फडणवीस म्हणाले, पवार पाच वर्ष कधीच मुख्यमंत्री नव्हते; वाचा, कसा होता शरद पवारांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून चांगलीच जुंपली आहे. (know sharad pawar political career as a chief minister of maharashtra)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्रीपदाचं स्मरण राहणं चांगली गोष्ट आहे, अशी मिष्किल टिप्पणी पवार यांनी करताच पवार पाच वर्ष कधीच मुख्यमंत्री नव्हते असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे पवार नेमके किती वर्ष आणि कोणत्या कोणत्या वर्षी मुख्यमंत्री होते याची चर्चा सुरू झाली आहे. पवारांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर टाकलेला हा प्रकाश.
पवार नेमके काय म्हणाले?
शरद पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी फडणवीसांविषयी विधान केलं होतं. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो, असं सांगतानाच सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी दिला.
फडणवीसांचा पलटवार काय?
फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानाची पवारांनी खिल्ली उडवली होती. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिलं. पवार मोठे नेते आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. पण कधीच ते पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाही. राहिले असते तर त्यांनी चांगलं काम केलं असतं. कधी दोन वर्ष, कधी तीन वर्ष त्यांनी काम केलं. त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना राहता आलं नाही. पण मी विरोधी पक्षनेता म्हणून समाधानी आहे. त्यामुळेच सत्ताधारी अस्वस्थ आहेत, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
सर्वात तरुण मुख्यमंत्री
पवारांनी सर्वात आधी 18 जूलै 1978मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ते राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. पुलोदच्या प्रयोगामुळे ते मुख्यमंत्री झाले होते. परंतु, 1980मध्ये इंदिरा गांधींचे केंद्राच्या सत्तेत पुनरागमन झाले. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची अवघे दोनच वर्ष मिळाली.
दुसऱ्यांदा संधी
मधल्या काळात पवारांनी पुलोदचा प्रयोग केला होता. मात्र, राजीव गांधी पंतप्रधान होताच पवारांनी 1987मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजीव गांधी यांनी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना केंद्रात बोलावलं आणि त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची जबाबदारी दिली. ही 1988ची गोष्ट. त्यानंतर पवारांची 25 जून 1988मध्ये राज्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.
अपक्षांच्या बळावर मुख्यमंत्री
1990मध्ये शिवसेना आणि भाजपची विधानसभेला युती झाली होती. त्यामुळे काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळू शकलं नाही. 288 पैकी काँग्रेसला 141 जागा मिळाल्या. मात्र, 12 अपक्षांचा पाठिंबा घेऊन पवार 4 मार्च 1990मध्ये मुख्यमंत्री झाले.
मुंबईची दंगल आणि मुख्यमंत्रीपद
6 डिसेंबर 1992मध्ये बाबरी मशीद पडली. त्यामुळे देशात दंगली सुरू झाल्या. मुंबईत प्रचंड जाळपोळ सुरू झाली होती. त्यामुळे मार्च 1993मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेऊन मुंबई रुळावर आणली. 1993 ते 1995पर्यंत म्हणजे दोन वर्षच पवार मुख्यमंत्रीपदी होते. त्यानंतर पवार दिल्लीच्या राजकारणात गेले.
संबंधित बातम्या:
VIDEO: देशमुखांपासून फडणवीसांपर्यंत आणि मावळपासून लखीमपूरपर्यंत; शरद पवारांची 7 मोठी विधाने
(know sharad pawar political career as a chief minister of maharashtra)