Omicron Update | ओमिक्रॉन व्हेरियंट ‘सुपर माईल्ड,’ तूर्तास महाराष्ट्रात निर्बंध नाही, सरकारचं स्पष्टीकरण
ओमिक्रॉनमुळं आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळं तज्ज्ञांना खात्री आहे की हा नवा व्हेरियंट अति सौम्य आहे. त्यामुळं अनेक देशांना प्रवासावरील निर्बंध उठवण्याचे आणि अफवांना आळा घालण्याचं आवाहन करण्यात येत आहे. भारतात एकूण 23 ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
मुंबई : कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉन वेगानं पसरतो, असं सांगण्यात येत असलं तरी दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधल्या केसेस पाहता WHOनं या व्हेरिएंटचं वर्णन सुपर माईल्ड अर्थात अति सौम्य असं केलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या या वर्णनानंतर आता ओमिक्रॉन किती संहारक असणार आणि त्याचा संसर्ग किती असेल, यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.
मुंबईत 2 ओमिक्रॉनचे नवे बाधित आढळले
ओमिक्रॉनमुळं आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळं तज्ज्ञांना खात्री आहे की हा नवा व्हेरियंट अति सौम्य आहे. त्यामुळं अनेक देशांना प्रवासावरील निर्बंध उठवण्याचे आणि अफवांना आळा घालण्याचं आवाहन करण्यात येत आहे. भारतात एकूण 23 ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 10 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईत 2 ओमिक्रॉनचे नवे बाधित आढळलेत. कल्याण डोंबिवलीत 1, पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात एका ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद करण्यात आलीय.
परिस्थिती पाहून निर्बंध लावण्याचा विचार करु
मात्र फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस, तिसरी लाट येऊ शकते अशी भीती मंत्री हसन मुश्रिफांनी व्यक्त केलीय. जगभरातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्या केस स्टडी पाहता, हा व्हेरियंट अधिक घातक नाही, असं दिसंतय. त्यामुळं निर्बंधांबद्दल परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत. लस घेतल्यानंतरही अनेकांना ओमिक्रॉन विषाणूची बाधा झालीय. त्यामुळं बुस्टर डोससंदर्भातला निर्णय केंद्र सरकारनं घ्यावा, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान, बुस्टर डोसचा निर्णय जेव्हा होईल. परवानगी दिल्यानंतर बुस्टर डोस नक्की घ्या. मात्र तोपर्यंत कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे. कारण ओमिक्रॉन अधिक घातक नसला तरी तो वेगानं पसरणारा आहे.
इतर बातम्या :