अस्तित्वात आलीय 1768 साली. स्वतंत्र भारताच्या इतिहासातलं हे पहिलं युद्ध होतं जे मराठ्यांनी काळीज लावून जिंकलं. मराठ बटालियनचा हा 22 वा ऐतिहासिक विजय होता. याच युद्धातून लेफ्टनंट केएम पलांडे, लेफ्टनंट फेरोज डॉक्टर, लेफ्टनंट एस देशपांडे, रामदास सोमवंशी, विष्णू कदम, लक्ष्मण शिंदे, शामराव चव्हाण, नारायण मोरे, डागा निकम, बबन फाळके, वासू नाईक, रघुनाथ चाळके, शंकर भोसले, महादेव पास्ते अशी नावं कायमची अजरामर झाली.

हुसैनीवाला रिट्रीट हुसैनीवाला हे ऐतिहासिक गाव आहे. 1961 पर्यंत हे गाव पाकिस्तानमध्ये होतं. पण तत्कालीन सरकार आणि पाकिस्तानमध्ये काही गावांची अदलाबदल झाली आणि त्यात हुसैनीवाला भारताच्या ताब्यात आला. त्या एका गावाच्या बदल्यात भारतानेही पाकिस्तानला 12 गावं दिली. याच गावातून दोन्ही देशात आधी व्यापारही व्हायचा पण सध्या तरी तो बंद आहे. पण याच गावात जसा वाघा बॉर्डरवर बिटींग द रिट्रीट सोहळा होता तसाच इथेही होतो. रोज सायंकाळी सहा वाजता दोन्ही देशाचे सैनिक ह्या सोहळ्यात सहभागी होतात. तो पहाण्यासाठी देशभरातून पर्यटक जमा होतात. पण मराठी माणूस ज्यावेळेस इथं जातो त्यावेळेस त्याच्या मनात संमिश्र भावना दाटतात. एकाच वेळेस त्याच्या कानात मराठ्यांच्या हर हर महादेवच्या घोषणा घुमत असतात तर दुसऱ्या वेळेस भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या बलिदानाने डोळे पानावतात.

हे सुद्धा वाचा: 07 January 2022 Panchang | कसा जाईल आजचा दिवस? काय सांगतंय पंचांग, जाणून घ्या ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

घराघरात सर्दी-खोकल्याचे रुग्ण, डॉक्टरच म्हणतात, टेस्ट केली तर अर्ध्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह

NEET PG Counselling 2021 Live : वैद्यकीय अभ्यासक्रमातील EWS आरक्षणाचं काय होणार? सुप्रीम कोर्ट निर्णय जाहीर करणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.