कमळवाला आणि कमला, भातखळकरांच्या ट्विटनं भुवया उंचावल्या, नेटकरी म्हणतात, Tweet Of The Day
कमळवाला आणि कमला. अनेकांना हे दोन्ही शब्द खटकतायत. यात काय खटकण्यासारखं आहे त्यावर नेटकऱ्यांमध्ये वाद आहेत. काहींनी कमला विथ जुमला अशी टिका केलीय तर अनेकांनी भातखळकरांना ट्रोल करत वेगवेगळे कमेंट केलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरीकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांची काल वाशिंग्टन डीसीमध्ये भेट झाली. राष्ट्रपती जो बायडन यांच्या भेटीपूर्वीच कमला हॅरीस आणि मोदी भेटले. ही भेट सर्वांसाठीच विशेष आहे. कारण कमला हॅरीस ह्या मुळ भारतीय वंशाच्या आहेत. त्यांची आई अमेरीकेत गेली आणि तिकडेच ते नंतर स्थाईक झाल्या. मोदी-कमला हॅरीस भेटीची चर्चा झाली नसेल तर नवलच. त्यातल्या त्यात नेटवर तर दोघांच्या भेटीबद्दल मिम्सचा पाऊस आलाय. गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून ते नाशिकच्या मिसळीपर्यंत. काही मिम्स हे मार्मिक आहेत तर काहींचा दर्जा एकदमच क आहे. ह्या सगळ्या भेटीवर खुद्द भाजपच्या आमदारांनी जे ट्विट केलंय ते मात्रं खास चर्चेत आहे. आणि हे ट्विट दुसरं तिसरं कुणाचं नसून शिवसेनेवर तुटून पडणाऱ्या अतूल भातखळकरांचं आहे.
का विशेष आहे ट्विट? अतूल भातखळकरांकडे सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आहे. त्यामुळे ते ठाकरे सरकारवर कुठल्याही मुद्यावर तिखट भाषेत टिका करतात. त्यांचे काही काही ट्विट तर एकदम नांगीसारखे टोकदार असतात. विरोधकांचा समाचार घेताना ते कुठलीच दयामाया दाखवत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या ट्विटच्या बातम्याही होतात. आता भातखळकरांनी जे मोदी-कमला हॅरीस भेटीवर ट्विट केलं ते मात्र अनेकांच्या भुवया उंचावणारं आहे. कारण मोदी आणि कमला हॅरीस यांचा एक फोटो ट्विट करत त्यांनी फोटोला कॅप्शन दिलंय- कमळवाला आणि कमला. अनेकांना हे दोन्ही शब्द खटकतायत. यात काय खटकण्यासारखं आहे त्यावर नेटकऱ्यांमध्ये वाद आहेत. काहींनी कमला विथ जुमला अशी टिका केलीय तर अनेकांनी भातखळकरांना ट्रोल करत वेगवेगळे कमेंट केलेत. पण भातखळकरांचं हेच ट्विट 2 हजारपेक्षा जास्त जणांनी ट्विट केलंय तर 133 जणांनी रिट्विट केलंय.
कमळवाला आणि कमला… pic.twitter.com/3ltQvnokYg
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 24, 2021
कमला हॅरिस यांना पूर्वजांच्या आठवणी भेट अमेरिकेच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि अमेरिकेला नैसर्गिक सहकारी म्हणून संबोधलं. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध नवीन उंचीवर पोहोचतील. पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनाही भारत भेटीचे आमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक भेटवस्तू दिल्या. त्यातील एक महत्त्वाची आणि कमला यांच्या हृदयाच्या जवळची भेटवस्तू म्हणजे, कमला हॅरिस यांचे आजोबा पी व्ही गोपालन यांच्या आठवणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना गोपालन यांच्याबद्दलच्या माहितीची एक लाकडी फ्रेम गिफ्ट केली. या लाकडी फ्रेमवर हस्तकला करुन गोपालन यांच्याबद्दलची माहिती कोरण्यात आली आहे. पी व्ही गोपालन हे भारतात वरीष्ठ सरकारी अधिकारी होते. त्यांनी विविध पदांवर कामही केलं. दरम्यान, ते भारतात पुनर्वसन मंत्रालयात सहसचिव पदावर काम करत होते. मात्र 28 जानेवारी 1966 ला त्यांची झांबिया सरकारनमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली. तिथे त्यांनी निर्वासितांचे मदत, पुनर्वसन मंत्रालयात संचालक करण्यात आलं.
PM Modi At UNGA: अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी केला जाऊ नये, मोदींनी पाकसह चीनलाही ठणकावलं