ST Workers Strike : एसटी संप सुरुच, मंत्री परब पुन्हा बैठक घेणार! पगाराच्या तफावतीवरुन एसटी संघटनांसोबत चर्चा

आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा चर्चेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय. महत्वाची बाब म्हणजे ही चर्चा वेतनवाढीनंतरही सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या तफावतीवरुन होणार असल्याची माहिती मिळतेय. या पगाराच्या तफावतीवरुन अनिल परब मान्यताप्राप्त एसटी संघटनांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा काही प्रमाणात पगार वाढ होणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.

ST Workers Strike : एसटी संप सुरुच, मंत्री परब पुन्हा बैठक घेणार! पगाराच्या तफावतीवरुन एसटी संघटनांसोबत चर्चा
अनिल परब, एसटी कर्मचारी आंदोलन
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 9:41 PM

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला (ST Workers Strike) बरोबर एक महिना पूर्ण झाला. मात्र अजूनही 72 हजारांहून अधिक कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यातच आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पुन्हा चर्चेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय. महत्वाची बाब म्हणजे ही चर्चा वेतनवाढीनंतरही (Salary increase) सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या तफावतीवरुन होणार असल्याची माहिती मिळतेय. या पगाराच्या तफावतीवरुन अनिल परब मान्यताप्राप्त एसटी संघटनांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा काही प्रमाणात पगार वाढ होणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पगारवाढीनंतरही किती तफावत?

>> एसटी कर्मचाऱ्यांच्या नवनियुक्त चालकाचं एकूण वेतन 24 हजार 595 करण्यात आलंय. सरकारी कर्मचारी जो चालक आहे, त्याला एकूण वेतन 35 हजार मिळतं. इथं 10 हजार 405 रुपयांची तफावत आहे.

>> 10 वर्षे पूर्ण झालेल्या एसटीच्या चालकाचं एकूण वेतन 28 हजार 800 झालंय. तर सरकारी चालकाला 10 वर्षांनंतर 40 हजार पगार मिळतो. म्हणजे 11 हजार 200 रुपयांची तफावत आहे.

>> 20 वर्षे पूर्ण झालेल्या एसटीच्या चालकाला एकूण वेतन 41 हजार 40 रुपये मिळेल. तर सरकारी चालकाला 45 हजार पगार मिळतो. इथे 3 हजार 960 रुपयांची तफावत आहे.

>> 30 वर्षे पूर्ण झालेल्या एसटीच्या चालकाला एकूण वेतन हे 56 हजार 880 करण्यात आलंय. सरकारी कर्मचाऱ्याला 55 ते 60 हजार पगार मिळतो. इथं जवळपास 3 हजार 120 रुपयांची तफावत आहे.

>> कंडक्टर लिपीका आणि चालकाच्या पगारात एक ते 2 हजारांचाच फरक असतो. त्यामुळं अनिल परबांसोबतच्या बैठकीकडे पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

79 टक्के कर्मचाऱ्यांना सध्याची पगार वाढ अमान्य

एसटीच्या एकूण 92 हजार कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 20 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. म्हणजेच तब्बल 79 टक्के कर्मचाऱ्यांना सध्याची पगार वाढ मान्य नाही, त्यामुळंच कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. मुंबईतील आझाद मैदानात पावसातही कर्मचारी ताडपत्री लावून बसले आहेत. उन, वारा असो की पाऊस, विलीनीकरणाशिवाय मागे नाही, असा पवित्राच या कर्मचाऱ्यांचा आहे.

पडळकर, खोतांची माघार, सदावर्तेंसमोर चिंतेची बाब

भाजप आमदार गोपींचद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी अनिप परबांनी जाहीर केलेली पगारवाढ मान्य करत आझाद मैदानातल्या आंदोलनातून माघार घेतली होती. मात्र, नेतृत्व करण्यासाठी पुढे आलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी चिंताजनक बाब म्हणजे सध्या आझाद मैदानात 200 पेक्षा कमी एसटी कर्मचारी आहेत. मात्र तरीही आझाद मैदानात येऊन सदावर्ते जोरदार भाषण आणि घोषणाबाजी करत आहेत.

परब आणि संघटनांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

आम्हाला पगारवाढीची भीक नको. विलिनीकरण हवं या एका मागणीवर ठाम राहून संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. राजभरात विविध एसटी डेपोंमध्ये महिनाभरापासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळं अनिल परब आणि एसटी संघटनांसोबतच्या बैठकीत काय निर्णय होतो. हे गुरुवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

ममता बॅनर्जींना काँग्रेस नेत्यांचं जोरदार प्रत्युत्तर; अशोक चव्हाण आणि थोरातांचा ममतांसह विरोधकांना मोलाचा सल्ला

महावितरणने अतिरेक केल्यास जशास तसं उत्तर देणार, उर्जामंत्री नितीन राऊतांना राजू शेट्टींचं उत्तर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.