‘मागे व्हा, तुम्ही ब्राम्हण नाही!’ असं म्हटल्यानंतर गांधींनी टिळकांच्या अंत्ययात्रेत नेमकं काय केलं?

गांधी मरत का नाही? या नावाचं पुस्तक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि अभ्यासक चंद्रकात वानखेडे यांनी लिहिलं असून, त्यांनी केलेल्या एका भाषणात गांधीसोबतचे त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग उलगडून सांगितले आहेत.

'मागे व्हा, तुम्ही ब्राम्हण नाही!' असं म्हटल्यानंतर गांधींनी टिळकांच्या अंत्ययात्रेत नेमकं काय केलं?
महात्मा गांधीजी आणि लोकमान्य टिळक
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 7:30 AM

अस्पृश्यता देव मानत असेल, तर असा देव मानायला मी तयार नाही, असं विधान लोकमान्य टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) यांनी म्हटलं होतं. अस्पृश्यता निवारण परिषदेत लोकमान्य टिळक यांनी हे विधान केलं होतं. पण याच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेवेळी महात्मा गांधीसोबत (Mahatma Gandhi) घडलेला एक प्रसंग ऐतिसाहिक आहे. गांधीची ज्या दिवशी हत्या झाली, त्या दिवशी नेहरुंनी (Neharu) जेव्हा याबाबतचं वृत्त संपूर्ण देशाला रेडिओवरुन संबोधित करताना दिलं होतं, तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. पण जेव्हा टिळकांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत महात्मा गांधी यांनी जे भोगलं, ती घटनाही देशातील जातीभेदाची भिंत किती उंच बनली होती, हे पाहून गांधीना देखील हादरा बसला होता. 30 जानेवारीला गांधींची हत्या झाली. त्यांच्या हत्येला अनेक वर्ष झाली. पण आजही गांधीजी यांच्या विचारांनी त्यांना जिवंत ठेवलंयस हे अधोरेखित करणारी ही घटना लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेत घडली होती.

काय घडलं होतं?

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेत गांधी होते. त्यांच्या अंत्ययात्रेत टिळकांना खांदा द्यायला गांधी पुढे गेले. तेव्हा त्यांना मागे खेचण्यात आल्याचं चंद्रकात वानखेडे यांनी आपल्या एका भाषणात म्हटलंय. अक्षरशः गांधीना अंत्ययात्रेत मागे खेचलं जातं. त्यांना सांगितलं जातं की, तुम्ही ब्राम्हण नाही आहात, त्यामुळे टिळकांच्या शवाला खांदा देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ही वाक्य ऐकून गांधीजींना मोठा धक्काच बसला होता. देशातील जातीभेदाचा सामना राष्ट्रपित्यालाही करावा लागला होता, हे या घटनेतून सिद्ध होते. दरम्यान, जेव्हा अंत्ययात्रेत गांधीजींसोबत हा प्रसंग घडला, तेव्हा गांधीजी प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांना मोठा हादराच बसला होता. अखेर गांधी पोटतिडकीनं पेटून उठले आणि यानंतर त्यांनी प्रचंड आक्रमकपणे जी गोष्ट केली, त्याचा किस्साही चंद्रकात वानखेडे यांनी आपल्या भाषणात नमूद केलाय.

लोकमान्य टिळकांच्या पार्थिवाला गांधी अखेर खांदा देतातच. समाजसेवकाला जात असत नाही, ती मी मानत नाही, असं त्यांनी तेव्हा गांधीनी अंत्ययात्रेतमागे खेचणाऱ्यांना सुनावलं होतं. गांधीजींचा हा आक्रमक पावित्रा पाहून कुणाचीच तेव्हा हिंमत त्यांना रोखण्यासाठी होत नव्हती, असंही चंद्रकांत वानखेडे यांनी म्हटलंय. यावरुन गांधी त्याप्रसंगी किती कठोर बनले होते आणि किती संतापून त्यांनी तेव्हा जातीभेदावरुन सुनावलं होतं याची कल्पना करता येऊ शकेल. द्वादशीवारांनी याबाबत सांगितलं असल्याचा दावा चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या भाषणात केला आहे.

जातीसोबतच धर्मालाही ठेचलं!

पण गांधीजी किमान हिंदू तरी होते. ब्राम्हण जरी नसले, तरी किमान त्यांचा धर्म वेगळा नव्हता. पण तो काळ हा जातींच्या भेदाचा तर होताच. पण धर्माच्याही भेदाचा होता, हे वेगळं सांगायला नकोच. याच जाणिवेतून गांधीनी फक्त जातीच्या भिंती तोडल्या नाहीत, तर धर्माच्या भिंती तोडायला वेळप्रसंगी कमी केलं नाही. याचच उदाहरण चंद्रकांत वानखेडे यांनी पुढे दिलंय.

टिळकांच्या अंत्ययात्रेला अखेर गांधीनी स्वतः तर खांदा दिलाच. पण धर्माने मुस्लिम असलेल्या शोकत अली यांनाही खांदा द्यायला लावतात आणि शौकत अली देखील टिळकांच्या पार्थिवाला खांदा देतात, या घटनेचंही मोठं महत्त्व आहे. पण ही आठवणच आता फार मोजक्या लोकांना लक्षात आहे, असंही चंद्रकात वानखेडे यांनी सांगितलं आहे. गांधी द्वेषाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याला वेगवेगळ्या घटना जशा सांगितल्या जातात, त्यापैकीच ही देखील एक घटना असू शकते, अशी शक्यताही काही अभ्यासक व्यक्त करतात.

टिळक जातीभेद मानत होते की नव्हते?

ज्या लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेत ऐतिहासिक प्रसंगाला गांधीना सामोरं जावं लागलं, ते टिळक जातीभेद मानत होते का? अस्पृश्यता मानत होते का? हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे. अस्पृश्यता निवारण समितीच्या जाहिरनाम्यात टिळक सुरुवातील सही करण्यास टाळाटाळ करतात. त्यानंतर एका क्षणी टिळक त्या अस्पृश्यता निवराण समितीच्या जाहिरनाम्यावर सहीदेखील करायला जातात. पण त्याच्यासोबत असलेली करंदीकर आणि इतर मंडळी त्यांना त्या जाहिरनाम्यावर सही करु देत नाहीत, असं चंद्रकांत वानखेडे यांनी एका भाषणात म्हटलंय. आम्ही सारे फाऊंडेशनच्या युट्युब चॅनेलवर 18 ऑक्टोबर रोजी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अखेरपर्यंत टिळक अस्पृश्यता निवारण समितीच्या जाहिरनाम्यावर सही करत नाहीत.

यावरुन लोकमान्य टिळक यांच्याबाबतही एक गोष्ट लख्खपणे दिसून येते. लोकमान्य टिळक यांना अस्पृश्यतेची भिंत तोडायची होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केला. पण एका मर्यादेपलिकडे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले, असं चंद्रकात वानखेडे यांनी वर्णन केलेल्या प्रसंगावरुन अधोरेखित होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती फार विचित्र होती. एकीकडे आगरकर विरुद्ध टिळक, फुले विरुद्ध टिळक असा संघर्षही दिसला. या संघर्षामध्ये राजकीय स्वातंत्र्य हवं असेल, तर तिथे सामाजिक प्रश्नांना स्थान नाही, असं अधोरेखित झालंय, असं एके ठिकाणी चंद्रकांत वानखेडे आपल्या भाषणात म्हणतात.

म्हणून गांधी मरत नाही..!

1915 मध्ये गांधी भारतात परतले. 1917 मध्ये ते आपल्या स्वातंत्र्य चळवळीची दिशा स्पष्ट करताना गांधीजींनी म्हटलं होतं की, या देशाच्या सर्वोच्च पद्दी भंग्याची किंवा चांभाराची मुलगी असेल, हे माझं स्वप्न आहे. यावरुनच गांधीजींनी जातीभेदाच्या भिंती तोडण्यासाठी, धर्मभेदाची दरी कायमची मिटवण्यासाठी किती तळमळीनं प्रयत्न करायचे होते, हे अधोरेखित होतं. इतकंच काय तर 1920 मध्ये गांधी स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्याच्या नेतृत्त्वाच्या केंद्रस्थानी येतात आणि 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होते, हा देखील योगायोगाचा भाग नाही, असं देखील चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय.

गांधींची 30 जानेवारीला हत्या करण्यात आली. मात्र त्यांच्या हत्येनंतर आजही गांधी फक्त भारतातच नाही तर जगभरात आपल्या विचारांमधून जिवंत आहे. आपल्या अलौकिक विचिरांनी त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. ही प्रेरणा इतकी ताकदवर होती आणि प्रभावशाली होती, की भारतात कुणालाच गांधींना टाळून पुढे जाता येत नाही. आश्चर्याची गोष्ट अनेकदा गांधींना सोबत ठेवणंही अनेकांना जड जातं, तेही याच कारणामुळे.

संबंधित बातम्या :

BJP गांधीवादी कधीपासून झाली? Sharad Pawar यांचा सवाल | Mahatma Gandhi

‘हां मैने गांधी का वध किया’, नेहमी छत्रपतींची भूमिका साकारणाऱ्या कोल्हेंच्या ‘नथूराम गोडसे’त नेमकं काय आहे?

केंद्रातील भाजपा सरकारकडून गांधी विचार संपवण्याचा डाव  –  नाना पटोले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.