Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पोलिसांची चूक? अफवा की आणखी काही? वैष्णवदेवीत झालेली चेंगराचेंगरी नेमकी कुणामुळे?

सध्या ही चेंगराचेंगरी नेमकी का झाली, कुणामुळे झाली, याबाबत एक चौकशी समिती नेमली गेलीय. चेंगराचेंगरी का झाली, याचं अधिकृत उत्तर अद्याप मिळालेलं नसलं, तरी धार्मिक स्थळांवर गर्दी व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

Video | पोलिसांची चूक? अफवा की आणखी काही? वैष्णवदेवीत झालेली चेंगराचेंगरी नेमकी कुणामुळे?
1 जानेवारी 2022 - वर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णव देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. आतापर्यंत 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. तर तेरा जण जखमी झालेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. दरम्यान, या घटनेतील मृतांना बारा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 9:36 PM

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णोदेवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी अनेकांनी जीव गमावलाय. मात्र या चेंगराचेंगरीला एक अफवा आणि काही सीआरपीएफच्या लोक जबाबदार ठरल्याचाही दावा केला जातोय. कोरोनाच्या काळात इतकी गर्दी जमली कशी, प्रवास आणि एकत्रित जमण्यावर निर्बंध असतानाही इतकी गर्दी एकत्रित कशी आली, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चेंगराचेंगरी होईपर्यंत स्थानिक मंदिर प्रशासन काय करत होतं, हे प्रश्न उपस्थित होतायत.

म्हणून चेंगराचेंगरी झाली?

दैनिक भास्करला प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार या चेंगराचेंगरीमागे व्हीआयपी आणि काही सीआरपीएचे लोक कारणीभूत ठरले. जेव्हा चेंगराचेंगरी झाली, तेव्हा हिमांशू अग्रवाल नावाचा व्यक्ती दर्शन घेऊन घरी परतत होता. रात्री अडीचच्या दरम्यान दर्शनासाठी आलेले भाविक 3 नंबरच्या चेक पोस्टजवळ जमले होते.

त्याचदरम्यान काही व्हीआयपी लोक येत असल्याचं सांगून रस्ता करुन देण्यासाठी सीआरपीएफच्या लोकांनी लाठीचार्ज केला. त्या गर्दीत हालचालीसाठी सुद्धा जागा नसल्यामुळे लोकांनी घाबरुन बाहेरचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याचकारणामुळे नंतर चेंगराचेंगरी झाल्याचा दावा केला जातो.

पाहा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

पुन्हा पुन्हा त्याच चुका!

सध्या ही चेंगराचेंगरी नेमकी का झाली, कुणामुळे झाली, याबाबत एक चौकशी समिती नेमली गेलीय. चेंगराचेंगरी का झाली, याचं अधिकृत उत्तर अद्याप मिळालेलं नसलं, तरी धार्मिक स्थळांवर गर्दी व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

पोलीस जबाबदार?

इतर बातम्या –

Stampede | वैष्णवदेवी मंदिराप्रमाणेच या 7 मंदिरात झाली होती चेंगराचेंगरी, ज्यात महाराष्ट्रातीलही 1 मंदिर!

Health | तुमच्या लहान मुलांची हाडं कमजोर करतो ‘हा’ रोग, वेळीच धोका ओळखण्याचे 3 सोपे उपाय

Corona Third Wave | नव्या वर्षाच्या पहिल्याच तारखेनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धडकी भरवली, कारण…

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.