tv9 Special : काँग्रेसनं जयपूरमध्ये विचारमंथन केलं तरी त्यानंतर तीन दिग्गजांनी पक्ष सोडला, राहुल गांधींबाबत आशा मावळलीय?

tv9 Special : कपिल सिब्बल यांचा मुद्दा वेगळा आहे. ते काँग्रेसमधील संघटनात्मक बदलासाठी सातत्याने आग्रही होते. पण त्यांच्या बोलण्याकडेही दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे त्यांना वेगळा निर्णय घेणं भाग होतं.

tv9 Special : काँग्रेसनं जयपूरमध्ये विचारमंथन केलं तरी त्यानंतर तीन दिग्गजांनी पक्ष सोडला, राहुल गांधींबाबत आशा मावळलीय?
काँग्रेसनं जयपूरमध्ये विचारमंथन केलं तरी त्यानंतर तीन दिग्गजांनी पक्ष सोडलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 6:09 PM

नवी दिल्ली: गेल्याच आठवड्यात उदयपूर येथे काँग्रेसचं (congress) नव संकल्प चिंतन शिबीर पार पडलं. या शिबिरात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. काँग्रेसचं पुनरुज्जीवन करणं हा या चर्चेचा मुख्य गाभा होता. त्यामुळे काँग्रेस अंग झटकून पुन्हा एकदा भरारी घेईल असं वाटत होतं. मात्र, असं वाटत असतानाच काँग्रेसला एकापाठोपाठ एक तीन असे बडे धक्के बसले. एक म्हणजे पंजाबमधील काँग्रेसचे मास लीडर असलेल्या सुनील जाखडांनी (sunil jakhar) पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ऐन गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. या धक्क्यातून काँग्रेस सावरत असतानाच काँग्रेसचे जुने आणि ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (kapil sibal) यांनीही आज काँग्रेसला रामराम केला. त्यामुळे काँग्रेसच्या नव संकल्पांनाच खिळ बसली आहे. चिंतन शिबिरानंतरच हे तिन्ही नेते पक्षाला सोडून गेले हे विशेष. त्यामुळे काँग्रेसचं चिंतन शिबीर फोल गेलं? त्यातून काहीच आऊटपूट आलं नाही? राहुल गांधींबाबतची या नेत्यांची आशा मावळली की आपल्याला सोडून जायचंय हे आधीच या नेत्यांनी ठरवलं होतं का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

सवंग नेत्यांच्या नादी लागल्याने आत्मघात

काँग्रेस सोडून जाणाऱ्या प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत. सुनील जाखड यांच्याकडे दुर्लक्ष झालं. नवज्योत सिंग सिद्धू सारख्या अति सामान्य कुवतीच्या नेत्यावर विश्वास ठेवून काँग्रेसने आपला घात करून घेतला. कॅप्टन अमरिंदर सिंग पहिले गमावले. त्यानंतर जाखड गमावले. अशा चांगल्या नेत्यांना सांभाळणं काँग्रेसची जबाबदारी होती. पण त्यांनी ते केलं नाही. हार्दिक पटेलवर विश्वास ठेवण्याची काँग्रेसने चूक केली. जी चूक सिद्धूंच्याबाबत केली, तिच हार्दिकबाबत केली. उद्या हार्दिक पटेलने भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजप त्यांना एवढं महत्त्व देणार नाही. हार्दिक पटेल सारख्या सवंग आणि उथळ नेत्यावर विश्वास ठेवण्याची काँग्रेसने चूक केली. तिच चूक बिहारमध्ये कन्हैय्या कुमारवर विश्वास ठेवून करत आहेत, असं एनालायजर न्यूजचे संपादक सुशील कुलकर्णी यांनी सांगितलं.

कपिल सिब्बल यांचा मुद्दा वेगळा आहे. ते काँग्रेसमधील संघटनात्मक बदलासाठी सातत्याने आग्रही होते. पण त्यांच्या बोलण्याकडेही दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे त्यांना वेगळा निर्णय घेणं भाग होतं. त्यामुळे ते सपाकडे गेले. अपक्ष असले तरी सपाचा त्यांना पाठिंबा मिळतोय हे विशेष आहे. दुसरं म्हणजे काँग्रेस हा प्रादेशिक पक्षांच्या नादाला लागून संपत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नादी लागले. ज्यांनी काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबतच ते गेले, असंही कुलकर्णी यांनी सांगितलं.

आगामी काळात पडझड सुरूच राहील

चिंतन शिबिरातील एकमेव मुद्दा म्हणजे कुटुंबाला तिकीट द्यायचं नाही. पण जी-23 ग्रुप म्हणतोय गांधींच्या व्यक्तिरिक्त काँग्रेसचा विचार करा. काँग्रेस शून्यावर आलेलीच आहे. त्यामुळे काँग्रेसचं अजून काही नुकसान होणार नाही. तिथे हा बदलाचा विचार होत नाही. त्यामुळे चिंतन शिबीरात काँग्रेसच्या नेतृत्वाच्या बदलावर चिंतन झालंच नाही. उलट नेतृत्वाकडे पुन्हा अधिकार देऊन प्रभावी नेत्यांना संपवण्याचे उद्योग झाले. त्यामुळे या चिंतन शिबिराचा फायदा होणार नाही. झालंच तर नुकसान होईल. महाराष्ट्राचंच उदाहरण द्यायचं तर देशमुख कुटुंबातून कुणाला तिकीट द्यायचं? थोरात कुटुंबातून कुणाला तिकीट द्यायचं? हे मुद्दे येतीलच. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रभावी नेत्यांना आपल्या राजकीय भवितव्यासाठी इतर पक्षात जावसं वाटेल आणि ते जातील. त्यामुळे या शिबिरातून आऊटपूट काही आलं नाही, उलट नुकसान झालं. आगामी काळात ही पडझड सुरूच राहील, असं सुशील कुलकर्णी यांनी सांगितलं.

गांधी परिवारावर नाराजी व्यक्त करण्याची हिंमत फार कमी काँग्रेस नेत्यांमध्ये आहे. ते नाराजी व्यक्त करत नाहीत. ते निघून जातात. हेमंत बिस्वा शर्मा सोडून गेले आणि मुख्यमंत्री झाले. मध्यप्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिया सोडून गेले आणि केंद्रीय मंत्री झाले. ते उद्या कदाचित मुख्यमंत्रीही होतील. त्यामुळे राहुल गांधींवर टीका करून वेळ वाया घालवण्यापेक्षा बाजूला होऊन करिअर सुरक्षित करणं हाच पर्याय काँग्रेसमधील नेते निवडताना दिसत आहेत, असं निरीक्षणही कुलकर्णी यांनी नोंदवलं.

राहुल गांधींचं अपयश हेही एक कारण

चिंतन शिबिरात काही तरी निर्णय झाला आणि फार मोठं घडलं म्हणून काँग्रेस सोडली असं होत नाही. काँग्रेस सोडली याचा अर्थ या नेत्यांनी काँग्रेस सोडायची हे खूप आधीच ठरवलं होतं. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्यावरचे सर्व गुन्हे रद्द करण्यात आले. हे आधीच कुठे तरी ठरलं असेल. तसंच कपिल सिब्बल यांचं आहे. त्यांना सामुदायिक नेतृत्व हवं होतं. पण ते काँग्रेसमध्ये शक्य नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली असावी. प्रत्येकाचा आपला अजेंडा असतो. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस सोडली आहे. चिंतन शिबिरामुळे काँग्रेस सोडली असं वाटत नाही. आणखी काही लोकांनी काँग्रेस सोडली तर आश्चर्य वाटणार नाही, असं दैनिक शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांनी सांगितलं.

राहुल गांधी प्रामाणिक नेते आहेत. फक्त त्यांना हवं तसं यश आलं नाही. प्रत्येक पक्ष संघटनात आपल्याला निवडून देणारा नेता हवा असतो. जोपर्यंत नेता निवडून देतो तोपर्यंत कार्यकर्त्यांना तो हवा असतो. त्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका हरू लागले तर लोक त्याला सोडून देतात. हे सगळीकडे घडतं. त्यामुळे राहुल गांधी यांचं अपयश हे देखील लोक सोडून जाण्याचं कारण आहेच. उद्या त्यांना यश मिळालं तर हे लोक परत येतील, असंही वाबळे म्हणाले.

राहुल गांधींकडून आशा मालवली

सुनील जाखड यांना काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करतील असं वाटत होतं. ते झालं नाही. तेव्हापासून ते नाराज होते. चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्यानंतरही ते नाराजच होते. पंजाबमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांना उभं राहणं कठिण आहे. म्हणूनच जाखड यांनी सेफ ठिकाणी जायचं ठरवलं असेल. राहुल गांधींकडून आशा मालवली आहे. पुढे काहीच दिसत नाही. तेही सोडून जाण्याचं कारण आहेच, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी स्पष्ट केलं.

राज्यसभेसाठी चुळबुळ सुरू होती

जाखड यांच्याकडे लढाऊपणा नाही. काँग्रेसने तुम्हाला खूप दिलं, आता पक्षाला तुम्हाला द्यायचा काळ आला आहे, असं आवाहन सोनिया गांधींनी केलं होतं. पण हे आवाहन पोलवणारे हे लोकं नाहीत. सिब्बल यांना राज्यसभा हवी होती. त्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू होता. काँग्रेसकडे राज्यसभेवर जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे सिब्बल यांना उमेदवारी देणं शक्य नव्हतं. जी-23मध्ये असताना त्यांनी पक्षावर टीका केली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी संतापल्या होत्या. त्यानंतरच्या काँग्रेसच्या बैठकीला कपिल सिब्बल उपस्थित नव्हते. तसेच सिब्बल यांचं नाव न घेता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. सिब्बल यांनी पत्रकार परिषदा घेतली. त्यावेळी काँग्रेसमध्ये आशादायक चिन्हं दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सातत्याने ते हेच सांगत होते. या नेत्यांना राज्यसभा मिळणार नाही. हे दिसत होतं. म्हणून या नेत्यांची चुळबुळ सुरू होती. म्हणूनच हे जनाधार नसलेले नेते काँग्रेस सोडून जात आहे, असंही देसाई यांनी सांगितलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.