tv9 Special: राज ठाकरेंवर भूमिका बदलाचे आरोप का होतात? कारण समजून घेण्यासाठी हे पाहावंच लागेल!
Raj Thackeray: 2014 साली राज ठाकरे काय म्हणाले होते आणि 2022 मध्ये काय म्हणाले, हे आता पाहणं गरजेचं आहे. कारण आठ वर्षात महाराष्ट्राचं राजकारणही तितकंच बदललेलं आहे.
मुंबई : राज ठाकरेंच्या भूमिकेवरुन सध्या राजकीय (Maharashtra Politics) वर्तुळात वाद होतायत… मात्र आजपर्यंत कुणाच्या काय भूमिका राहिल्या..? नेमकं काय-काय घडलं…? आणि राज ठाकरेंवर (Raj Thackeray) भूमिका बदलाचे आरोप का होत आहेत? असे प्रश्न उपस्थित होणं आणि त्यांची उत्तर शोधणं हेही गरजेचंय. राज ठाकरेंनी आपल्या भूमिका बदलत ठेवल्या का? वेळेप्रमाणे त्यांचं राजकारण बदलत गेलं का? कुणाची भूतकाळातली वक्तव्य काय होती? आणि त्याचा आता वर्तमानाशी काय संबंध आहे, हेही तितकंच जाणून घेणं गरजेचं आहे. मोदींबाबत तुमचं मत काय होतं…? असं प्रश्न विचारल्यावर जेव्हा पवार उत्तर देत होते, तेव्हा मध्येच राज ठाकरेंनी ‘साहेब खरं सांगा’, असं म्हणत एकच हशा पिकवला होता.
ठाण्यातील सभेत पवारांवर घणाघाती टीका तर राज ठाकरेंनी केलीच. शिवाय पवारांच्या (Sharad Pawar) घेतलेल्या मुलाखतीची आठवणही त्यांनीच करुन दिली. भूतकाळात कुणाची काय भूमिका होती आणि वर्तमानात कुणाची काय भूमिका आहे?यावरुन राज्याचं राजकारण चर्चेत आलंय. टीका प्रासंगिक असते, पण त्याचे ओरखडे काळाच्या पटावरुन पुसले जात नाहीत.
VIDEO : Raj Thackeray-मोदींबद्दल राज ठाकरेंनी पवारांना काय विचारलं होतं? @RajThackeray @PMOIndia pic.twitter.com/w5sZGI0Fsr
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2022
ईडीबाबत तेव्हाचे ‘राज’ काय होते?
महाविकास आघाडी सरकार राज्यात आलं. त्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष पेटला. मात्र लोकसभा निवडणुकांआधी सभांवर सभा घेणारे राज ठाकरे काय म्हणाले होत? ईडीवर गोरेगावच्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले आणि आज काय म्हणाले होते?, यावर लोकांचं लक्ष वेधलं गेलं नाही, तरच नवल! निवडणुकांच्या चौकशीसाठी चौकशी मागे लावणार. ज्यांना अशा धमक्या दिल्या ते गेले भाजपात, असं गोरेगावातील सभेत राज ठाकरेंनी म्हटलं होतं. पण ठाण्यातील सभेत बोलताना तर त्यांनी ईडीवरुन बँकफूटवरच आल्याची भूमिका घेतल्यासारखं दिसून आलं.
Raj Thackeray यांनी ईडी चौकशीवर केलेलं जुनं वक्तव्य आता पुन्हा चर्चेत आलं आहे.@RajThackeray @PawarSpeaks @dir_ed pic.twitter.com/BiRBDqdSv0
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2022
ठाण्यात समान नागरी कायद्याची मागणी राज ठाकरेंनी केली असेल. पण त्याआधी त्यांनी जे म्हटलं होतं ते चकीत करणारंच आहे. ‘कुठचं 370 कलम, राम मंदिर आणि समान नागरी कायदा…’ या सगळ्याचा उल्लेख करत राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य आता पुन्हा आठवलं जाण गरजेचं आहेच!
Raj Thackeray- आधीचे राज ठाकरे आणि आताचे राज ठाकरे! तुम्हीच पाहा..@RajThackeray @PawarSpeaks @PMOIndia pic.twitter.com/BaGcR2YcAL
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2022
कोण कुणाला काय म्हणालं होतं?
पण अश्या भूमिकांमुळे एकटी मनसेच चर्चेत राहिलीय, असंही नाही. दोस्तीआधीच्या कुस्तीची ही यादी सर्वपक्षीय आणि फार मोठी आहे. अजित पवारांनी तर शिवसेनेला गांढूळाची अवलाद म्हटलं होतं. पण सरकारमध्ये आल्यानंतर ठाकरेंचं सरकार काम करणारं सरकार असल्याचंही अजित पवारदादाही म्हणाले होते. दरम्यान, नुकतीच मैत्री झाल्यानंतर आणि होण्याआधी कोण कोण काय काय म्हणालं होतं, तेही पाहणं म्हणूनच महत्त्वाचंय.
VIDEO : Raj Thackeray | आघाडी आधीची दुश्मनी आणि आघाडी नंतरची दोस्ती @RajThackeray pic.twitter.com/vZ5HFfqvRL
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2022
नवे मुद्दे कोणते?
पण यावेळी प्रश्न फक्त बदलत्या भूमिकांच्या आरोपांचा नाहीय….राज ठाकरेंनी अचानक मराठी मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं, असंही नाही. मनसेचा झेंडाबदलण्याआधी अनेकदा राज ठाकरेंनी हिंदुत्वावर उघड भूमिका मांडलीय. पण जो मुद्दा राज ठाकरे 2014 साली मांडत होते, तो मुद्दा 7 वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा का आला? आणि ज्या मुलभूत मुदद्यांवर राज ठाकरेंसारखा एकमेव नेता मागच्या 11 वर्षांपासून पोटतिडकीनं बोलत होते, ते मुद्दे 2022 मधल्या भाषणांमधून कुठे गेले?
2014 साली राज ठाकरे काय म्हणाले होते आणि 2022 मध्ये काय म्हणाले, हे आता पाहणं गरजेचं आहे. कारण आठ वर्षात महाराष्ट्राचं राजकारणही तितकंच बदललेलं आहे. सरकारही बदललंय. मित्रपक्षही बदलेले आहेत. आणि पर्यायानं शत्रूपक्षही बदलेले असणार हेही तितकंच खरं!
VIDEO : Raj Thackeray | राज ठाकरेंचे जुने मुद्दे कोणते आणि नवीन मुद्दे कोणते? @RajThackeray pic.twitter.com/3xy6gysXnE
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2022
2019 मध्ये बोलणारे राज ठाकरेंचे शब्द 2022 मध्ये जेव्हा बोलतात, तेव्हा त्यातून नेमके एक्च्युअल राज ठाकरे कोणते, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो!
जातीयतेवरुन राज ठाकरे जे काल बोलले, त्यातले काही मुद्दे त्यांनी 4 वर्षांपूर्वी थेट पवारांनाच विचारले होते. राज ठाकरेंच्या पॉईंटेट प्रश्नांना पवारांनी पॉईंटेट उत्तरं दिली होती. प्रश्न पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरेंच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव पवारांच्या उत्तरानंतर हास्यात रुपांतरित होत होते.
Raj Thackeray यांच्या त्या प्रश्नांना पवारांनी दिलेली पॉईन्ट टू पॉईन्ट उत्तर काय होती?@RajThackeray @PawarSpeaks pic.twitter.com/x8hZyJacrK
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2022
हा तो काळ होता, जेव्हा मराठी मुद्दयासाठी लढणारे राज ठाकरे, भाजप सरकारला देशाच्या एकतेसाठी धोका समजत होते. आणि प्रांतिय राजकारणाला कायम विरोध करत आलेले शरद पवार, राज ठाकरेंच्या काही मराठी मुद्द्यांवर योग्यतेची मोहोर उमटवत होते. नेत्यांच्या भूमिका सरतेशेवटी जनतेच्या मूडवर ठरतात. बोटॅनिकल गार्डन, हायटेक रस्ते, थीम पार्क, ब्ल्यु प्रिंटसारख्या गोष्टींवर बोलूनही मतदान मिळालं नाही, त्यामुळे यापुढच्या निवडणुका कशा लढायच्या, हे मला लोकांनीच शिकवलं, ही सल राज ठाकरेंनी बोलून दाखवली होती.
शेवटी सत्ता हेच साध्य आहे, आणि भूमिका त्यासाठीचं साधन.कधी सत्तेसाठी भूमिकांची फारखत होते. कधी सत्तेसाठी भूमिकांच्या तडजोडी होतात. महाविकास आघाडी सरकार त्यांच्या बदललेल्या भूमिकांचे खड्डे भाजपच्या विरोधानं भरुन काढतंय. पण मनसेसाठी यापुढची लढाई फक्त सत्ताकारणासाठी नव्हे, तर अस्त्वित्वाची सुद्धा आहे. मात्र शेवटी सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न उरतो. तो म्हणजे ही गर्दी मतांमध्ये रुपांतरित कधी होणार?
VIDEO : Raj Thackeray-गर्दी होते मग मतं का नाही मिळतं?@RajThackeray @PMOIndia pic.twitter.com/J202IK6p4d
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2022