Namdeo Dhasal: ‘पँथर’च्या सुवर्ण महोत्सवाचे खरे हकदार: नामदेव ढसाळ

'नोबेल' विजेते नायपॉल यांनाही ज्यांना भेटायचा मोह अनिवार झाला, असे नोबेलसाठी योग्यता असूनही केवळ 'पद्मश्री'चे धनी ठरलेले पँथर नेते नामदेव ढसाळ म्हणजे दलित चळवळीतील सर्वोच्च शोकांतिकेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल.

Namdeo Dhasal: 'पँथर'च्या सुवर्ण महोत्सवाचे खरे हकदार: नामदेव ढसाळ
'पँथर'च्या सुवर्ण महोत्सवाचे खरे हकदार: नामदेव ढसाळ
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 7:30 AM

■ दिवाकर शेजवळ divakarshejwal1@gmail.com

‘नोबेल’ विजेते नायपॉल यांनाही ज्यांना भेटायचा मोह अनिवार झाला, असे नोबेलसाठी योग्यता असूनही केवळ ‘पद्मश्री’चे धनी ठरलेले पँथर नेते नामदेव ढसाळ म्हणजे दलित चळवळीतील सर्वोच्च शोकांतिकेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. आपल्यातील एका महान प्रतिभावंत साहित्यिकाला ‘जिवंत’ राखण्याच्या जीवघेण्या संघर्षात खर्ची पडलेला लढाऊ, पण प्रेमळ पँथर नेता म्हणजे नामदेव ढसाळ. दलित पँथरच्या स्थापनेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. हा महोत्सव साजरा करण्यासाठी सध्या निरनिराळ्या ‘छावणी’त बैठका सुरू झाल्या आहेत. पँथर चळवळीचे साक्षीदार असलेले अनेक नेते, विचारवंत, कार्यकर्ते त्या निमित्ताने लिहू लागले आहेत. त्यांच्या ग्रंथरूपी आठवणींतून एका रोमांचक इतिहासाला उजाळा मिळणार आहे. अन त्यातून राजा ढाले, नामदेव ढसाळ, भाई संगारे, एस एम प्रधान, मनोहर अंकुश, रमेश इंगळे, टी एम कांबळे, उमाकांत रणधीर अशा अनेक पँथर नेत्यांच्या स्मृती जागणार आहेत.

आज नामदेव ढसाळ यांची जयंती आहे. ते दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवात हयात असते तर……? हा महोत्सव साजरा करण्याचा नैतिक आणि सर्वाधिक अधिकार असलेले पँथर नेते ठरले असते, हे निर्विवाद सत्य आहे. प्यान्थरच्या नशिबी मृत्यू दोनदा आला, असे म्हटले पाहिजे। पहिला मृत्यू राजा ढाले यांनी केलेल्या बरखास्तीमुळे ओढवलेला. पण त्यावेळी प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे यांनी प्यान्थरला जीवदान दिले होते. नन्तरच्या काळात नामांतर आंदोलनामुळे तो वाढीवाची लागला होता. पण 1990 सालात झालेल्या रिपब्लिकन ऐक्यात प्यान्थरचा पुन्हा बळी दिला गेला. त्या नन्तर प्यान्थर ची प्रकर्षाने गरज आणि आठवण अनेकदा अनेकांना जाणवली. प्यान्थरला जीवदान देण्याचे प्रयत्न बऱ्याच जणांनी केलेही. पण प्यांथर चा चेहेरा असलेले रामदास आठवले हे रिपब्लिकन नेते बनून गेले होते. त्यामुळे आठवले यांना वजा केलेली प्यांथर नन्तर कोणी स्वीकारली नाही. तरीही नामदेव ढसाळ मात्र अखेर पर्यंत प्यांथर म्हणूनच जगले! रिपाइंमध्ये आठवले यांच्यासोबत वावरतानाही ते दरवर्षी ९ जुलै रोजी प्यान्थरचा वर्धापन दिन साजरा करत राहिले.

प्यान्थर मेली, साखर वाटा!

पण दलित प्यान्थरचा वर्धापन दिन हा केवळ उपचार उरला होता, हेच यातनादायक वास्तव होते. तसे मी ‘लोकनायक’ला कार्यकारी संपादक असताना एकदा अग्रलेखातून लिहून टाकले होते. पण कवी हृदयाचे नामदेव ढसाळ यांचे हळवे, संवेदनशील मन मात्र ते वास्तव स्वीकारायला तयारच नव्हते. माझ्यावर अतिशय प्रेम करणारे ढसाळ माझ्या त्या अग्रलेखावर नाराज झाले होते. मग त्यांनी उत्तरादाखल लेख पाठवला होता आणि मी तो लोकनायक मध्ये छापला होता. त्या लेखाला ढसाळ यांनीच दिलेले शीर्षक होते: ‘प्यान्थर मेली, साखर वाटा!’ दलितांवर पुन्हा एकदा हिंसक अत्त्याचार वाढीस लागलेले असताना प्यान्थर नाही याचा त्यांच्या मनातील संतापाचा तो स्फोट होता. अन त्याला पार्श्वभूमी होती खैरलांजी हत्याकांडाची.

प्यान्थरचा दोनदा आपल्या हाताने बळी देण्याचा निर्णय शहाणपणाचा होता, असे कोण म्हणेल? मात्र प्यान्थर वाचवा, असा टाहो ऐक्याच्या वातावरणात फोडलेल्या उमाकांत रणधीर यांच्या सारख्या ज्येष्ठ प्यान्थर नेत्याला त्यावेळी ऐक्यवादी तरुणांच्या उद्रेकाला तोंड द्यावे लागले होते. नामदेवदादांचे दुःख आणि उमाकांत रणधीर यांचा टाहो चुकीचा होता असे कोण म्हणू शकेल? त्या अर्थाने पँथरचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचे खरे आणि सर्वाधिक ‘ हकदार ‘ नामदेव ढसाळ हेच होते. पँथरला जगवण्यासाठी धडपड करतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

ढसाळ खरेच कम्युनिस्ट होते?

आंबेडकरी चळवळीत निरर्थक भावनिक प्रश्नांना फाटा देऊन जो कुणी समाजाच्या थेट हिताशी निगडित मूलभूत प्रश्नांवर… म्हणजे शिक्षण, नोकरी, रोजगार, निवारा, शोषणावर बोलेल त्याला आजवर नेहमीच कम्युनिस्ट ठरवले गेले. त्यातून ‘कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय ‘असा रोकडा सवाल विचारत भूमिहीनांचे ऐतिहासिक आंदोलन करणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाडही सुटले नाहीत. मग तिथे नामदेव ढसाळ यांची काय कथा !

पण कम्युनिस्टांनी मला गिळले तर माझ्यापाशी भिमाची वाघनखे आहेत. मी त्यांची पोटे फाडून बाहेर येईन, असे ठणकावत कर्मवीर दादासाहेबांनी त्यांना कम्युनिस्ट ठरवणाऱ्या, धोतऱ्या अशी संभावना करणाऱ्या सूट बुटातील विद्वान नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. दुर्दैवाने, ढसाळ यांच्या बाबतीत तसे घडले नाही. प्रवाहपतीत होण्याची वेळ त्यांच्यावरच आली होती.

Panther namdeo dhasal

Panther namdeo dhasal

पँथरच्या बरखास्ती नंतर त्यांच्याआवर चपात्यांचा झालेला मारा ढसाळ यांना कम्युनिस्ट ठरवणाऱयांना असुरी आनंद देऊन गेला. विशेष म्हणजे, त्यांना अशा काळात कम्युनिस्ट ठरवले गेले होते की ज्या काळात शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलेला होता. त्यातच पँथर नेता म्हणून वरळी दंगलीनंतर ढसाळ हे निशाण्यावर निशाण्यावर आलेच होते. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे, वावरणे जोखमीचे झाल्यानंतर तो काळ त्यांनी कसा कंठला असेल हे तेच जाणोत.

अन् चक्रव्यूह भेदून टाकला

पण ते हिकमती होते, यात शंका नाहीच. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला पाठिंबा देऊन त्यांनी चक्रव्यूह भेदून टाकला होता. त्यांची आणि इंदिराजी यांची भेट – मुलाखत दूरदर्शनवरून प्रसारित झाल्यावर तर सारे चित्रच पालटून गेले होते. पँथरच्या सभेनंतर ढसाळ यांना जेरबंद करण्यासाठो टपून बसणारे पोलीस ते दिल्लीहून परतण्याआधी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासोबत त्यांच्या स्वागताला विमानतळावर हजर झाले होते! शिवाय, आणीबाणीला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर नामदेव ढसाळ आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘समविचारी’ ठरल्याने सारे वातावरण पालटून गेले ते वेगळेच.

नंतरची सुमारे चार दशके मायस्थेनिया ग्रेव्हीससारख्या दुर्धर आजाराशी सामना करत, महागडे उपचार करत नामदेव ढसाळ हे कसे जगले ते जगजाहीर आहे. स्वतःमधील साहित्यिकाला जिवंत राखण्यासाठी झुंजत असतांनाच ‘पँथर’लाही जगवण्यासाठी ते धडपडत राहिले. त्यांच्यावर लाचारीचा, तडजोडीचा आरोप करणाऱ्यांना लाख करू देत. पण त्यांनी मतांची दलाली करत सौदेबाजी केली नाही. योग्यता असूनही संसदीय राजकारणात शिरकावासाठो धडपड केली नाही.

Panther namdeo dhasal

Panther namdeo dhasal

बेभरवशाचे आयुष्य

स्वतःची साहित्यिक म्हणून असलेली महती, ख्याती, जागतिक कीर्ती या एकमेव भांडवलावर अक्षरशः हाताने कमवायचे अन पानावर खायचे असे बेभरवशाचे आयुष्य ते अखेरपर्यंत जगले! कामाठीपुऱ्यातील गणिकांसाठी मोर्चेही काढले आणि महालक्ष्मीच्या रेसकोर्सवरील कामगारांची युनियनही चालवली. कामगारांसाठी सायरस पुनावाला यांच्याशी ‘दादागिरी’ ही केली! कोण काय म्हणेल याची कसलीही कदापि पर्वा न करता ‘संपदा’ असलेली स्वतःची प्रतिमा पणाला लावत, दुर्धर व्याधी विकारांशी दोन हात करत परिस्थितीशी टक्कर देत राहिले. पण दरवर्षी एक पुस्तक प्रकाशित करण्याचा परिपाठ कधी बिघडू दिला नाही. पँथरच्या काळात उमाकांत रणधीर यांनी ‘ पँथर कविता’ नावाचे घडीचे एक पत्रक प्रकाशित केले होते. त्यात म्हटले होते: ‘ कोणी पँथर सोडली, पण कविता सोडली नाही. कोणी कविता सोडली,पण पँथर सोडली नाही.’ मात्र पँथर आणि कविता या दोन्हींशी घट्ट नाते अखेरपर्यंत निभावलेले नामदेव ढसाळ हे एकमेव ठरले! त्यांची साहित्य क्षेत्रातील महान कामगिरी ही पद्मश्रीच्या नव्हे, खरे तर नोबेलच्या योग्यतेची होती.

अन् कार्यकर्त्यांचे लाड करणाऱ्या, सहकाऱ्यांना, मित्रांना आवडीचे वाटेल ते मनसोक्त खाऊ पिऊ घालुन त्या आत्मिक आनंदाने तृप्त होणाऱ्या नामदेवदादांना कोणता पँथर विसरू शकेलं? छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याने सुनावलेल्या आपल्या चुका निमूटपणे ऐकून घेणारा, त्या चुका खुल्या दिलाने मान्य करणारा त्यांच्यासारखा निगर्वी आणि अहंकारमुक्त नेता आंबेडकरी चळवळीत दुसरा शोधून सापडणार नाही. त्यांना कोणी लाख कम्युनिस्ट ठरवले तरी हिंसा, सूड, मत्सर, द्वेष,असूया अशा विकारांपासून ते मुक्त होते. बुद्ध विचारांनी संस्कारित झालेल्या सुसंस्कृत मनाचा विरळ नेता होते नामदेव ढसाळ.

(लेखक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत)

संबंधित बातम्या: 

पँथर ते काँग्रेस… नितीन राऊतांचा सामाजिक, राजकीय संघर्ष माहीत आहे का?

वडापाव आणि कटिंग चहावर दिवस काढले, हॉस्टेलमध्ये राहिले, दलित पँथर ते संसद… रामदास आठवलेंचा हा संघर्ष माहीत आहे का?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.