खडसे विरुद्ध पाटील कलह विकोपाला गेला, त्याची सुरुवात कुठून झाली? त्याची गोष्ट

रोहिणी खडसेंवरील हल्ल्याची दखल घेत राज्य महिला आरोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना तातडीनं तपास करण्याचे आदेश दिलेत.

खडसे विरुद्ध पाटील कलह विकोपाला गेला, त्याची सुरुवात कुठून झाली? त्याची गोष्ट
रोहिणी खडसे, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 11:35 PM

जळगावमधील राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटलाय. एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर जळगावात खडसे विरुद्ध पाटील कलह विकोपाला गेलाय. रोहिणी खडसेंवरील हल्ल्यामागे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप करून एकनाथ खडसेंनी खळबळ उडवून दिलीय.

हल्ल्यामागे कोण?

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावरील प्राणघाताक हल्ल्यानंतर जळगावातील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. सोमवारी रात्री रोहिणी खडसे जळगावातील चांगदेवमधून एका हळदी समारंभ कार्यक्रमानंतर मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला झाला. त्यानंतर रोहिणी खडसेंनी शिवसैनिकांवर हल्ल्याचा आरोप करत काही स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावं उघड केली. तर एकनाथ खडसेंनी या हल्ल्यामागे थेट शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप केलाय.

रोहिणी खडसेंवरील हल्ल्याची दखल घेत राज्य महिला आरोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना तातडीनं तपास करण्याचे आदेश दिलेत. तर भाजप खासदार आणि एकनाथ खडसेची सून रक्षा खडसेंनी देखील रोहिणी खडसेंची भेट घेत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केलीय.

गुन्हा दाखल चौकशी सुरु

रक्षा खडसे यांनी राजकीय फायद्यसाठी ही करण्यात आल्याता आरोप करत गुन्हा नोंद करून शिक्षा दिलीच पाहिजे अशी मागमी केली आहे. तर रुपाली चाकणकर यांनीही पोलिसांनी तातडीनं चौकशी करावी, असं म्हटलंय. रोहिणी खडसेंवरील या हल्ल्याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत आहेत.

मात्र फक्त गुन्हाच नाही तर कडक कारवाईची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं खडसेंनी म्हंटलंय. त्याच वेळी आमदार चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या त्रास देत असल्याची तक्रारही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय. एकूणच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जळगावात झाडल्या जात आहेत.

वाद विकोपाला

याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षांच्या विनयभंगासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिपच्या आरोपांवरूनही खडसे आणि पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या होत्या. चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंमुळे माझ्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला होता. तर गुन्हा नोंद झाल्यानं आमदाराचे धाबे दणाणलं आहे, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला होता. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ओडिओ क्लिपशी माझा संबंध स्पष्ट केले तर आमदारकीचा राजीनामा देईन, असं चॅलेंज दिलं होतं. या सगळ्यात आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दीक चकमकीनंतर आता रोहिणी खडसेंवरील हल्ल्यानंतर जळगावात खडसे-पाटील वाद अगदी विकोपाला पोहोचलाय, हेच पुन्हा अधोरेखित झालंय.

इतर बातम्या –

सुरुवात प्राण्यांच्या वादानं शेवट सामोपचारानं, अजित पवारांच्या मतावर फडणवीस समाधानी कसे? वाचा सविस्तर

Assembly Session | विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन विधानसभेत गदारोळ, सभागृहात घोषणाबाजी

अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता कोण ? लोक म्हणतात फक्त दादा, अजित पवार यांना 42 टक्के लोकांची पसंती !

'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.