‘सामना’त मोदींच्या काशी दौऱ्याबाबत एक शब्दही नाही, राहुल गांधींचं होय, मी हिंदू आहे फ्रंटपेजवर !
पण शिवसेनेचं हिंदूत्व आणि भाजपचं हिंदूत्व यात फरक आहे हे जाणकार पहिल्यापासून सांगत आलेत. हिंदी अभ्यासक त्यात गल्लत करताना दिसतात. राहुल गांधींची कालची भूमिका शिवसेनेला पुरक अशी आहे. त्यामुळेच कदाचित मोदींचा काशी दौरा सामनातून गायब आहे तर राहुल गांधींच्या होय, मी हिंदू आहेला मोठं स्थान दिलेलं दिसतंय.
एखाद्या वर्तमानपत्रानं किंवा इतर माध्यमानं काय छापावं काय, दाखवू नये हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असू शकतो. पण काही माध्यमं मग ती वर्तमानपत्रं असो की टीव्ही हे एखाद्या पक्षाचे, नेत्याचे मुखपत्र म्हणून ओळखले जातात. त्यांची ती ओळख लपून रहात नाही. ते स्वत:ही लपवत नाहीत. त्यामुळेच ते रोज काय दाखवतात, छापतात यावरुन त्या त्या पक्षात काय चाललं आहे याचा अंदाज येतो. सामना हे वर्तमानपत्र शिवसेनेचं मुखपत्र (Sammna Shivsena mouthpiece) म्हणून ओळखलं जातं. तशी ओळख त्यांनी कधीही लपवली नाही. उलट अभिमानानं मिरवली आहे. त्यामुळेच सामनाचे संपादकीय, बातम्या ह्या रोज हेडलाईन्स बनतात, इतरांसाठी त्याची बातमी होते. शिवसेनेत काय चाललं आहे किंवा इतर पक्षात जे काही चाललंय, त्याकडे शिवसेना कशी बघते याचा अंदाज सामनावरुन लावला जातो. आजचा सामनाही त्याला अपवाद नाही. विशेष म्हणजे आजच्या सामनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काशी (PM Modi Kashi daura) विश्वनाथ कॉरीडॉरबद्दलच्या (Kashi Vishwanath corridor ) दोन दिवसीय दौऱ्यावर एक शब्दही छापलेला नाही. त्याच्या उलट राहूल गांधीच्या ‘होय, मी हिंदू आहे’ला मात्र फ्रंटपेजवर स्थान दिलं गेलंय.
राहुल गांधींना प्रायोरिटी, मोदींना नाही? नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवस वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. ह्या दौऱ्या दरम्यान ते सर्वाधिक चर्चेत असलेल्या काशी विश्ननाथ कॉरीडॉरच्या पहिल्या टप्याचं लोकार्पण करणार आहेत. काशी हे हिंदूंसाठी पवित्र स्थान मानलं जातं. बनारस, काशी ह्या इतर नावांनीही हे शहर ओळखलं जातं. हिंदू धर्मात काशीला तिर्थस्थळाचं स्थान आहे. हे शहर इतिहासापेक्षाही प्राचीन मानलं जातं. सध्यस्थितीत पंतप्रधान मोदी हे वाराणसीचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या पक्षांसाठी हे शहर किती महत्वाचं आहे याचा अंदाज यावरुन बांधला जाऊ शकतो. त्याच काशीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा कायापालट करणारा प्रोजेक्ट मानला जातो काशी विश्वनाथ कॉरीडॉर. त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. मोदी आणि योगी सरकारनं कोरोना काळातही याचं काम थांबू दिलं नाही. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झालाय आणि त्याचं लोकार्पण आज केलं जाणार आहे. उत्तर प्रदेशात पून्हा सत्तेवर येण्याचा भाजपचा मार्ग ह्या काशी विश्वनाथ प्रोजेक्टमधूनच जातो असं जाणकारांना वाटतं. त्यामुळे हा प्रोजेक्ट मोदी-योगी आणि हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे याचा अंदाज येईल. शिवसेनाही कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करत आलेली आहे. पण आज मात्र मोदींच्या ह्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सामनात एक शब्दही छापला गेलेला नाही. उलट राहुल गांधींनी काल छाती ठोकपणे मी हिंदू आहे, हिंदू सत्याग्रही असतो, सत्ताग्रही नसतो हे सांगितलं, त्याला अग्रस्थान दिलं गेलंय.
Tomorrow, 13th December is a landmark day. At a special programme in Kashi, the Shri Kashi Vishwanath Dham project will be inaugurated. This will add to Kashi’s spiritual vibrancy. I would urge you all to join tomorrow’s programme. https://t.co/DvTrEKfSzk pic.twitter.com/p2zGMZNv2U
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2021
काय म्हणालेत राहूल गांधी? राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये काल मोदी सरकारच्याविरोधात महागाई हटाव रॅली काँग्रेसनं आयोजीत केली होती. ह्या रॅलीत राहुल गांधींनी हिंदुत्ववाद्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले- होय, मी हिंदू आहे पण हिंदूत्ववादी नाही. हिंदू हा सत्याग्रही असतो, सत्ताग्रही नसतो. हा हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही. देशात 2014 पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. पण आता हिंदूंची सत्ता परत आणायचीय असे राहुल गांधी म्हणालेत. काल दिवसभर राहुल गांधींच्या ह्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. राहुल गांधींनी जी भूमिका मांडलीय ती शिवसेनेच्या हिंदुत्वाशी जवळ जाणारी आहे हे विशेष. त्यामुळेच हिंदूंची सत्ता आणायचीय हे राहुल गांधींचं वक्तव्य काँग्रेस राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांना ऐतिहासिक वाटतंय. राहुल गांधींच्या ह्या भूमिकेला सामनानं पहिल्या पानावर स्थान दिलंय. आणि मोदींच्या कार्यक्रमावर एक शब्दही नाही हा शिवसेनेची बदललेली भूमिका ठळकपणे दिसते.
हिंदूत्वाची लढाई शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेतली आणि आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. भाजपला अनपेक्षीत धक्का बसला. भाजपला असं वाटत होतं की, शिवसेना कधीच काँग्रेससोबत सत्तेसाठी जाणार नाही. पण झालं उलटं. शिवसेनेसह आघाडीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं. तेव्हापासून भाजपनं शिवसेनेच्या हिंदूत्वावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. शिवसेनेचा भगवा कसा हिरवा झालाय अशा टीकेपासून ते बाळासाहेबांना जनाब लिहिलं गेल्याच्या मुद्यांपर्यंत भाजपनं टीकाटिप्पणी केली. पण शिवसेनेचं हिंदूत्व आणि भाजपचं हिंदूत्व यात फरक आहे हे जाणकार पहिल्यापासून सांगत आलेत. हिंदी अभ्यासक त्यात गल्लत करताना दिसतात. राहुल गांधींची कालची भूमिका शिवसेनेला पुरक अशी आहे. त्यामुळेच कदाचित मोदींचा काशी दौरा सामनातून गायब आहे तर राहुल गांधींच्या होय, मी हिंदू आहेला मोठं स्थान दिलेलं दिसतंय.
हे सुद्धा वाचा: Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस काशी दौऱ्यावर, काशी विश्वनाथ कॉरीडॉरचं लोकार्पण, वाचा संपूर्ण दौरा