Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने 10 रुपयांत केलं होतं लग्न; बसमधून निघालेली वरात

देशभरात सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तब्बल 5000 कोटी रुपयांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मात्र तुम्हाला माहितीये का, बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने अवघ्या 10 रुपयांत लग्न केलं होतं. या लग्नासाठी तो बसने गेला होता.

| Updated on: Jul 12, 2024 | 11:08 AM
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लग्नासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. सध्या देशभरात उद्योजक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. तब्बल 5000 कोटी रुपयांचं हे लग्न असल्याचं म्हटलं जातंय. मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीत एक असाही अभिनेता आहे, ज्याने फक्त दहा रुपयांत लग्न केलं होतं. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आहे.

1 / 5
आमिर खानने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. रिना ही आमिरची शेजारी होती असं म्हटलं जातं. जेव्हा आमिरने तिला प्रपोज केलं, तेव्हा सुरुवातीला तिने नकार दिला होता. पण नंतर 80च्या दशकाच्या सुरुवातीला दोघं एकमेकांना डेट करू लागले.

2 / 5
आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील एका गाण्यात रिना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. एका मुलाखतीत आमिरने रिनासोबतच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता. या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि या लग्नाचा खर्च अवघे दहा रुपये होता.

3 / 5
“मी रिनाशी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं होतं. आमच्या बाजूने तीन साक्षीदार होते. रिनासोबतचं माझं लग्न सर्वांत किफायतशीर होतं, असं म्हणायला हरकत नाही. मी 211 नंबरची बस पकडली आणि 50 पैशांची तिकिट काढली. वांद्रे पश्चिमला उतरून मी ब्रीजवरून पूर्वेला गेलो. तिथून मी हायवेच्या दिशेने चालत गेलो. हायवे ओलांडून मी गृहनिर्माण भवनात प्रवेश केला. तिथेच मॅरेज रेजिस्ट्रारचं ऑफिस होतं. अशा पद्धतीने माझं लग्न 10 रुपयांच्या आत झालं होतं”, असं त्याने सांगितलं होतं.

4 / 5
लग्नाच्या काही वर्षांनंतर आमिर आणि रिना विभक्त झाले. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर रिनाने मुलगी आयरा आणि मुलगा जुनैद यांचं पालकत्व घेतलं. "तो काळ आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी फार त्रासदायक होता. आम्ही शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने त्या परिस्थितीचा सामना करायचा प्रयत्न केला. विभक्त झाल्यानंतरही रिना किंवा माझ्या मनातील एकमेकांविषयीचं प्रेम आणि आदर कमी झालेलं नाही”, असं आमिर एका मुलाखतीत म्हणाला होता.

5 / 5
Follow us
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.