Goa Assembly Elections : गोवा निवडणुकीत उत्पल पर्रीकर पोकसमध्ये, तिकीट कुठून? भूमिका काय?
पणजीतून उत्पल पर्रिकरांना तिकीट हवं होतं, ते त्यांना भाजपनं दिलेलं नाही. दिल्लीत गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यात उत्पल पर्रिकरांना स्थान नाहीये.
गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा (Goa Assembly Election) फोकस सध्या मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकरांकडे (Utpal parikar) आलीय. त्याचं कारण आहे, ज्या पणजीतून उत्पल पर्रिकरांना तिकीट हवं होतं, ते त्यांना भाजपनं दिलेलं नाही. दिल्लीत गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यात उत्पल पर्रिकरांना स्थान नाहीये. मात्र उत्पल पर्रिकरांना पणजी वगळता 2 ठिकाणाहून ऑफर दिलेली होती. जी उत्पल पर्रिकरांना मान्य नाही. तर आपकडे आल्यास पणजीतून लढा अशी ऑफर केजरीवालांनी दिलीय. अपक्षच लढले तर पाठींबा देऊन अशी शिवसेनेच्या संजय राऊतांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. उत्पल पर्रिकर इच्छूक आणि आग्रही असलेल्या पणजीतून भाजपनं विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांनाच उमेदवारी दिलीय. तर उत्पल पर्रिकर बंडाच्या पवित्र्यात आहेत.
मी पणजीतून लढण्यावर ठाम-उत्पल पर्रीकर
उत्पल यांनी tv9शी बोलताना म्हटलंय की, माझी भूमिका ठाम आहे. मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा विचारच नाही. यापुढे माझी भूमिका काय असेल ते मी लवकरच जाहीर करणार. मात्र पणजी हाच माझा एकमेव पर्याय आहे हे नक्की. गोव्यातल्या राजकारणावरुन, फडणवीस आणि राऊतांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून सामना सुरु आहे. फडणवीसांच्या नटसम्राटच्या टीकेला राऊतांनी जळजळीत प्रत्युत्तर दिलंय.फडणवीसांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी झाली, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
राऊतांचे फडणवीसांना चिमटे
भाजपने त्यांच्या कार्यक्रर्त्याला काय पर्याय दिले ? ते त्याने स्वीकारावेत की नाही ? यावर मी काय बोलणार ! त्यांचा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात हुशार आहेत. आम्ही महाराष्ट्रत पाहिले आहे. त्यांचे काम…एखाद्याचे मन वळवण्यात ते पटाईत आहेत. पण उत्पल त्यांचे ऐकत नसतील तर त्याची कारणे काय आहेत? हे गोव्याच्या जनतेला माहीत आहे. पणजीचे नेतृत्व विधानसभेत कोणत्या प्रवृत्तीने करावे असा प्रश्न उत्पल यांनी उपस्थित केलाय. ज्याला राजकीय चारित्र्य म्हणतात ते जपण्याचा मनोहर पर्रीकर यांनी प्रयत्न केला. एक आदर्श निर्माण केला. त्यांचे आमचे राजकीय मतभेद होते, पण राजकीय चारित्र्य त्यांनी नेहमी जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मतदार संघाचे नेर्तृत्व कोणत्या चरित्र्याने करावा हा प्रश्न उत्पल पर्रीकर यांनी उपस्थित केलाय. हे लक्षात घ्या ते गंभीर आहे. असे चिमटे राऊतांनी फडणवीसांना काढले आहेत. उत्पल पर्रिकरांवरुन गोव्यात भाजपचं टेंशन वाढलंय. त्यामुळं उत्पल पर्रिकर कोणता निर्णय घेतात. हे पाहणं महत्वाचं असेल.