Gold Price: सोन्याचे दर 48 हजारांच्या खाली, आता गुंतवणुकीची योग्य संधी?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (Gold Rate on MCX) वर आज सोन्याची किंमत सुमारे 47,300 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. तर काल सोन्याचा दर प्रति तोळा 48,000 रुपयांवर पोहोचला होता.

Gold Price: सोन्याचे दर 48 हजारांच्या खाली, आता गुंतवणुकीची योग्य संधी?
सोन्याचे दर 48 हजारांच्या खाली
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 7:37 PM

मुंबई : सध्या सणासुदीचा काळ आहे. तसेच एक महिन्यानंतर दिवाळीनंतर लग्नसराईही सुरु होईल. त्यामुळे सोने खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याचा सध्याचा भाव (Latest Gold Price) जाणून घेणे आवश्यक आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (Gold Rate on MCX) वर आज सोन्याची किंमत सुमारे 47,300 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. तर काल सोन्याचा दर प्रति तोळा 48,000 रुपयांवर पोहोचला होता. सोन्याच्या दरातील ही घसरण प्रॉफिट बुकिंगमुळे आली असल्याचे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणारी महागाई आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमकुवतता या कारणांमुळे पुढील महिन्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. (Gold prices below 48,000, now the right investment opportunity)

आताच करा गुंतवणूक

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला $ 1720 प्रति औंस भाव आहे. सोन्याचा भाव या खाली येणे कठीण असल्याचे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय अल्पावधीतच सोन्याची किंमत 1800 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याची अपेक्षाही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आणखी एक महिन्यानंतर सोन्याचे दर $1850 प्रति औंसच्या पातळीवर जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यानंतर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील किंमतीवरही होतो. त्यामुळे सध्याच्या 47,300 रुपये प्रति तोळाच्या किंमतीवर सोने खरेदी करू शकतात, असा सल्ला त्यांनी गुंतवणूकदारांना दिला.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार आणखी एका तज्ज्ञांच्या मते, ‘यूएस फेडने व्याजदर कधी वाढवतील याबाबत अजून सांगितले नाही. हा निर्णय देखील सोन्याच्या बाजूनेच आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार सध्याच्या पातळीवर सोने खरेदी करू शकतात. एमसीएक्सवर सोन्याचे भाव वाढण्याची अपेक्षा आहे. पुढील एका महिन्यात 49,600 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतात.’

दसऱ्याला सोन्याची रेकॉर्डब्रेक विक्री होण्याचा अंदाज

दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदीसाठी गर्दी होईल, हा सराफा व्यावसायिकांचा अंदाज बहुतांश खरा ठरला. सऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात सोन्याची खरेदी-विक्री 350 ते 400 कोटी तर मुंबईत 200 कोटींचा टप्पा गाठेल, असा विश्वास सराफा बाजाराने व्यक्त केला होता. सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी येणारा ग्राहक नाण्यांपेक्षा दागिन्यांना अधिक महत्त्व देत आहे नाण्यांच्या खरेदीचे प्रमाण 40 टक्के आहे. तर दागिन्यांच्या खरेदीचे प्रमाण 60 टक्के आहे. हॉलमार्किंगच्या दागिन्यांसह शुद्ध सोन्याची खरेदी विक्री देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या बाजारात तेजी कायम राहील. बाजारात मोठी बुकिंग आहे कारण गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठा पूर्णपणे ठप्प होत्या. आता मात्र बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत, असे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले होते. (Gold prices below 48,000, now the right investment opportunity)

इतर बातम्या

‘या’ स्मॉल फायनान्स बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सर्वकाही

घरबसल्या Postal Life Insurance bond साठी अर्ज कसा कराल; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया?

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.