Wayanad Photos : फक्त फोटो उरला… भुस्खलनानंतर हाहा:कार; होतं नव्हतं सर्व गेलं…
केरळातील वायनाड हा जिल्हा आपल्याला राहुल गांधी यांचा लोकसभा मतदार संघ म्हणून परिचित असेल. या वायनाडमध्ये 30 जुलै रोजीची पहाट काळ रात्र ठरली.पावसाने अचानक भूस्खलन झाल्याने येथील घरेच जमीनीने गिळली. आतापर्यंत 150 लोकांचे मृत्यू झाले आहेत. केरळ सरकारने या संकटाला राष्ट्रीय संकट म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर केंद्र सरकारने आम्ही चार वेळा धोक्याचे इशारे दिले होते तरी राज्य सरकार गाफील राहिल्याचे म्हटले आहे. भूस्खलनात आता पर्यंत 98 नागरिक बेपत्ता आहेत. बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन थांबवावे लागले आहे.सीएम कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की मेप्पाडीत 90 तर निलांबुर येथे 32 लोक ठार झाले आहेत. अनेक रुग्णालयात 192 जखमींवर उपचार सुरु आहेत. मेप्पाडीच्या चहाच्या मळ्यात किती लोक राहात होते याची काहीही माहिती प्रशासनाकडे नव्हती. येथे अनेक बाहेरुन आलेल्या राज्यातील मजूर रहात होते. परंतू भूस्खलनाचा फटका बाहेरुन आलेल्या पर्यटकांनाही बसला आहे.
Most Read Stories