Vinayak Savarkar : सावरकरांविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्ये का केले जातात?, सावरकरांचा मुद्दा फक्त वोटबँकसाठी? जाणून घ्या सावरकर आणि राजकारण
भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान द्यायला भाजपला इतका मोठा कालावधी का लागतो? की ती फक्त निवडणुकीपुरतीच घोषणा असते? हे सर्व प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीत आहेत. सावरकरांची जयंती आणि पुण्यतिथी आली की हेच प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी येतात.
मुंबई : केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (Vinayak Sawarkar) प्रभाव असलेलं आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा पुरस्कार करणारं भारतीय जनता पक्षाचं (BJP) सरकार 2014 पासून सत्तेत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात एकेकाळी भाजपसोबत युतीमध्ये असलेली शिवसेना (Shiv Sena) राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार चालवत आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची ओळख प्रखर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून महाराष्ट्रासह अवघ्या देशाला परिचीत आहे. या दोन्ही पक्षांकडे हिंदुत्वाचा समान धागा आहे. पण, तो फक्त राजकारणापुरताच आहे का? शिवसेनेनं अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आपलं सावरकर प्रेम दाखवलं होतं. पण, ते फक्त दाखवण्यापुरतंच होतं का? निवडणुकांपुरतीच हिंदुत्वावादी व्यक्तित्वांना समोर आणून टीका टिप्पणी केली जाते का? असं नाही तर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान द्यायला भाजपला इतका मोठा कालावधी का लागतो? की ती फक्त निवडणुकीपुरतीच घोषणा असते? हे सर्व प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीत आहेत. सावरकरांची जयंती किंवा पुण्यतिथी आली की हेच प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी येतात. यात काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते वारंवार सावरकरांविषयी वक्तव्ये करून सावरकरांच्या मुद्द्यावरुन राजकारण करताना दिसून येतात. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा सावरकरांचा मुद्दा समोर येतो त्यावेळी महात्मा गांधी आणि सावरकरांची तुलना केली जाते. सावरकरांचा मुद्दा वोटबँकसाठी देखील वापरल्याचा आरोप अनेकदा काही पक्षांवर करण्यात आलाय.
भारतरत्न देण्याचं फक्त आश्वासन?
भारतीय जनता पक्षानं 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सावरकरांना भारतरत्न देण्याचं आश्वासन दिलं होतं. सावरकरांचा पुरस्कार करणाऱ्या भाजपचा इतिहास पाहिला तर वाजपेयी सरकारनं तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायण यांच्याकडे सावरकरांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस 2000 साली केली होती. नारायणन यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नव्हता. मात्र, 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान भाजपवर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या आश्वासनावरुन अनेकदा टीका केली जाते. भाजप ते आश्वासन फक्त मतदारांना आकर्षीत करण्यासाठी होतं का? ते आश्वासन सावरकरांच्या नावाचा फक्त निवडणुकीपुरता वापर करण्यासाठी होतं का? असाही प्रश्न अनेकदा विचारला जातो. यावर आम्ही डॉ. नारायणराव सावरकरांचे नातू आणि मुंबईमधील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ या संस्थेशी संबंधित रणजित सावरकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी अगदी एका ओळीत उत्तर दिलं. ते म्हणालेत, ‘भारतरत्न देण्याची आमची मागणी नाही, जे सध्या राजकारणात घडत आहे त्याबद्दल मी काय बोलणार’
सावरकरांच्या मुद्दयाला धरून राजकारण?
सावरकर यांच्यावर राजकीय पक्षांचे जबाबदार नेतेमंडळी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येतात. सावरकरांच्या मुद्दयाला धरून अनेकदा राजकारण तापल्याचंही आपण पाहिलंय. तशीच काही वक्तव्ये मागील काळात समोरही आली होती. काँग्रेस आणि वेगवेगळ्या पक्षांचे नेतेमंडळी सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करताना दिसतात ही वक्तव्ये फक्त राजकारणापुरती असल्याचंही अनेकदा बोललं जातं. विशेष म्हणजे जबाबदार मंडळींकडून अशा प्रकारची वक्तव्ये समोर येतात.
गांधींच्या सांगण्यावरुन सावरकरांचा माफीनामा?
विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या सेल्यूलर कारागृहात असताना ब्रिटीश सरकारसमोर माफीनामा महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन दाखल केला होता, असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 12 ऑक्टोबर 2021 रोजी उदय माहूरकर आणि चिरायू पंडीत यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर : द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात केलं होतं. त्यावरुन प्रचंड राजकारण तापलं होतं. दरम्यान, असा कोणताही उल्लेख माझ्या पुस्तकात नाही, असं पुस्तकाचे लेखक उदय माहूरकर यांनी सांगितलं होतं.
नेमकं काय म्हणाले होते राजनाथ सिंह? व्हिडीओ पाहा
#WATCH | Lies were spread about Savarkar. Time & again, it was said that he filed mercy petitions before British Govt seeking his release from jail… It was Mahatma Gandhi who asked him to file mercy petitions: Defence Minister Rajnath Singh at launch of a book on Savarkar y’day pic.twitter.com/Pov4mI0Ieg
— ANI (@ANI) October 13, 2021
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने सावरकरांविषयी वक्तव्य केल्यावर राजकारण तर तापणारच. त्यावेळी इतिहासकार आणि सावरकर यांच्या चरित्राचे लेखक विक्रम संपत यांनी एक ट्विट करून प्रतिक्रिया दिली होती. ती प्रतिक्रिया देखील त्यावेळी चांगलीच गाजली. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकांच्या पानांचे फोटो पोस्ट करत लिहिलंय की, ‘अनावश्यक गोंधळ सध्या सुरू आहे. 1920 मध्ये गांधीजींनीच सावरकर बंधूंना याचिका दाखल करण्यास सांगितलं होतं. आपल्या यंग इंडिया या वृत्तपत्रात एका लेखाच्या माध्यमातून त्यांच्या सुटकेची मागणी गांधीजींनी केली होती.’ लेखक विक्रम संपत यांच्यासह अनेकांनी त्यावेळी याविषय़ी ट्विट केले होते.
लेखक विक्रम संपत यांचं ट्विट
Some needless brouhaha abt statement by @rajnathsingh In my Vol 1 & in countless interviews I had stated already that in 1920 Gandhiji advised Savarkar brothers to file a petition & even made a case for his release through an essay in Young India 26 May 1920. So what’s noise abt? pic.twitter.com/FWfAHoG0MX
— Dr. Vikram Sampath, FRHistS (@vikramsampath) October 13, 2021
काँग्रेसकडून अनेकदा सावरकरांविषयी वक्तव्ये
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी देखील सावरकरांवरुन मागे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सिंह यांनी म्हटलं होतं की, ‘सावरकरांच्या पुस्तकात लिहिलं की हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. गाय हा असा प्राणी आहे जो स्वतःच्या विष्ठेमध्ये लोळतो. ती आमची आई कोठून असू शकते? गोमांस खाण्यात काहीही चुकीच. हे खुद्द सावरकरांनीच सांगितलं आहे,’ असं दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या एका जनजागृती अभियानात म्हटलं होतं. यावरुन देखील प्रचंड राजकारण तेव्हा तापल्याचं बघायला मिळालं.
दिग्विजय सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य, पाहा व्हिडीओ
#WATCH | Veer Savarkar in his book has written that the Hindu religion doesn’t have any relation with Hindutva. He also wrote that cow… can’t be our mother and there is no problem in eating cow beef: Congress leader Digvijaya Singh in Madhya Pradesh’s Bhopal pic.twitter.com/wYsk4YXmDJ
— ANI (@ANI) December 25, 2021
राहुल गांधींची सावरकरांविषयी वक्तव्ये
एप्रिलमध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल एक विधान केलं होतं. त्यानंतर देखील प्रचंड राजकारण तापलं गेलं. ते म्हणाले होते की, ‘सावरकरांविषयी बोलताना मी त्यांचा आदरानेच उल्लेख करतो कारण ते माझे संस्कार आहे,’
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? पाहा व्हिडीओ
#WATCH There’re politicians who’re in pursuit of power. They ponder upon attaining power throughout…I was born in centre of power but honestly, I don’t have interest in it. Instead, I try to understand the country: Congress MP Rahul Gandhi at a book-launch event in Delhi pic.twitter.com/DH1rltlYzE
— ANI (@ANI) April 9, 2022
फक्त राजकारणापुरता सावरकरांच्या नावाचा वापर
विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा फक्त राजकारणापुरता वापर केला जातोय का, असाही प्रश्न तुम्हाला वरील राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्याकडे पाहून पडला असेल. कारण, निवडणुका आल्या की सावरकर आणि त्यांच्याविषयीचे मुद्दे समोर येतात. एकीकडे हिंदुत्वांच्या प्रतिकांचा मुद्दा घेऊन निवडणुकीत प्रचार केला जातो. पण, तो फक्त निवडणुकीपुरताच असतो का? भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष युती सरकारमध्ये सत्तेत होते. त्यावेळी आणि 2014 पासून भाजप सरकार केंद्रात सत्तेत आहे. त्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता राहिल्याचं जाणकार सांगतात. भाजपसह काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष देखील सावरकरांचा मुद्दा काढून त्याचा राजकारणापुरताच वापरत करताय का, असा प्रश्न पडला तर त्यात काही गैर नाही.