‘कृष्णकुंज’ ते ‘शिवतीर्थ’… कसं आहे राज ठाकरेंचं नवं घर?; वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या नव्या घराची चर्चा सूरू आहे. मात्र आता चर्चेला पूर्णविराम मिळणार असून शनिवारी 6 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजण्या दरम्यानच्या शुभ मुहूर्तावर राज ठाकरे नव्या घरात प्रवेश करणार आहेत. (know about Raj Thackeray's New Home in mumbai)

'कृष्णकुंज' ते 'शिवतीर्थ'... कसं आहे राज ठाकरेंचं नवं घर?; वाचा सविस्तर
Raj Thackeray's New Home
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 12:28 PM

मोहन देशमुख, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या नव्या घराची चर्चा सूरू आहे. मात्र आता चर्चेला पूर्णविराम मिळणार असून शनिवारी 6 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजण्या दरम्यानच्या शुभ मुहूर्तावर राज ठाकरे नव्या घरात प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे यांचा गृहप्रवेश आणि नव्या घराचं नाव काय असेल, याचं सगळ्यांनाच कुतूहल होतं. या प्रश्नाचंही कोडंही आज उलगडलं असून आज भाऊबीजेच्या दिवशी राज ठाकरेंनी नव्या घरात प्रवेश केला आहे. राज यांच्या नव्या घराचे नाव शिवतीर्थ असं ठेवण्यात आलं आहे… त्यामुळे राज यांचं शिवतीर्थ आतूनबाहेरून कसं आहे याबाबतची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गृहप्रवेशासाठी वास्तूशास्त्र विशारद, पंचांग आणि तज्ञ जाणकार यांच्याकडून सल्ला घेऊनच मुहूर्त निवडण्यात आलाय.

राज ठाकरे सध्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी राहतात. या निवासस्थानाच्या बाजूलाच असलेल्या नव्या बंगल्यात आता ते कुटुंबासह रहायला जाणार आहेत. ‘कृष्णकुंज’च्या आधी राज ठाकरे दादर शिवाजी पार्कातील ‘कदम मेन्शन’ या ठिकाणी कुटुंबीयांसोबत राहत होते. साधारणत 2000-2001 मध्ये राज ठाकरे आपल्या कुटुंबासोबत ‘कृष्णकुंज’या निवासस्थानी राहायला आले. ‘कृष्णकुंज’तील घर आधी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी घेण्याचं ठरवलं होतं, मात्र काही कारणास्तव त्यांनी ‘कृष्णकुंज’तील ते घर घेतलं नाही. त्याला काही कारणं होती. ‘कृष्णकुंज’ हे छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील घर कुणालाही त्याकाळी घेणं पसंत होतं. त्यामुळेच लता मंगेशकर यांनी तेव्हा राज ठाकरे यांना कृष्णकुंजमधील घर घेण्याचं सुचवलं होते, राज ठाकरे हे सुद्धा नवं घर घेण्याच्या विचारात होते आणि त्यांनी ते घर घेतलं. ‘कदम मेन्शन’मध्ये आधी राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे अशी दोन कुटंबं राहत होती. याच ‘कदम मेन्शन’मध्ये शिवसेनेची स्थापना झाली होती. तेव्हा दोन परिवार या घरात राहात होते. कालांतराने बाळासाहेब वांद्र्यातील ‘मातोश्री’त राहायला गेले. राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ मध्ये राहायला गेल्यानंतर त्यांची बहीण जयजयवंती आपल्या कुटुंबासह तिथे राहत आहे.

शनिवारी गृहप्रवेश करत असलेल्या राज ठाकरे यांच्या घरात नक्की डिजाईन कशी असेल, कोणत्या मजल्यावर काय काय असेल, याबाबत त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. कारण मूळचे व्यंगचित्रकार, कलाकार आणि शो मन म्हणून परिचित असलेल्या राज ठाकरेंचा अंदाज जरा हटकेच असतो.

वाचनालय आणि जीमही

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळमजल्यावर पक्ष कार्यालयीन कामासाठी, म्हणजेच पक्ष बैठका आणि पक्ष प्रवेश, पत्रकार परिषदा यांसारखे इव्हेंट होण्यासाठी व्यवस्था करण्यात आलीय. त्याशिवाय एक सुसज्ज असं वाचनालयही आहे. मुळात राज ठाकरे हे कलाकार आहेत, त्यामुळे त्यांना वाचनाची आवड आहे, ती त्यांनी सदोदित जोपासली आहे, त्यासाठी वाचनालय उभारण्यात आलं आहे. त्याशिवाय घराच्या सर्वात वरच्या मजल्यावर अत्याधुनिक व्यायामशाळाही आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त डायनिंग हॉल आहे.

राज ठाकरे यांचं नवं घर कसे असेल

नव्या घराला एकूण ६ मजले आहेत. चित्रपटांचे प्रचंड शौकीन असलेल्या राज ठाकरेंच्या या नव्या घरात होम थिएटर आहे. घराचे बांधकाम सुरू असताना स्विमिंग पूल प्रस्तावित होता पण नंतर काही कारणास्तव रद्द करण्यात आला. या नव्या घराच्या उभारणीचे काम अंदाजे 2 ते 2.5 वर्षे सुरू होते. घराचा दर्शनी भाग शिवाजी पार्कच्या दिशेने आहे.

परदेशातून फर्निचर मागवले

नव्या घराचं संपूर्ण डिझाईन राज यांनी स्वत: लक्ष घालून तयार करून घेतलंय. उदाहरण द्यायचं झालं तर, घराचं झुंबरही त्यांनी स्वत: डिझाइन करून करून घेतलेत. घराचं सगळं फर्निचर, वस्तू त्यांनी स्वत: डिझाईन केल्या आहेत. काही फर्निचर मात्र परदेशातून तर काही इकडच्या कारागिरांकडून तयार करून घेतलंय. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांना मात्र त्यांनी त्यांची खोली त्यांच्या संकल्पनेनुसार तयार करण्याची मुभा दिली. मात्र संपूर्ण घराची मांडणी ही राज ठाकरे यांच्या नजरेतूनच झालीय.

Raj Thackeray's New Home

Raj Thackeray’s New Home

घराची दिशा बदलली?

राज ठाकरे रहात असलेल्या सध्याच्या ‘कृष्णकुंज’त घरात प्रवेशाचा दरवाजा हा दक्षिण दिशेला आहे, मात्र नव्या घराचा दरवाजा हा पश्चिम दिशेला असल्याची माहिती मिळतेय. सद्यस्थितीत राहत असलेल्या घरात राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांबाबत आजाराच्या अनेक घटना घडल्यात. राज ठाकरे यांना अनेकदा प्रकृतीच्या तक्रारी झाल्या, यांच्या हातालाही दुखापत झाली. अमित ठाकरे यांनाही दुर्धर आजाराला सामोरे जावे लागले होते. मुलगी उर्वशीचाही अपघात झाला होता. राज यांच्या पत्नी शर्मिला यांचा पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याने चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. तसेच राज यांच्या मातोश्री कुंदा यांच्या पायालाही दुखापत झाली होती. या सगळ्या घटनांचा विचार करून वास्तू शास्त्र विशारदांचा सल्ला घेतला. त्यामुळे नव्या घराचे प्रवेशद्वार पश्चिम दिशेला ठेवले असावे, अशी चर्चा कानी आहे.

Raj Thackeray's New Home

Raj Thackeray’s New Home

कृष्णकुंजच्या काही आठवणी

राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’त आपल्या आयुष्यातले’अनके चढ- उतार पाहिले. राज ठाकरेंचे वडील आणि कलावंत श्रीकांत ठाकरे यांचे निधन ‘कृष्णकुंज’त झाले. 27 नोव्हेंबर 2005 ला शिवसेनेला जय महाराष्ट्र केला ! 9 मार्च 2006 ला आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या राजकीय पक्षाची स्थापन केली. अनेक मुलाखती, पत्रकार परिषदा, आंदोलनांच्या घोषणा त्यांनी ‘कृष्णकुंज’तुन केल्या. अनेक वाद ‘कृष्णकुंज’ ने पाहिले. अमित ठाकरे यांचा लग्न सोहळाही ‘कृष्णकुंज’ ने पहिला.

Raj Thackeray's New Home

Raj Thackeray’s New Home

कृष्णकुंजचा इतिहास काय सांगतो

साधारण 2000-2001 मध्ये राज ठाकरे कृष्णकुंज आले. त्यापूर्वी कदम मेन्शन येथे राहात होते. कदम मेन्शनमध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंब राहत होते. बाळासाहेब ठाकरे आणि राज याचे वडील श्रीकांत तिकडेच रहात होते. शिवसेनेची स्थापनाही कदम मेन्शन येथे झाली.

कदम मेन्शन मधील राहते घर असलेली जागा परिवार मोठा होत गेल्याने अपुरी पडू लागली त्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे बांद्रा येथील ‘मातोश्री’ बंगल्यावर राहायला गेले, तर साधारण 2000-2001 च्या आसपास राज ठाकरे आपल्या कुटुंबासहसह ‘कृष्णकुंज’ येथे राहायला आले…सद्या राहात असलेल्या ‘कृष्णकुंज’ या इमारतीला ‘कृष्णभुवन’ असेही एक नाव आहे ..या इमारतीला दोन नावं का आहेत या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाला कळू शकलेलं नाही..राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’च्या समोर एक इमारत विकसित केली आहे, तिचं नाव ‘मधुवंती’ असं ठेवलं आहे. मधुवंती त्यांच्या मातोश्री यांचं सासरचे नाव आहे. त्या इमारतीत त्यांचे पुत्र अमित ठाकरे सद्या राहात आहेत..

राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’मध्ये बाळासाहेब आले होते

राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या ‘कृष्णकुंज’च्या घरी त्यांचे भाऊ आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप गेलेले नाहीत. मात्र उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे मात्र ‘कृष्णकुंज’ येथील निवासस्थानी एकदा गेल्याचं उदाहरण आहे. 2006 मध्ये 10 वी परिक्षेच्या निकालानंतर आदित्य ठाकरे राज ठाकरे यांना पेढे देण्यासाठी गेले होते..त्यानंतर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यानंतर कधी तिकडे गेल्याची माहिती नाही.

घर आणि नाव

राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे संगीत विशारद होते. आपली पत्नी आणि मुलांची नावे त्यांनी संगीतातील रागानुसार दिली. आई कुंदा यांचे सासरचे नाव मधुवंती. मधुवंती हा संगीतातला एक राग. मुलीचे नाव त्यांनी जयजयवंती तर मुलाचे नाव स्वरराज (राज ठाकरे) असे ठेवले. राज ठाकरेंचे कर्जतमध्ये फार्म हाऊस आहे. त्याला त्यांनी ‘मधुश्री’ हे नाव दिले आहे. आई-वडील यांच्या नावाचा संगम येथे त्यांनी इथे साधला. मधुवंतीतील मधु आणि श्रीकांत मधील श्री असे ‘मधुश्री’ हे नाव फार्म हाऊसला देण्यात आलं.

राज यांच्या नव्या घरात पहिला अथिती कोण असेल

कृष्णकुंजमध्ये अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते, सेलिब्रिटी, क्रीडापटू येऊन गेलेत. पण राज ठाकरेंच्या नव्या घराला भेट देणारा पहिला पाहुणा कोण असेल? राज ठाकरे गानकोकिळा लता मंगेशकर यांना निमंत्रित करू शकतात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाही निमंत्रित करू शकतात. भारतरत्न सचिन तेंडुलकर, बिग बी अमिताभ बच्चन अशी भली मोठी यादी यासाठी तयार होऊ शकते.

राज ठाकरे नव्या घरी राहायला आल्यानंतर ‘कृष्णकुंज’ पाडून तिथे नवा टॉवर विकसित करण्याचे प्रस्तावित असल्याचे कळते. ‘कृष्णकुंज’त अजूनही आणखी अन्य पाच कुटुंब राहतात. नवा टॉवर उभा राहिपर्यंत त्या रहिवाशांना अन्यत्र हलविण्यात येईल.

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंच्या घराचा पत्ता बदलला, ‘कृष्णकुंज’वरुन मुक्काम हलवला, आता चलो ‘शिवतीर्थ’!

Raj Thackeray’s New House Photo | राज ठाकरेंचा गृहप्रवेश ; पाहा ‘शिवतीर्थ’ चे आकर्षक फोटो

मोहित कंबोज यांचं लाव रे सॅम डिसुझाचा व्हिडीओ, ऑडिओ क्लिप जारी करत राष्ट्रवादीवर हल्लाबोल, सुनील पाटीलवरुन प्रश्नांची सरबत्ती

(know about Raj Thackeray’s New Home in mumbai)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.