World Meteorological Day: लहरी निसर्गाचा अंदाज बांधण्यात हवामान विभाग तरबेज, शेती व्यवसायाला अधिकचा फायदा

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना आंतरराष्ट्रीय दिन म्हणतात. त्यापैकीच जागतिक हवामान दिन एक आहे. काळाच्या ओघात या दिवसाचे अधिक महत्व वाढले आहे. कारण हवामानात होणारे बदल खऱ्या अर्थाने आता जाणवू लागले आहेत. यंदा तर ते अधिक प्रखरतेने समोर आले आहेत. नैसर्गिक आपत्तींचा अचूक वेध या हवामान विभागाने घेतल्याने अनेक प्रकारचे नुकसान टळले आहे. जगभरात 23 मार्च हा दिवस 'जागतिक हवामान दिन' म्हणून साजरा केला जातो.

World Meteorological Day: लहरी निसर्गाचा अंदाज बांधण्यात हवामान विभाग तरबेज, शेती व्यवसायाला अधिकचा फायदा
जागतिक हवामान दिनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 6:03 AM

मुंबई : जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना (International Day) आंतरराष्ट्रीय दिन म्हणतात. त्यापैकीच (World Meteorological Day) जागतिक हवामान दिन एक आहे. काळाच्या ओघात या दिवसाचे अधिक महत्व वाढले आहे. कारण हवामानात होणारे बदल खऱ्या अर्थाने आता जाणवू लागले आहेत. यंदा तर ते अधिक प्रखरतेने समोर आले आहेत. (Natural disasters) नैसर्गिक आपत्तींचा अचूक वेध या हवामान विभागाने घेतल्याने अनेक प्रकारचे नुकसान टळले आहे. जगभरात 23 मार्च हा दिवस ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो. हवामानशास्त्राबरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे. गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय येत आहे. मात्र, हवामान विभागातील शास्त्रामुळे अचूक अंदाज वर्तवले जात असून मानवी आरोग्य ते शेती व्यवसयात होणारे नुकसान यामुळे टळले आहे. बदलत्या वातावरणाचा अचूक अंदाज वर्तवला जात असल्याने योग्य त्या उपाययोजना करता येतात हेच हवामान विभागाचे फलीत आहे.

जागतिक हवामान दिन साजरा करण्याचा उद्देश काय?

जागतिक हवामान संस्थाची 1950 मध्ये स्थापना झाली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय हे जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. ही संस्था स्थापन होण्यासाठी पुढाकार घेण्याऱ्या 31 देशांत भारत ही होता. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचा परिणाम सकारात्मक की नकारात्मक याचे परिणाम जाणून घेऊन जनजागृती करणे हा या कार्यालयाचा मुख्य उद्देश आहे. जगातल्या सर्व देशांमध्ये केल्या जाणाऱ्या हवामानाच्या नोंदीच्या देवाणघेवाणीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. कारण स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलांशी असतो. हाच बदल सर्वासामान्य जनतेपर्यंच पोहचून होणारे संभाव्य नुकसान टाळता यावे हाच मुख्य उद्देश आहे.

संकटाचा वेध घेऊन उपाययोजना

संकट ओढावल्यावर उपाययोजना करुन काही उपयोग होणार नाही तर ते येण्यापूर्वीच उपाययोजना राबवण्याच्या उद्देशाने यंदाची थीम ठरवण्यात आली आहे. Early Warning and Early Action ही 2022 ची थीम असून याअनुशंगानेच वर्षभर कार्यक्रम राबवले जाणार आहेत. हवामान बदलावर WMO चे सर्वाधिक लक्ष असून यंदा नागरिकांनी योग्य वेळी योग्य कृती कशी करावी याबाबत जनजागृती केली जाणार आहे.डब्ल्यूएमओ ही एक आंतरसरकारी संस्था आहे जिच्याकडे संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्य देशांचे सदस्यत्व आहे.

पॅरिस करार नेमका काय आहे?

वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा करार अस्तित्वात आला होता. यामध्ये जगभरातील 200 देशांचा सहभाग होता. यामध्ये जगभरातील तापमान हे 2.0 अंश सेल्सिअस पर्यंत रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तर 1.5 पर्यंत ठेवले जात आहे. याशिवाय हरितगृह उत्सर्जन रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे धोरण आहे. एवढेच नाही तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी श्रीमंत राष्ट्रांनी गरीब राष्ट्राला मदत करण्याची तरतूदही यामध्ये आहे. मात्र, यामुळे उद्योग व्यवसयावर परिणाम होईल म्हणून अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंप असताना त्यांनी माघार घेतली तर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पॅरिस हवामान करारामध्ये पुन्हा सहभागी होण्यासाठीच्या आदेशांवर सही केली आहे.

हा दिवस कसा साजरा केला जातो?

जगभरातील 191 देश जागतिक हवामान संस्थेचे सदस्य आहेत. या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हवामानाचा नमुना आणि नैसर्गिक आपत्ती बदलणार्‍या गोष्टींविषयी लोकांना जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. जागतिक हवामान दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये अशा अनेक ठिकाणी वादविवाद, कला स्पर्धा आयोजित केल्या जातात. एवढेच नाही स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन हवामान शास्त्रज्ञ यांच्याकडून हवामानबाबत जनजागृचतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

संबंधित बातम्या :

MIMला विरोध, पण शिवसेनेची मुस्लिम लीगसह सेक्युलर पक्षांशीही अनेकदा युती, इतिहास काय सांगतो?

World Water Day: जल है तो कल है..! जागतिक जल दिनाचा नेमका उद्देश काय?

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह समता दिन म्हणूनही साजरा केला जातो; आणि हा सत्याग्रह महाडमध्येच झाला कारण…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.