P C Sorcar: ब्रिटनलाही घामटा फोडणारा महान जादूगार ‘पीसी सरकार’

दिनांक 9 एप्रिल 1956. रात्रीच्या 9 वाजून 15 मिनिटांनी अचानक बीबीसीच्या (bbc) कार्यालयात लोकांचे एकामागोमाग एक फोन खणखणू लागले. आपल्या उघड्या डोळ्यांनी टीव्हीच्या स्क्रिनवर एक खून होताना पाहिल्याचं लोक सांगत होते.

P C Sorcar: ब्रिटनलाही घामटा फोडणारा महान जादूगार 'पीसी सरकार'
P C Sorcar: ब्रिटनलाही घामटा फोडणारा महान जादूगार 'पीसी सरकार'
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 12:00 AM

नवी दिल्ली: दिनांक 9 एप्रिल 1956. रात्रीच्या 9 वाजून 15 मिनिटांनी अचानक बीबीसीच्या (bbc) कार्यालयात लोकांचे एकामागोमाग एक फोन खणखणू लागले. आपल्या उघड्या डोळ्यांनी टीव्हीच्या स्क्रिनवर एक खून होताना पाहिल्याचं लोक सांगत होते. एका रहस्यमयी जादूगाराने एका 17 वर्षाच्या मुलीला आपल्या जादूने वश केलं. त्यानंतर तिला टेबलावर झोपवलं आणि करवतीने तिच्या शरीराचे दोन तुकडे केले. एखादा कसाई मांसाचा तुकडा कापतो अशा पद्धतीने हा जादूगार(Magician) त्या मुलीचे तुकडे करताना आम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहिलंय, असं फोन करणारा जो तो सांगत होता. त्यामुळे बीबीसीच्या पत्रकारांचीही भंबेरी उडाली होती. या हत्येच्या बातमीमुळे सर्वांनाच घामटा फुटला होता आणि उभ्या आडव्या ब्रिटनला घामटा फोडणारा हा जादूगार दुसरा तिसरा कोणी नव्हता तर ते होते महान जादूगार पी. सी. सरकार. ( P C Sorcar)

जेव्हा टीव्हीवर पॅनोरामा नावाचा एक कार्यक्रम लागायचा ही तेव्हाची गोष्ट आहे. याच कार्यक्रमात शेवटच्या भागात पी. सी. सरकार यांनी आपलीही माईलस्टोन जादू दाखवून ब्रिटनच्या नागरिकांच्या ऊरात धडकी भरवली होती. ही जादू दाखवल्यानंतर सरकार यांनी आपल्या सहकारी महिलेला टेबलावरून उठवण्यासाठी तिच्या हाताची मालिश सुरू केली. मात्र, तिच्याकडून कोणताच प्रतिसाद न आल्याने त्यांनी तिचे डोके खाली ठेवून तिच्या चेहऱ्यावर काळा कपडा टाकला. सरकार यांनी असं करताच निवेदक रिचर्ड डिंबलबाय यांनी कार्यक्रम संपल्याची घोषणा केली. त्यानंतरच काही तरी गडबड झाल्याची दाट शक्यता वाटल्याने नागरिकांनी या लाईव्ह कार्यक्रम झाल्यावर तात्काळ बीबीसीच्या कार्यालयात फोनवर फोन करण्यास सुरुवात केली.

पहिल्या पानावर बातमी आली अन्

पाश्चात्य देशात आपल्या जादूची कला घेऊन जाण्यासाठी सरकार यांना खूप संघर्ष करावा लागला. तीन हफ्त्यासाठी ड्यूक ऑफ यॉर्क थिएटर आरक्षित करण्यात आले होते. मात्र, या सीझनच्या तिकिटांची विक्री म्हणावी तशी झाली नव्हती. त्यामुळे त्यावेळच्या पॅनोरामा या कार्यक्रमात जाऊन संधीचा फायदा उचलण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी कार्यक्रमही केला आणि अचानक कार्यक्रम संपल्याची घोषणाही केली. दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ घेतल्याने हा कार्यक्रम थांबवत असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आपली सहकारी दिप्ती डे हिला टेबलावर झोपवून तिच्या शरीराचे दोन तुकडे करण्याचा कारनामा त्यांनी याच शोमध्ये करून दाखवला होता. त्यामुळेच दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात सरकार यांच्या जादूच्या कमालने पहिल्या पानावर स्थान मिळवलं नसतं तर नवलंच. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर या अनोख्या जादूची बातमी आल्यानंतर ड्यूक ऑफ यॉर्कमध्ये सरकार यांनी आयोजित केलेला प्रत्येक शो हाऊसफुल्लच गेला.

बेंगॉल टायगर

सरकार यांचा जन्म बंगाल (आजच्या बांगलादेशचा भाग)मध्ये टांगाईल जिल्ह्यातील अशेकपूर गावात झाला. 23 फेब्रुवारी 1913 ही त्यांची जन्मतारीख. त्यांचं नाव होतं प्रोतुल चंद्र सरकार. पण पीसी सरकार म्हणूनच त्यांची खरी ओळख निर्माण झाली. शिक्षणात त्यांना गती होती. गणितात तर त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांना जन्मजात प्रतिभेचे धनी म्हणूनही संबोधले जात होते. मात्र, त्यांचं मन जादूकडे होतं. सरकार यांनी शेवटच्या काळात त्यांचं आडनाव बदलून सॉरसर केलं होतं. इंग्रजी भाषेतील सॉरसरर म्हणजे जादूगाराच्या आवाजाशी मिळता जुळता होता. त्यांनी तरुण वयात क्लब, सर्कस आणि थिएटरमध्ये आपल्या जादूचे खेळ केले होते.

अन् ट्रिक कामी आली

त्यांचे कार्यक्रम सुरू होते. पण अजूनही ते बंगालला जादूगार म्हणून अपरिचित होते. विशेष म्हणजे त्यांची ओळख निर्माण झालेली नव्हती तेव्हापासून ते स्वत:ला महान जादूगार समजत होते. तसं म्हणायलाही त्यांनी सुरुवात केली होती. मात्र, हा त्यांच्या युक्तीचा भाग होता. देशातील महान जादूगार म्हणून त्यांनी स्वत:ला संबोधायला सुरुवात केली अन् त्यांना देशभरातून अनेक ठिकाणाहून कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं जाऊ लागलं.

अमेरिकन जादूगारांशी घसवट

पाश्चात्य देशात जाऊन जादू करणं तसं कठिण होतं. कारण पाश्च्यात्य देशातील जादूगार भारतीय जादूगारांना अकुशल मानत होते. त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू होत. तेव्हा अमेरिकन जादूगार सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी कार्यक्रम करत. या अमेरिकन जादूगारांशी सरकार यांनी घसवट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या जादूगारांवर त्यांनी लेख लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1950मध्ये शिकागोमध्ये जाऊन त्यांनी आपल्या जादूची करामत दाखवली.

पहिलाच फ्लॉप शो

त्यांचा पहिलाच शो फ्लॉप ठरला. आयलेस साईट शो लोकांची मने जिंकू शकला नाही. या शोमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून ब्लॅकबोर्डावर लिहिलेली अक्षरं वाचायची असतात. पण त्यांना ते काही जमलं नव्हतं. त्यावेळी त्यांनी दोन प्रसिद्ध जादूगारांवर धोका दिल्याचा आरोप केला होता.

आयडिया चोरल्याचा आरोप

हेलमट एवाल्ड हे त्या काळातील मोठे जादूगार होते. कलानग नावाने ते जादू सादर करायचे. हिटलरचेही ते आवडते जादूगार होते. 1955 मध्ये हेलमट यांनी सरकार यांच्यावर आपली आयडिया चोरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही जादूगारांनीच या जर्मन जादूगारावर आरोप केले. त्यानेही ही आयडिया चोरल्याचं त्यावेळच्या जादूगारांनी सप्रमाण सिद्ध केलं. त्यानंतर हा वाद थांबला.

ताजमहालच आवतरायचा

सरकार यांची खरी ओळख ही त्यांच्या इंद्रजाल किंवा द मॅजिक ऑफ इंडिया शो ही आहे. 1955मध्ये त्यांनी हा शो पॅरिसमध्ये आयोजित केला होता. यावेळी त्यांनी एकापेक्षा एक प्रयोग करून दाखवले होते. जिथे त्यांचा शो असायचा ते थिएटर ताजमहल सारखं तयार केलं जायचं. सर्कसमधील हत्ती आपली रंगीबेरंगी सोंड उंचावून येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचं स्वागत करायचे. लायटिंग, रंगबिरंगी कपडे अशा झगमगाटी वातावरणात हा शो रंगायचा.

डॉक्टरांचा सल्ला धुडकावला

1970 मध्ये सरकार यांना डॉक्टरांनी प्रवास करण्यास मनाई केली होती. चार महिने प्रवास करू नका म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही आणि जापानच्या दौऱ्यावर गेले. 6 जानेवारी 1970मध्ये त्यांनी होक्काइडो बेटावरील शिबेत्सू शहरात इंद्रजालचा शो केला. मात्र, स्टेज सोडल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

संबंधित बातम्या:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यशस्वी मध्यस्थी, शासकीय कर्मचाऱ्यांचा उद्यापासूनचा संप मागे घेण्याची तयारी, पुन्हा बैठक होणार

Mumbai Local : लोकलवरील निर्बंध हटणार नाहीत, लस न घेणाऱ्यांना प्रवासाची मुभा नाहीच, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आदेश

Maharashtra News Live Update : दिशा सालियन संदर्भात पुरावे असल्यास यंत्रणांना द्या, बदनामी टाळा : जयंत पाटील

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.