
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

पुतळ्याच्या कामाची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली.

सावित्रीबाई फुले यांच्या या पुतळ्याची उंची 12 फूट इतकी असणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे.

कात्रज पुणे येथे परदेशी स्टुडिओत सावित्रीबाई फुले यांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे.

स्टडिओत सुरू असलेली इतर कामे, चित्रे, शिल्प निर्मितीची यावेळी छगन भुजबळ यांनी पाहणी केली.

मंत्री भुजबळ यांनी पुतळा निर्मितीबाबत काही सूचना देत पुतळ्याच्या कामाला अंतिम मान्यता दिली आहे.

पाहणीवेळी प्रा. हरी नरके, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, प्राचार्य संजय चाकणे, शिल्पकार परदेशी उपस्थित होते.