तालिबान्यांच्या मागे दिसणाऱ्या पेंटींगचं मराठ्यांच्या इतिहासाशी थेट कनेक्शन? वाचा सविस्तर

नादीर शाहला अब्दालीची राजकीय आणि अध्यात्मिक समज आवडली. नादीर शाह हा अफगाणिस्तानचाही शासक होता. त्याच्याच सांगण्यावरुन अहमद शाह अब्दाली हा नादीर शाहच्या सैन्यात स्वत:च्या टोळीसह सहभागी झाला. दोघांची नजर त्यावेळेस सोन्याची चिमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुस्थानवर पडली.

तालिबान्यांच्या मागे दिसणाऱ्या पेंटींगचं मराठ्यांच्या इतिहासाशी थेट कनेक्शन? वाचा सविस्तर
अफगाण राष्ट्रपती भवनातली ऐतिहासिक पेटींगचं मराठा इतिहास कनेक्शन फोटो सौ.AP
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 2:17 AM

मुंबई : तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलाय. काबूलच्या राष्ट्रपती भवनातही आता तालिबानी स्थिरावलेत. काही व्हिडीओज, फोटोज विविध पत्रकार, वृत्तसंस्थांनी प्रकाशीत केलेत. ह्या सगळ्या फोटो, व्हिडीओमध्ये एक गोष्ट नजरेतून सुटत नाही आणि ती म्हणजे तालिबान्यांच्या पाठीमागे दिसणारी पेंटींग. ती नेमकी काय आहे? तिचं आपल्या देशाशी काय संबंध आहे? मराठ्यांच्या इतिहासाशी तिचं थेट कनेक्शन आहे का? असेल तर ते नेमकं कोणतं? याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.

विशेष म्हणजे ही पेंटींग म्हणजे अफगाणिस्तानचा इतिहास आहे आणि भारताच्या इतिहासाशी त्याचा थेट संबंध आहे. त्यातल्या त्यात मराठ्यांचा इतिहास तर ह्या पेंटींगशिवाय पूर्णच होणार नाही. कारण ह्या पेंटींगमध्ये दिसणाऱ्या बादशाहाशीच मराठ्यांनी भारतीय इतिहासातली सर्वात मोठी लढाई लढली.

काय आहे फोटोत? एक फोटो जगभर व्हायरल होतोय. ह्या फोटोत तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनात प्रवेश केल्याचं दिसतंय. त्यात त्यांचे म्होरके खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांच्या आजूबाजुला इतर तालिबानी अतिरेकी हातात, बंदूका, हत्यार, रायफल्स घेऊन उभे आहेत. एखाद्या अतिरेकी संघटनेनं संपूर्ण देश ताब्यात घेतल्याची ही कदाचित इतिहासतली पहिली घटना. तिचा पुरावा म्हणून हा फोटो जागतिक इतिहासात कायमचा नोंदवला जाईल. पण फोटो व्हायरल होण्याचं हे एकमेव कारण नाही. ह्या फोटोत जसे तालिबानी अतिरेकी दिसतायत, तसेच त्यांच्या पाठीमागे भींतीवर लावलेली पेंटींगही तेवढीच चर्चेत आहे. कारण ही पेंटींग भारताच्या इतिहासाशी थेट जोडली गेलीय. मराठ्यांच्या इतिहासाला याच पेंटींगमध्ये दिसणाऱ्या बादशाहमुळे कायमची कलाटणी मिळाली. मराठी माणसांच्या कित्येक पिढ्यांसाठी खरं तर ती एक भळभळती जखम आहे.

अहमद शाह दुर्रानीचा राज्याभिषेकाची पेंटींग. फोटो. सौ. विकिपेडिया

पेंटींग नेमकी कुठं आहे?

ही पेंटींग आहे काबूलच्या प्रेसिडेंशियल पॅलेस म्हणजे राष्ट्रपती भवनातली. अफगाण राष्ट्रपतींचं हे निवासस्थान. त्याला ऐतिहासिक संदर्भ आहेत. कारण फक्त अफगाणिस्तानच नाही तर भारतीय इतिहासाशी ते थेट संबंधीत आहे. राष्ट्रपती भवनाला अफगाण लोक अर्ग(Arg)म्हणतात. जवळपास 34 हेक्टर जागेवर हे राष्ट्रपती भवन पसरलेलं आहे. 1880 साली त्याची निर्मिती केली गेली. त्याआधीही इथं एक महल होता. पण लढायांमध्ये तो उद्धवस्त झाला होता. त्यानंतर निर्माण केलेली वास्तू म्हणजे आजचं काबूलच्या पॉश एरियातलं राष्ट्रपती भवन. तेव्हापासून अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचं हे निवासस्थान म्हणून कायम राहिलं. ह्याच राष्ट्रपती भवनात ती पेंटींग इतिहासाची साक्ष देत उभी आहे.

पेंटींग नेमकी कशाची आहे?

ह्या पेंटींगमध्ये अफगाणिस्तान आहे. काही सरदार दिसतायत, कंबरेला बर्चे, हातात तलवारी आणि इतर हत्यारं दिसतायत. एक व्यक्ती एका फकिराच्या समोर झुकून त्याचा आशीर्वाद घेताना दिसतेय. फकिर त्या राजाच्या डोक्यावर काही तरी अक्षतासारखं टाकताना दिसतोय. फोटोत अफगाणिस्तानची ओळख असलेल्या पर्वतरांगाही. तिथले कबिले, टोळ्या याही फोटोत स्पष्टपणे जाणवतायत. जो व्यक्ती फकिरासमोर झुकलेला दिसतोय तो दुसरा तिसरा कुणी नसून अहमद शाह दुर्रानी आहे. मराठ्यांचा इतिहास त्याला अहमद शाह अब्दाली म्हणून ओळखतो. अहमद शाह अब्दाली हाच अफगाणिस्तानचा पहिला शासक मानला जातो. ही पेंटींग त्याच्या राज्याभिषेकाचा प्रसंग चित्रीत करणारी आहे. हा तोच अहमद शाह अब्दाली आहे ज्याच्याविरोधात मराठ्यांनी पानिपतची तिसरी लढाई लढली. ज्या लढाईत मराठ्यांचं पानिपत झालं. एवढ्या वर्षानंतरही मराठी माणसाच्या जिव्हारी लागलेला ‘पानिपत’चा घाव अजून मिटलेला नाही.

गव्हाच्या अक्षता आणि अब्दाली राजा झाला

अफगाणिस्तान हा अनेक टोळ्या, कबिले, तांडे यांचा मिळून बनलेला देश आहे. अशा अनेक टोळ्यांमध्ये विखुरलेल्या भूमीवर कुण्या एकाला राजा म्हणून घोषीत केलं जाणं तसं अशक्यच. पण ते अब्दालीनं घडवून आणलं. ह्या विविध टोळ्यांची एक सभा होती. तिच सर्व निर्णय घ्यायची. तिला ‘लोया जिरगा’ असं म्हटलं जायचं. आपल्याकडे जशी पंचायत असते गावचे निर्णय घ्यायला तसच काहीसं हे समजा. ह्याच जिरगा लोयानं अहमद शाह अब्दालीला 1747 मध्ये राजा म्हणून घोषित केलं.

हे तेच कंदहार आहे

हा राज्याभिषेक झाला तो कंदहारमध्ये. हे तेच कंदहार आहे जिथं भारतीय विमानाचं अपह्रण करुन उतरवलं गेलं. हे तेच कंदहार आहे जिथं  बादशाह औरंगजेबाचा दारुण पराभव झाला. हे तेच कंदहार आहे जिथं तालिबानचा जन्म झाला. त्याच कंदहारमधल्या एका मशिदीत अहमद शाह अब्दालीचा राज्याभिषेक समारंभ पार पडला. तो इतका साधा होता की, एका फकिरानं अब्दालीच्या डोक्यावर काही गहू अक्षता म्हणून टाकले आणि त्याला राजा म्हणून घोषीत केलं. त्यावेळेस अब्दाली अवघ्या 25 वर्षांचा होता. हाच प्रसंग त्या पेंटींगमध्ये रेखाटला गेलाय. याच अर्थ असा की, अफगाणिस्तानला चालवण्यासाठी पहिला शासक म्हणून अहमद शाह अब्दालीची निवड केली गेली त्या प्रसंगाची ही पेंटींग.

लुटारूची पेंटींग राष्ट्रपती भवनात कशी? अहमद शाह अब्दाली हा लुटारु होता असा भारतीय इतिहास सांगतो. लूट करण्यासाठी अहमद शाह अब्दाली हा भारतावर चाल करुन एकदा नाही पाच वेळेस आला. कधी त्यानं पंजाब लुटलं, कधी काश्मीर तर कधी दिल्ली. पाचव्यांदा तो मराठ्यांशी पानिपतमध्ये भिडला. लुटारु नसता तर तो पुन्हा पुन्हा हिंदुस्थानवर आक्रमण करत का आला असता? म्हणून तो लुटारू. पण तो दूर-ए-दुर्रानी म्हणजेच मोत्यांचा मोती होता असा अफगाण लोकांना वाटतं. नादीर शाहनेच त्याला हे टायटल दिलेलं होतं. आजचा जो अफगाणिस्तान आहे तो अहमद शाह अब्दालीचीच देण आहे. देश म्हणून अफगाणिस्तानला एकत्र कुणी केलं असेल तर ते अब्दालीनेच. म्हणून तर भारतासाठी लुटारु असलेला अब्दाली अफगाण लोकांसाठी ‘बाबा’ ‘महान’ आहे. त्यामुळेच त्याच्या राज्याभिषेकाचं चित्र अफगाण राष्ट्रपतीच्या निवासस्थानात लागलेलं आहे.

आणि अब्दालीनं लूट सुरु केली

अहमद शाह अब्दाली हा हेरतच्या राज्यपालाचा मुलगा. दोन भावंडात छोटा. अब्दालीच्या बापाचा टोळ्यांच्या संघर्षात मृत्यू झाला. अब्दाली आणि त्याच्या भावाला त्यांच्या आईनेच सांभाळलं. पण 1732 मध्ये अहमद शाह अब्दाली भावासह प्रकट झाला. दोघांनाही तत्कालिन शासकानं थेट जेलमध्ये टाकलं. त्याच वेळेस इराणमध्ये नादीर शाहची राजवट होती. तो क्रुर होता. लुटालूट करायचा. त्यानं कंदहारवर आक्रमण केलं. त्यात तत्कालिन शासकाचा पराभव झाला. नादीर शाहनं अब्दालीची जेलमधून सुटका केली. दोघांची भेट झाली. नादीर शाहला अब्दालीची राजकीय आणि अध्यात्मिक समज आवडली. नादीर शाह हा अफगाणिस्तानचाही शासक होता. त्याच्याच सांगण्यावरुन अहमद शाह अब्दाली हा नादीर शाहच्या सैन्यात स्वत:च्या टोळीसह सहभागी झाला. दोघांची नजर त्यावेळेस सोन्याची चिमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुस्थानवर पडली.

अब्दाली, मराठे आणि पानिपत

नादीर शाहनं ज्यावेळेस भारतावर आक्रमण करुन लूट केली त्यावेळेस तो इथला कोहीनूर हिरा घेऊन जाण्यात यशस्वी झाला. ह्या लुटीच्या वेळेस त्याच्यासोबत अहमद शाह अब्दालीही होता. नादीर शाहाचा खून झाल्यानंतर त्याच्या मुलांमध्ये राजा होण्यासाठी बेबंदी माजली. पण खरी संधी साधली ती अहमद शाह अब्दालीनं. नादीर शाहाच्या हातातली अंगठी अब्दालीनं काढली आणि स्वत:च्या बोटात घालून राज्यरोहण करुन घेतलं. जशी नादीर शाहची भारतावर वाकडी नजर होती तशी अब्दालीचीही पडली. नादीर शाहसोबतच्या लुटीत त्यानं इथलं वैभव पाहिलेलं होतं.

त्याच काळात अटक ते कटक मराठा साम्राज्य पसरलेलं होतं. मराठ्यांची घौडदौड रोखेल असा हिंदुस्थानमध्ये तरी कुणी नव्हता. त्यांना रोखण्यासाठीच इथल्या काही स्थानिक राजांनी अब्दालीला पाचारण केलं आणि त्यातूनच पानिपतची तिसरी लढाई लढली गेली. ह्या लढाईत मराठा साम्राज्याची कधीही भरून न निघणारी हाणी झाली. नंतर मराठा साम्राज्य पुन्हा उभं राहीलं पण माणसांची हाणी कशी भरुन निघणार?

म्हणूनच त्या पेंटींगमध्ये रेखाटलेला अहमद शाह अब्दालीचं राज्याभिषेक मराठी माणसाला न विसरता येणारा आहे. वेळ बदलली. पिढ्या लोटल्या. त्यावेळेसचा आणि आजचा हिंदुस्थान यात जमीन अस्मानचा फरक आहे. पण तालिबान्यांच्या पाठीमागे असलेली ती पेंटींग बघितली तर अजूनही अफगाणिस्तान ह्या टोळ्यांच्याच ताब्यात असल्याचं विदारक चित्रं आहे.

तालिबान हा त्याचा पुरावा. जशी अब्दालीची टोळी होती आणि ती लुट करायची तशीच तर तालिबान एक टोळी आहे जी लुटीवर उभी आहे. अफगाणिस्तान खरंच बदललाय का असा सवाल तर ती पेंटींग करत नाहीय ना?

Afghanistan Crisis : तालिबानकडून अफगाणिस्तानची सत्ता काबीज, आता काय असेल युद्धग्रस्त देशाचे भविष्य? (the painting behind the Taliban, what is its direct connection with the history of the Marathas?)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.