
बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात अब्दू रोजिक हा गाणे शूट करण्यासाठी गेला होता. यावेळी अब्दू रोजिक याच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये अब्दू रोजिक हा गाणे शूट करत असताना मनीषा रानी हिने बळजबरीने अब्दू रोजिक याचे किस घेतले. विशेष म्हणजे याचा व्हिडीओही तूफान व्हायरल होताना दिसला.

यावर आता नुकताच अब्दू रोजिक हा बोलताना दिसला. अब्दू रोजिक याने स्पष्ट सांगितले की, ही बळजबरी केलेली किस होती. हा प्रकार आपल्याला अजिबातच आवडला नसल्याचे देखील अब्दू रोजिक याने स्पष्ट केले.

अब्दू रोजिक याने सांगितलेला किस्सा ऐकल्यानंतर शिव ठाकरे याला देखील धक्का बसला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मनीषा रानी हिच्यावर टिका केली होती.

बिग बाॅस 16 मध्ये धमाल करताना अब्दू रोजिक हा दिसला होता. विशेष म्हणजे भारतामध्येही अब्दू रोजिक याची फॅन फाॅलोइंग ही जबरदस्त बघायला मिळते.