कोरोना लस टोचल्यानंतरही साईड इफेक्ट झाल्यास मेडिक्लेमचे पैसे मिळणार? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…..
कोरोना लसीची खरंच साईड इफेक्ट आढळले तर उपचार कसा होणार, इन्शुरन्स कंपनी (Insurance company) त्याचा क्लेम देणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे (Corona vaccine side effect).
मुंबई : देशासह जगभरातील शेकडो नागरिक आज कोरोना लसीची वाट पाहत आहेत. भारतात लवकरच कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोना लस घेतली तर साईड इफेक्ट होणार तर नाही ना, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. यादरम्यान, खरंच साईड इफेक्ट आढळले तर उपचार कसा होणार, इन्शुरन्स कंपनी (Insurance company) त्याचा क्लेम देणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे (Corona vaccine side effect).
ज्या लोकांनी मेडीकल इन्शुरन्स केलं आहे, अशा लोकांच्या मनात याबाबतचे प्रश्न सतावत आहेत. दरम्यान लसीचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी लस दिल्यानंतर साईड इफेक्ट आढळल्यास त्याला कंपनी जबाबदार नसल्याचं स्पष्टीकण दिलं आहे. याशिवाय सरकारनेदेखील याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. यादरम्यान लसीची साईड इफेक्ट आढळल्यास इन्शुरन्स कंपन्या पैसे देतील का? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत (Corona vaccine side effect).
तज्ज्ञ काय म्हणतात?
Finway FSC चे डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स अमित शर्मा यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. मेडीकल इन्शुरन्स कंपन्या त्याचा क्लेम देतील. कुणाला जर कोरोना लसीचा साईड इफेक्ट होईल तर विमा कंपन्या त्यासाठी उत्तरदायी आहेत. जर कुणाची पॉलिसी चार वर्ष जुनी आहे आणि ती व्यक्ती निरोगी आहे, त्या व्यक्तीला लस घेतल्यानंतर साईड इफेक्टल आढळल्यास त्यांना विमाकवच मिळेल.
Investogrow चे संस्थापक अंकुर सिन्हा यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “विमा कंपन्या कोरोनावर लस देत आहेत तर लसीची साईड इफेक्ट झाल्यावरही क्लेम देतील”, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.
Vidal Health चे चेअरमन गिरीश राव यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “खरंतर सरकारकडून अनेकवेळा लसीची चाचणी केली जाते. त्यामुळे साईड ईफेक्टचयी शक्यता फार कमी असते. मात्र, तरीही कुणालाही त्रास झाला तर अॅडमिट करावं लागतं. अशाप्रकारे कोणती केस आढळल्यास संबंधित रुग्णाला क्लेम दिला जाईल. विम्यात कोरोना कवर होतोय, तर हेदेखील कवर होईल”, असं त्यांनी सांगितलं.