अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमीतपणे चाहत्यांच्या संपर्कात असते.
आता हीनानं सोशल मीडियावर काही स्पेशल फोटो शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये हीनानं हे फोटोशूट केलं आहे.
या ग्लॅमरस फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहोचली. 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.एवढंच नाही तर तिनं 'बिग बॉस 11'मध्येसुद्धा हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात तिनं दमदार प्रदर्शन केलं.
हीनाचे फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.