VIDEO | Sanjay Raut: कवितेचा आधार घेत संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी; शरद पवारांचं कौतुक तर भाजपवर आसूड

भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. हे पवारांनी 1996मध्ये सांगितलं होतं. ते आता आम्हाला कळू लागलं आहे. अवघा रंग एकची झाला. देशाचा महाराष्ट्राचा रंग भगवा आहे, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

VIDEO | Sanjay Raut: कवितेचा आधार घेत संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी; शरद पवारांचं कौतुक तर भाजपवर आसूड
कवितेचा आधार घेत संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 12:43 AM

मुंबई : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचं आज अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात संजय राऊतही उपस्थित होते. कार्यक्रमात भाषणावेळी कवी सौमित्र यांच्या कवितेचा आधार घेत संजय राऊतांनी आज चौफेर फटकेबाजी केली. यावेळी राऊतांनी शरद पवारांचं कौतुकही केलं. काही हलक्या हाताचे चिमटेही काढले आणि भाजपवर आसूडही ओढले. ‘संजय राऊतांनी बघ माझी आठवण येते का’ या कवितेचा महाविकास आघाडीशी संबंध जोडला.

काय म्हणाले राऊत?

पवारांच्या पुस्तकाला आम्ही भगव्या रंगाचं कव्हर चढवल्याची मिश्किल कोटी राऊतांनी केली. शरद पवार भाजपबाबत जे 21 वर्षांपूर्वी बोलत होते, ते आम्हाला मागच्या 2 वर्षापूर्वी कळू लागल्याचं विधानही राऊतांनी केलं. आज प्रश्न विचारणाऱ्यांची स्थिती काय आहे हे सर्वांना माहीत आहे, असं त्यांनी सांगितलं. भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. हे पवारांनी 1996मध्ये सांगितलं होतं. ते आता आम्हाला कळू लागलं आहे. अवघा रंग एकची झाला. देशाचा महाराष्ट्राचा रंग भगवा आहे, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पवारांना खुर्ची देण्यावरुन जो वाद रंगला होता, त्यावरही राऊतांनी टीका करणाऱ्या भाजपला पवारांची भाषणं वाचण्याचा सल्लाही देऊन टाकला. आमच्याकडे दारुगोळा खूप आहे, आम्ही तो वेळ आलो की फोडू. मी पवारांना दिल्लीत खुर्ची दिली. त्यावर टीका टिप्पणी होत आहे. मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायचं असेल तर त्यांची 61 भाषणं वाचली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

पवारांचं कौतुक करताना राऊतांनी शिवसेना आणि ठाकरेंवरुन टोलेही लगावले. 95 सालच्या सेना-भाजपच्या सरकारबद्दल पवारांनी केलेल्या एका विधानाचा दाखलाही राऊतांनी यावेळी आवर्जून दिला. (Shiv Sena leader Sanjay Raut criticizes BJP in book publishing program)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.