अभिजीत खांडकेकर हे नाव 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या झी मराठीवरच्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलं. त्यानंतर त्याने 'माझी या प्रियाला प्रित कळेना',' माझ्या नवऱ्याची बायको' या टीआरपीच्या सर्वोच्चस्थानी असणाऱ्या मालिकांमध्ये काम केलं. त्यांने अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सूत्रसंचालन केलं आहे. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'मी पण सचिन' ही त्याच्या गाजलेल्या सिनेमांची नावं सांगता येतील. तसंच 'सोपं नसतं काही' ही प्लॅनेट मराठीवर त्याची वेबसिरीजही चांगलीच चर्चेत आहे.