Rashmi Thackarey: रश्मी ठाकरेंविरोधातील आक्षेपार्ह ट्विटनंतर भाजप विरुद्ध शिवसेना सामना सुरु
रश्मी ठाकरेंना मराठी राबडी देवी म्हणत, गजारियांनी रश्मी ठाकरेंची तुलना लालू प्रसाद यादव यांच्या पत्नीसोबत केलीय. तर दुसरं ट्विट हे रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी केलंय. गजारियांचं हे ट्विट आक्षेपार्ह आहे. यानंतर वांद्रे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, जितेन गजारिया यांना ताब्यात घेतलं आणि जबाबही नोंदवला.

मुंबई : रश्मी ठाकरेंविरोधातील आक्षेपार्ह ट्विटनंतर शिवसेनेत चांगलाच रोष निर्माण झाला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रभारी जितेन गजारियांनी आक्षेपार्ह ट्विट केलं. त्यानंतर शिवसेनेनं भाजपवर चांगलाच संताप व्यक्त केला. रश्मी ठाकरेंवरुन पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना सुरु झालाय. दुसरीकडे 5 तासांच्या पोलिसांच्या चौकशीत गजारियांनी माफी मागितली.
रश्मी ठाकरेंना राबडी देवी म्हटले
रश्मी ठाकरेंना मराठी राबडी देवी म्हणत, गजारियांनी रश्मी ठाकरेंची तुलना लालू प्रसाद यादव यांच्या पत्नीसोबत केलीय. तर दुसरं ट्विट हे रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी केलंय. गजारियांचं हे ट्विट आक्षेपार्ह आहे. यानंतर वांद्रे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, जितेन गजारिया यांना ताब्यात घेतलं आणि जबाबही नोंदवला. तर वांद्र्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये युवा सैनिकही पोहोचले.
मनिषा कायंदे यांची आक्रमक प्रतिक्रिया
रश्मी ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत. सोशल मीडिया, राजकारणापासून दूर राहिल्या आहेत. तुम्ही स्वतःला संस्कृत पक्ष समजता, संघ परिवाराचा पक्ष समजता, महिलांना आदर कसा द्यावा हे शिकवले असते. विनाकारण संबंध नसलेल्या रश्मी ताईंवर बोलणे योग्य नाही. जितेंद्र गजरिया जो कोणी असेल त्याला सायबर गुन्ह्याखाली कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे. त्याचे ट्विटर अकाउंट सायबर पोलिसांनी बंद करावे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनिषआ कायंदे यांनी दिली आहे.
चित्रा वाघ यांच्याकडून ट्विटचं समर्थन नाही
दुसरीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रश्मी ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचं समर्थन केलं नाही. पण अजित पवारांबद्दल गजारिया यांनी केलेल्या ट्विटचं अप्रत्यक्ष समर्थन केलं. त्याचबरोबर गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरही बोट ठेवलं आणि गुलाबराव पाटलांवर कारवाई का नाही ?, असा सवाल केला.
गजारीयांचं ट्विट आक्षेपार्ह नसल्याचा वकिलाचा दावा
दुसरीकडे जितेन गजारिया यांचं ट्विट आक्षेपार्ह नसून यापुढं ट्विट करत राहणार असं गजारियांच्या वकिलांनी म्हटलंय. रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी जितेंन गजारिया यांची मुंबई पोलीस सायबर सेल कडून साडेपाच तास चौकशी करण्यात आली .. पोलिसांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही त्यांना करू मात्र ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप जितेंन गजारिया यांचे वकील यांनी केला.
राज्य महिला आयोगानेही घेतली दखल
रश्मी ठाकरेंबद्दल केलेल्या ट्विटची दखल राज्य महिला आयोगानंही घेतलीय. तसंच गजारियांवर कडक कारवाईची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलीय. (Shiv Sena dispute against BJP started after offensive tweet against Rashmi Thackeray)
इतर बातम्या
Explained | लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध! म्हणजे नेमकं सरकार काय करणार आहे? समजून घ्या!