VIDEO: महापौर किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी, निनावी पत्रातून धमकी देणारा कोण?; धमकीचं कारण काय?
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ माजली आहे. महापौरांच्या जुन्या घराच्या पत्त्यावर आलेल्या धमकीच्या पत्रात अत्यंत अश्लील भाषेचा वापर करण्यात आलाय.
मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ माजली आहे. महापौरांच्या जुन्या घराच्या पत्त्यावर आलेल्या धमकीच्या पत्रात अत्यंत अश्लील भाषेचा वापर करण्यात आलाय. धमकीचं पत्र वाचल्यानंतर मात्र किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर झाले.
महापौरांना धमकी देणारा कोण?
महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच त्यांच्या मुलाला आणि कुटुंबाला गोळ्या घालून संपवू. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं पाहू नका, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. धमकीचं हे पत्र पनवेलमधून कुरिअरद्वारे आलं आहे. पत्राच्या पाकिटावर एक नाव तर आतल्या पत्रावर वेगळं नाव आहे. धमकीच्या पत्रामध्ये खारघर, पनवेल आणि उरण अशा तीन ठिकाणांचा उल्लेख आहे.
शेलारांशी संबंध नाही
या धमकी प्रकरणी तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी किशोरी पेडणेकरांचा जबाब नोंदवलाय. आशिष शेलारांच्या वक्तव्याचं प्रकरण वेगळं असून त्याचा या धमकीशी काही संबंध नसल्याचं खुद्द किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केलंय. धमकी प्रकरणाशी भाजपचा संबंध नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं असलं तरी याप्रकणावरुन शिवसेना आणि भाजपचे नेते आमनेसामने आलेत. दरम्यान धमकीच्या या पत्रावरुनच राज्यातली कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे, मुंबईच्या महापौरांना तरी पोलीस सुरक्षा द्या असं म्हणत भाजपच्या अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
महापौरांना दुसऱ्यांदा धमकी
महापौर झाल्यापासून पेडणेकरांना ही दुसऱ्यांदा धमकी आली आहे. मागच्या वर्षी जून 2020 मध्ये एका निनावी फोनद्वारे महापौरांना जीवे मारण्याची धमकी आली होती. महापौरांनी धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती धमकी देणारा आरोपी हा गुजरातमधील होता. धमकी देणारा व्यक्ती मतीमंद असल्याचं समोर आलं होतं.
मागणी केल्याप्रमाणे महापौर पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळेल. धमकीप्रकरणी पोलीस चौकशीही सुरु झालीय. मात्र एकीकडे भाजपच्या शेलारांनी महापौरांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह विधानाचा वाद ताजा असतानाच. दुसरीकडे महापौरांना धमकीचं पत्र आल्यानं याप्रकरणाला राजकीय वळण लागलंय.
संबंधित बातम्या:
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरात दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलीस शहीद
मुंबईत आज रात्रीपासून मोर्चे, आंदोलन, रॅलीला परवानगी नाही, पोलिसांचे आदेश जारी; कारण काय?
Ajit Pawar : पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या आघाडीसंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…