केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणे पहिल्यांदाच म्हणाले सरकार कोसळणार; ठाकरे सरकारला खरंच धोका आहे का?; वाचा सविस्तर

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे सरकार कोसळण्याची भविष्यवाणी केली आहे. (why narayan rane said maharashtra government will collapse soon?)

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणे पहिल्यांदाच म्हणाले सरकार कोसळणार; ठाकरे सरकारला खरंच धोका आहे का?; वाचा सविस्तर
नारायण राणे
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 1:27 PM

मुंबई: नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे सरकार कोसळण्याची भविष्यवाणी केली आहे. ठाकरे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत असं सांगतानाच हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळणार असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणेंचा इशारा काय?

दिवाळी निमित्ताने नारायण राणे आज मुंबईत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राणे चौफेर मतं मांडत असतानाच राज्य सरकार लवकरच दोन वर्ष पूर्ण करणार आहे. हे सरकार किती दिवस टीकेल असा सवाल राणेंना करण्यात आला. त्यावर राणेंनी हे भाकीत केलं. रकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही. यांना पाच वर्ष सत्ते राहण्याचा अधिकारही नाही. मंत्रिपदी बसायचाही अधिकार नाही. हे भ्रष्ट मंत्री आहेत. राज्याच्या हिताचं एकही काम होत नाही. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल. त्यांना कळणारही नाही. भ्रष्टाचारामुळेच हे सरकार जाईल, असा दावा राणेंनी केला.

मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दावा

राणेंनी यापूर्वीही राज्यातील ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं होतं. एवढेच नव्हे तर राणेंनी सरकार कधी कोसळणार याची तारीखही जाहीर केली होती. मात्र, राणेंनी जेव्हा जेव्हा सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली तेव्हा तेव्हा सरकार काही कोसळलं नाही. राणे तेव्हा भाजपमध्ये नवखे होते. शिवाय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळातही नव्हते. त्यामुळे त्यांचं विधान हे केवळ राणेंचं विधान असल्याचं मानलं जात होतं. आता मात्र, राणे केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि उद्योग मंत्री आहेत. आता त्यांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंध आहे. त्यामुळे केंद्रीय वर्तुळात असलेल्या राणेंनी ठाकरे सरकार कोणत्याही क्षणी कोसळणार असल्याचं भाकीत केल्याने पुन्हा तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.

कितीही दावे केले तरी अंकाचं गणित जुळवणं अशक्यच

राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी याबाबत आपली मतं मांडली. भाजपने कितीही दावे केले तरी अंकांचं जे गणित आहे ते जुळवणं भाजपला आजपर्यंत शक्य झालं नाही. आणि ते कधीही शक्य होणार नाही. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश सदस्य एका पक्षातून बाहेर पडतात तेव्हाच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. तेव्हाच तो संपूर्ण गट एखाद्या पक्षाला पाठिंबा देतो आणि सरकार बनू शकते. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सदस्य फोडायचे म्हटलं तर 34 किंवा 38 सदस्य फोडावे लागतील. एकाचवेळी कोणत्याही पक्षातून एवढे सदस्य फोडणं भाजपला शक्य नाहीये. कमीत कमी आमदार फुटले तर राजीनामा देऊन त्यांना बाहेर पडावे लागेल. परंतु, राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याची कोणत्याही आमदारांची सध्या मन:स्थिती नाही. शिवाय भाजपही आज या आमदारांना निवडून आणण्याची गॅरंटी घेऊ शकत नाही, असं विवेक भावसार म्हणाले.

भाजपसोबत एकही आमदार जाणार नाही

दुसरी गोष्ट म्हणजे एक संपूर्ण पक्ष बाहेर पडून भाजपला पाठिंबा देईल याची सुतराम शक्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस कितीही म्हटलं तरी भाजपसोबत जाणार नाही. कारण अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत. मुख्यमंत्री घरी बसून काम करत असताना अजित पवारांनी उत्तम काम केलं. त्यांना मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मोकळीक दिली होती. त्यामुळे त्यांना जेवढं स्वातंत्र्य या सरकारमध्ये आहे, तेवढं त्यांना भाजपमध्ये मिळणार नाही. इथून फुटून तिथेही त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेल. फरक पडणार नाही. पण स्वातंत्र्य मिळणार नाही. उलट भाजपमध्ये गेले तर अजितदादांवर अधिक प्रेशर राहील. तिथे फडणवीस आणखी स्ट्राँग होतील. त्यामुळे राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडणार नाही. काँग्रेस आणि भाजपची युती तर कदापि शक्य नाही. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील संबंध टोकाचे कटू झाले आहेत. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थिती एकत्र येणार नाहीत. एकत्र आले तर जनताही स्वीकारणार नाही. त्यांचे कार्यकर्तेही स्वीकारणार नाही, असं विवेक भावसार म्हणाले.

भाजपकडून फक्त हूल

कोणत्याही परिस्थिती हे सरकार पडू शकणार नाही. सध्या भाजपमधील 20 ते 22 आमदार बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहे. पण आघाडीच घ्यायला तयार नाही. कारण त्यांनाही पक्षांतर बंदी कायदा लागू होईल. त्यामुळे या आमदारांना वेट अँड वॉचवर ठेवण्यात आलं आहे. मात्र, आता भाजपकडून केवळ आमदारांना थोपवून धरण्यासाठी आवई उठवली जात आहे. केवळ हूल देण्यासाठीच नारायण राणे अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात शंभर टक्के अडकवलं गेलंय; साक्षीदार विजय पगारे यांचा मोठा दावा

Ahemadnagar Hospital Fire : मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत, आरोग्यमंत्र्यांची घोषणा; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी होणार

VIDEO: सुनील पाटील प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी

(why narayan rane said maharashtra government will collapse soon?)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.