Special Report | वेबसाईटला एरर, परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की, सरकारने कोरोनात कमविले ते आरोग्य विभागाच्या भरतीत गमविले, गोंधळ कधी थांबणार ?

खासगी संस्थेत काम करण्यापेक्षा तुलनेने सराकरी नोकरी जास्त सुरक्षित, आराम तसेच आर्थिक स्थैर्य देणारी असते. कदाचित याच कारणामुळे आज सरकारी नोकरीसाठी तरुण तरुणी जिवाचं रान करताना दिसतात. मात्र, मागील काही वर्षापासून या सरकारी नोकऱ्यांच्या भरती प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गोंधळाची खास चर्चा होत आहे

Special Report | वेबसाईटला एरर, परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की, सरकारने कोरोनात कमविले ते आरोग्य विभागाच्या भरतीत गमविले, गोंधळ कधी थांबणार ?
HEALTH DEPARTMENT EXAM
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 6:00 PM

मुंबई : सरकारी नोकरी मिवळण्याची इच्छा जवळजवळ प्रत्येक तरुण-तरुणी बाळगून असतात. शेकड्यात निघणाऱ्या जागांसाठी लाखोच्या संख्येने येणारे अर्ज पाहून तरुणांची नोकरीसाठी असलेली धडपड लक्षात येते. कोणत्याही खासगी संस्थेत काम करण्यापेक्षा तुलनेने सराकरी नोकरी जास्त सुरक्षित, आराम तसेच आर्थिक स्थैर्य देणारी असते. कदाचित याच कारणामुळे आज सरकारी नोकरीसाठी तरुण तरुणी जिवाचं रान करताना दिसतात. मात्र, मागील काही वर्षापासून या सरकारी नोकऱ्यांच्या भरती प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गोंधळाची खास चर्चा होत आहे.

6205 पदांसाठी भरती प्रक्रिया, तांत्रिक अडचणींचा डोंगर

आरोग्य विभागात वेगवेवगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवताना सुरुवातीपासून मोठा गोंधळ उडाला. देशभरात कोरोना महारामारीने टोक गाठलेले असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 17 जानेवारी 2021 रोजी आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे, असे जाहीर केले होते. या घोषणेमुळे तरुण-तरुणींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. घोषणाप्रमाणे राज्यात आरोग्य विभागात गट क आणि गट ड प्रवर्गातील 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच राबवण्यात आली. मात्र, ही परीक्षा घेताना राज्यात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. सुरुवातीला ही परीक्षा 8 आणि 9 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र, परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीनेच तांत्रिक आणि व्यवस्थापनाचा गोंधळ घातल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर ओढावली.

गट क प्रवर्गातील पदांसाठी 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात परीक्षा घेण्यात आली. पण येथे परीक्षार्थींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.

दोनवेळा परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की

8 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी होणारी ही परीक्षा नंतर 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबरला घेण्याचे ठरले. यावेळीतरी परीक्षेदरम्यान गोंधळ उडणार नाही अशी अपेक्षा केली गेली. सगळं सुरळीत पार पडेल असे वाटत असताना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी परीक्षार्थींना ऐनवेळी मोठ्या अडचणी आल्या. देण्यात आलेल्या लिंकला एरर येत होतं. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी प्रचंड वैतागले होते. परीक्षेचा अभ्यास करावा की हा गोंधळ समजून घ्यावा असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला होता. दुसऱ्यांदाही सरकार तोंडघशी पडले. यावेळी 25 सप्टेंबर रोजी गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गाची परीक्षा होणार होती. पण ऐनवेळी पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. तसे संदेश परीक्षार्थींच्या मोबाईलमध्ये येऊन धडकले. तांत्रिक चुका उद्भवल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. 

देण्यात आलेल्या वेबसाईटला एरर आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर ओढावली होती.

विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी आल्या ?

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गासाठी 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू राबवण्यात आली. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली गेली. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली गेली. या सहा हजार जागांसाठी राज्यातील लाखो उमेदवारांनी अर्ज भरले होते. विशेष म्हणजे काही उमेदवारांनी तर दोन ते तीन जागांसाठी अर्ज भरले होते. ही भरती परीक्षा राबवण्याची जबाबदारी न्यासा या खासगी कंपनीवर होती. कोरोनाकाळात कमीत कमी प्रवास करुन परीक्षार्थींना परीक्षा देता यावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र काही उमेदवारांना चारशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास करून पेपर द्यावा लागला. तसेच काही उमेदवारांना दोन परीक्षांसाठी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत परीक्षा केंद्र देण्यात आले. दोन ते तीन तासांत शेकडो किलोमीटरचे अंतर पार करणे शक्य न झाल्यामुळे फी भरूनसुद्धा उमेदवारांना परीक्षा देता आली नाही.

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत वेगवेगळ्या संवर्गाच्या परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आल्या. तसेच परीक्षार्थींना जिल्हा बदलून देण्यात आला. तसेच काही परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर पिनकोडही चुकीचे देण्यात आले.

प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान धांदल, गोंधळ

तब्बल दोन वेळा परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आल्यानंतर 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची परीक्षा पार पडली. मात्र, ऐन परीक्षेच्या काळातदेखील मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. भंडारा, पुणे अशा जिल्ह्यांमध्ये पेपर फुटल्याचा आरोप झाला. हा आरोप करताना उमेदवारांनी थेट व्हॉट्सअॅप तसेच टेलीग्रामवर आलेले पेपरचे फोटो दाखवले. तसेच परीक्षा केंद्रावर जाऊनदेखाल काही परीक्षार्थींना पेपर देता आले नाहीत. परीक्षा केंद्रावर नाव नमूद नसल्यामुळे भंडारा जिल्ह्यात अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. नाशिक येथे एका खासगी वाहनातून पेपर आणण्यात आल्याचा आरोप झाला. 24 ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, नाशिक या केंद्रांवर परीक्षेवेळी गोंधळ झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. या सर्व घडोमोडींमुळे राज्य सरकारवर मोठी टीका झाली. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली गेली.

कोरोनात कमावलं ते भरती प्रक्रियेत गमावलं

पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत राज्य सरकारने चांगली कामगीरी केली. इतर राज्यांच्या तुलनेत संसर्गदर जास्त असताना राज्याने कोरोनाच्या दोन्ही लाटा परतवून लावल्या. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोलाची भूमिका बजावली. कोरोनाला थोपवण्यासाठी टोपे यांनी आरोग्य कर्मचारी तसेच इतर जाणकारांशी वेळोवेळी बातचित केली. तसेच महामारीला थोपवण्यासाठी सर्व खाचखळगे समजून घेतले. वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन टोपे नागरिकांना काळीजी घेण्याचे आवाहन करताना आपल्याला दिसले. त्यांच्या याच प्रयत्नांना यशदेखील आले. त्यांच्या कामाची चांगलीच दखल घेण्यात आली. वर्तमानपत्रात टोपे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली गेली. मात्र, कोरोना साथीला हाताळताना कमविलेले नाव टोपे यांनी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत गमविले. परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आल्यानंतर टोपे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जाऊ लागली. तसेच या सर्व गोंधळाला जबाबदार कोण असे प्रश्न विचारला जाऊ लागला. स्पष्टीकरण देऊनही विद्यार्थी, विरोधक तसेच वेगवेगळ्या संघटनांकडून टीका झाल्यानंतर नंतर टोपे बॅकफूटवर गेले. टोपे यांनी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेवर थेट प्रतक्रिया देणे टाळले. तसेच भरती प्रक्रियेची माहिती टोपे यांच्याऐवजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्यामार्फत दिली जाऊ लागली. या सर्व घडामोडींमुळे टोपे यांनी कोरोनाकाळात कमाविलेले नाव आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया राबवताना गमावले असे म्हटले जाऊ लागले.

राजेश टोपे यांनी नंतर माध्यमांशी थेट बोलणे बंद केले. त्याऐवजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चा पाटील भरती प्रक्रियेविषयी माहिती देत होत्या.

पेपरफुटीचा गंभीर आरोप, काही मिनिटात उत्तरं सोशल मीडियावर

दिवळीच्या काही दिवस आधी आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया पार पडली. वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्यामुळे परीक्षार्थींना मित्र तसेच आप्तेष्टांकडे मुक्काम ठोकावे लागले. या धांदलीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी होरपळले. विशेष म्हणजे सरकारी नोकर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांची मोठी निराशा झाली. त्यातही पेपर देऊन बाहेर आल्यानंतर अवघ्या काही तासांत पेपरफुटीची चर्चा झाल्यानंतर या उमेदवारांना काय करावं ते सूचत नव्हतं. विशेष म्हणजे आरोग्य विभागात नोकरी हवी असेल तर आमूक आमूक पैसे द्या, काम होऊन जाईल, अशा ऑफरसुद्धा दिल्या गेल्या. रेल्वेस्थानकावर भेटलाल्या अशाच एका उमेदवाराने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. विशेष म्हणजे पेपर फुटल्याचे सांगताना त्याने त्याच्या मोबाईलमध्ये पेपरचे फोटोसुद्धा दाखवले. या प्रश्नांची उत्तरंसुद्धा पेपर सुरु असताना काही मिनिटांत समाजमाध्यमांवर फिरत असल्याची माहिती त्याने दिली. हे सर्व सांगताना त्याची हतबलता तसेच सरकारी यंत्रणांविषयीची त्याची चीड स्पष्टपणे दिसत होती.

परीक्षा झाल्यानंतर पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला. तसे काही फोटोदेखील समाजमाध्यमावर व्हायरल झाले.

…तरीही सरकारी नोकरच होणार 

आरोग्य विभागाची परीक्षा दिलेला 24 वर्षाचा आणखी एक तरुण रेल्वेमध्येच प्रवास करताना भेटला तो मुळचा औरंगाबादेतील खुलताबाद तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहणारा. काहीही झालं तरी सरकारी नोकर होणार अशी जिद्द हा तरुण बाळून आहे. त्यानेसुद्धा पेपरफुटी तसेच परीक्षेदरम्यान उडालेला गोंधळ अगदी सहजपणे सांगितला. ही धांदल जणू नित्याचीच बाब असल्याचं त्याला वाटत असावं. सरकारी नोकरीच्या मार्गातील खाचखळगे आणि खड्डे माहीत असूनदेखील त्याने अजूनही हार मानलेली नाही.

गोंधळ सुरुच, वेळ मात्र हातातून वाळूसारखा निसटून जातोय

दरम्यान, परीक्षेदरम्यान उडत असलेला गोंधळ हा या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी सुरु असलेला खेळ असल्याची भावना प्रबळ होऊ लागली आहे.  तसेच आगामी काळात असाच गोंधळ उडाला तरुण-तरुणींच्या स्वप्नांचं काय ? सरकार तरुणांच्या या प्रश्नाकडे उघड्या डोळ्यांनी कधी पाहणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे तरुण सरकारी नोकरीसाठी जिवाचं रान करत आहेत. तर दुसरीकडे हजारो पदे रिक्त असताना सरकारकडून जाहिराती निघत नाहीत आणि निघाल्याच तर त्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रक्रियेचे तीनतेरा वाजतलेले असतात. या सर्व गोंधळात तरुण-तरुणींच्या हातातून वय, वर्षे आणि वेळ मात्र वाळूसारखी निसटत आहे. त्यांचं आयुष्य टांगलणीला लागलंय, हे मात्र नक्की !

इतर बातम्या :

Special Story | मुलांच्या आयुष्यात आनंदाचा इंद्रधनुष्य साकारणाऱ्या आई-बाबांची दिवाळी वृद्धाश्रमात का?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.